भारतीय गुप्तहेर संस्थेची सुरस आणि चमत्कारीक माहिती
कुलभूषण जाधव हे रॉचे हेर नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. ते खरेच मानावे लागेल. भारतीय गुप्तचर दुसऱ्या देशात कृष्णकृत्ये करीत नसल्याचेही परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे. पण त्यात तथ्य आहे? असेल, तर मग आपल्या गुप्तचर यंत्रणा नेमके करतात तरी काय?.. पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक भारतात येण्याच्या ‘मुहूर्ता’वर पाकिस्तानने कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरण जाहीर करावे, येथूनच या प्रकरणाच्या खरेपणाबाबतच्या संशयाला सुरुवात होते. भारत आणि पाकिस्तानातील संबंध जरा कुठे सुरळीत होत आहेत, अशी शंका येताच भारतात मोठा दहशतवादी हल्ला होतो. या वेळी पाकिस्तानी लष्कराने जरा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी भारताच्या हेरगिरीचे प्रकरण पुढे आणले आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार कुलभूषण जाधव ऊर्फ हुसेन मुबारक पटेल हे रिसर्च अॅण्ड अनालिसिस िवग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेचे हेर आहेत. अलीकडेच पाकने त्यांच्या कबुलीजवाबाची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी आपण नौदल अधिकारी असून, रॉसाठी इराणमधून पाकिस्तानविरोधात दहशतवादी कारवाया करीत असल्याची ‘कबुली’ दिली आहे. मात्र ती बन