अफगाणिस्तानचा रक्तरंजित इतिहास
अफगाणिस्तानचा रक्तरंजित इतिहास सध्या अफगाणिस्तानची चर्चा सुरू असली तरी ही भूमी नेहमीच चर्चेच्या आणि वादग्रस्त स्थानी राहिलेली आहे. अफगाणिस्तान हा जगाची कायम युद्धभूमी राहिला आहे. असे असले तरी अन्य देशांच्या तुलनेने आकारमान तसेच शक्तीने क्षीण असूनही या भूमीने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. एकदम ओसाड, बोडक्या वाटणार्या या भूमीवर आजही एकही सम्राट, महासत्ता स्वत:चा पाय रोवू शकल्या नाहीत हीच याची खासियत आहे. ही भूमी जिंकण्यासाठी आणि ती ताब्यात ठेवण्यासाठी अनेकानी जंग जंग पछाडले, पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. सध्या अमेरिकेने आपला हक्क सोडून दिल्यामुळे अफगाणमध्ये पुन्हा तालिबानी हुकूमत लागू होत आहे. सम्राट, महासत्तांचे पराभव पाहिले की, का या अफगाण भूमीला ‘साम्राज्यांचं कब्रस्तान’ म्हटलं जातं, याचा अंदाज येऊ शकतो. मोठमोठ्या योद्ध्यांना या भूमीने घाम फोडल्याचा इतिहास आहे. त्यात जगज्जेता सिकंदर याचाही समावेश आहे, तसेच मोगल बादशाह औरंगजेबही आहे आणि अलीकडच्या काळातले रशिया-अमेरिकाही. म्हणून याला ‘साम्राज्यांचं कब्रस्तान’ असेही म्हटलं जातं. असं काय गुपित या भूमीत आहे की, इथं मोठ्या योद्ध्यांन...