*केबल किंवा डिश टीव्हीचे महिन्याचे पैसे कसे कमी करता येतील याची माहिती.*
*केबल किंवा डिश टीव्हीचे महिन्याचे पैसे कसे कमी करता येतील याची माहिती.* आता मी पहिला उपाय सांगणार आहे तो तुमचा प्रतिमाहिना कमीतकमी ₹ 20+ GST अशी 23.6 ₹ एवढी रक्कम वाचविण्याचा. तर आता ₹130+GST असे मिळून 154 रुपयात 100 फ्री चॅनेल मिळणार आहेत. लक्षात घ्या की 130 ₹ ही 100 फ्री चॅनेल्सची फी नसून 100 इतक्या नेटवर्क कॅपॅसिटीची फी आहे. एक SD चॅनेल घेतला की एक नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरला जातो. आणि एक HD चॅनेल घेतला की दोन नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरतात. जर आपण 100 फ्री SD चॅनल घेतले तर आपले हे 100 स्लॉट भरतील. 100 नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरले की अजून चॅनेल पाहण्यासाठी पुन्हा 20 ₹ देऊन 25 स्लॉट विकत घ्यावे लागतील, तेही भरले की पुढच्या प्रत्येक 25 स्लॉट्ससाठी 20 ₹ द्यावे लागतील. हे अधिकचे 20 ₹ हे चॅनेल्सच्या वैयक्तिक किंवा पॅकच्या किंमतीच्या व्यतिरिक्त आहेत. म्हणजे समजा तुम्ही 100 फ्री SD चॅनेल घेतले, आणि प्रत्येकी 5 ₹ किंमतीचे 25 पेड SD चॅनेल घेतले आणि प्रत्येकी 10 ₹ चे 10 HD चॅनेल्स घेतले तर तुम्हाला एकूण स्लॉट्स लागतील फ्री चॅनेल्सचे 100 + SD पेड चॅनेल्सचे 25 + HD चे प्रत्...