*इस्राईल* - पी एम मोदींच्या ह्या देशाच्या भेटीच्या निमित्ताने थोडी माहिती देतो ह्या देशाची.
इस्राईल हा जगातील एकमेव यहुदी देश .क्षेत्रफळ निम्म्या महाराष्ट्रा एवढे पण नाही.लोकसंख्या आपल्या पुण्यापेक्षा थोडी जास्त(80 लाखांच्या आसपास).जगभरात यहुदी म्हणून जन्माला येणारा प्रत्येक यहुद्याला जन्मजात इस्त्राईल चे नागरिकत्व मिळते.तो कधीही तिथं जाऊन राहू शकतो.
इस्त्राईल मध्ये फार कमी म्हणजे नगण्य जमीन शेतीयोग्य.पाऊस भारताच्या 10 टक्के ही पडत नाही.पण इस्त्राईल शेती शास्त्रात अति प्रगत आहे.6।6 महिने काही प्रक्रिया न करता खराब न होणाऱ्या टोमॅटो व बटाट्याचे संकरण त्यांच्याकडे आहे.पाणी नसल्यामुळे ठिबक सिंचन चा वापर होतो.लक्षात घ्या ,1970 ला जेवढे पाणी ते वापरायचे तेवढेच आज वापरतात पण उत्पादन मात्र 1970 पासून चक्क 70 पटीने वाढले आहे आज.हे एकमेव राष्ट्र असे आहे जिथं गेल्या शंभर वर्षात वृक्षांची संख्या दुप्पट झाली आहे.
आता ताकदीचा विभाग,हे राष्ट्र अरब राष्ट्रानी घेतलेले असल्यामुळे सर्वाधिक खर्च संरक्षण विभागावर करते.जगातील चौथे मोठे हवाई दल त्यांच्याकडे आहे.जगातील कोणताही देश इस्त्राईल बरोबर दुशमणीचा विचार करताना 10 वेळा विचार करायचे प्रमुख कारण,इसरेल कडे क्षेपणास्त्र प्रतिबंधक तंत्रज्ञान आहे जे जगात कुठल्याही देशाकडे नाही.इस्त्राईल चया सिमेत मिसाइल किंवा बॉम्ब डागणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण.कारण इस्त्राईल च्या सिमेत यायच्या 1 किलोमीटर वरच मिसाइल्स ना पाडले जाते व स्वयंचलित क्षेपणास्त्र आपोआप डागले जाते .इस्त्राईल मध्ये देश सेवा सक्तीची आहे.अगदी मुलींनाही.मुलींना 2 व मुलांना 3 वर्षे लष्करी सेवा सक्तीची आहे .इस्त्राईल ची गुप्तचर तपास या यंत्रणा मोसाद ..ह्याबद्दल एवढेच सांगीन, तुम्ही मोसाद चे टार्गेट असाल तर जगातील कोणताही देश तुम्हाला वाचवू शकनार नाही .ही एकमेव गुप्तचर संघटना अशी आहे ज्यात 50 टक्के महिला आहेत.अमेरिकेच्या प्रेसिडेंट सुरक्षा दलाला मोसाद प्रशिक्षण देते .
इस्त्राईल ने विश्व स्तरावर फार कमी मित्र बनवले ,पण मित्र बनला तर इस्त्राईल सारखा भरवशाचा मित्र कुणी नसतो.
इस्रायली लोक कमालीचे राष्ट्राभिमानी व धर्मअभिमानी आहेत.आपले हे अभिमान ते धर्म प्रचार व दहशत वादासाठी न वापरता राष्ट्र उद्धारासाठी वापरतात.
एक उदाहरण देतो,इस्त्राईल चे आताचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू सर आधी लष्करात स्पेशल कमांडो फोर्स मध्ये होते.युगांडा मध्ये इस्रायली लोकांना सोडवताना त्यानी गोळ्या झेलल्यात.बेंजामिन सर वाचले पण त्यांचा मोठा भाऊ शहीद झाले तिथं.आजची गोष्ट ,त्यांचा जेमतेम 20 वर्षांचा मुलगा आज लष्करात आहे
आपल्या देशाचा प्रॉब्लेम हाच..कुठल्याही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची मुले लष्करात नाहीत त्यामुळे राष्ट्र भक्तीचा अंश व सैनिकांचे महत्व नाही.
प्रखर राष्ट्र भक्ती,धर्म प्रेम ह्या गुणांचा त्यांनी आपल्या देशाला महासत्ता बनवण्या साठी वापर केलाय ,बघा तुम्हाला काय शिकता येते का त्यांच्या पासून
*जाताजाता* -पाकिस्तान च्या पासपोर्ट वर लिहिलेले असते,हा पासपोर्ट इस्त्राईल सोडून बाकी सर्व देशात वैध आहे !
Comments
Post a Comment