Complaint to ACB against Shri Vishwas Patil, CEO of SRA
July 3. 2017,
The Addln DG,
Anti Corruption Bureau,
Worli, Mumbai.
Sub: Complaint against Shri Vishwas Patil, CEO of SRA
Dear Sirs,
We are attaching herewith our formal complaint against Shri Vishwas Patil, CEO of SRA.
You are requested to conduct an inquiry and file an FIR as per due process of law and oblige.
Regards,
For Alert Citizens Forum of India,
Dayanand Nene
President ( 8879528575)
3 जुलै, 2017
प्रति,
अतिरिक्त पोलीस आयुक्त,
भ्रष्टाचार विरोधी ब्युरो,
[ Anti Corruption Bureau]
वरळी पोलीस कॅंप,
वरळी, मुंबई 400030
विषय: SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विश्वास पाटील यांचा ‘गतिमान’ कारभार; निवृत्तीच्या शेवटच्या पाच दिवसांत तब्बल ४५० फाइली
निकालात काढण्याचा प्रयत्न – चौकशीची वा कारवाई ची मागणी.
महोदय,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी या पदाची गैरवापर करीत
कधीही न दाखविलेला गतिमान कारभाराचा नमुना निवृत्तीच्या शेवटच्या पाच दिवसांत दाखविला आहे.
1.
पाच दिवसांत तब्बल ४५० फाइली निकालात काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या सर्व फाइली प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तपासणी करण्याचा न भुतो, न भविष्यती प्रकार झोपु प्राधिकरणात घडला आहे. मात्र फक्त २०० फाइलीच या अधिकाऱ्यांच्या हाती आल्या.
2.
श्री विश्वास पाटील यांनी निवृत्तीच्या शेवटच्या कालावधीत निकालात काढलेल्या सर्वच फाइलीची
चौकशी करावी अशी मागणी अलर्ट सिटिज़न्स फोरम ऑफ इंडिया तर्फे करण्यात येत आहे.
3.
विश्वास पाटील यांनी झोपु प्राधिकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ३० जून रोजी निवृत्त होण्याआधीच्या केवळ पाच दिवसांत फाइली निकालात काढण्याचा त्यांनी जो सपाटा लावला तो कमालीचा धक्कादायक होता.
4.
याच काळात विकासकांच्या गाडय़ांच्या रांगा झोपु प्राधिकरणाच्या आवारात दिसू लागल्या होत्या. त्यानंतर विलेपार्ले येथील एका वास्तुरचनाकाराच्या मार्फत या सर्व फाइली निकालात निघण्याच्या ‘विश्वासा’च्या अर्थपूर्ण ‘गतिमान’तेची चर्चाही प्राधिकरणात रंगली होती.
5.
तब्बल साडेचारशे फाइली निकालात काढताना संबंधित विकासकांना अटीसापेक्ष इरादापत्र (Letter of Intent) जारी करण्याचे आदेशही तयार करण्यात आले होते.
6.
चटईक्षेत्रफळ विक्रीच्या आठवडय़ाला चार ते पाच फाइली आणि वर्षभरात १२०० फाइली निकालात काढण्याचा साधारणत: वेग असतो. परंतु आतापर्यंतचा विक्रम मोडीत काढून पाटील यांनी केवळ पाच दिवसांत साडेचारशे फाइली हातावेगळ्या केल्याचे कळते.
7.
३० जून या निवृत्तीच्या दिवशी ज्या फाइलींवर स्वाक्षऱ्या होऊ शकल्या नाहीत, त्या फाइली पाटील यांनी घरी नेल्या. त्यावर स्वाक्षऱ्या करून मागील तारखांची नोंद करण्याचा डाव होता. नोंदणीवहीत या फाइलींची जावक तारीख २९ जून असली, तरी त्यावर मागील म्हणजे २३ वा २४ तारीख टाकून स्वाक्षरी करण्याचा घाट घालण्यात आला होता.
8.
या सर्व फाइली स्वाक्षऱ्या करून १ जुल रोजी सकाळी आठच्या सुमारास प्राधिकरणात जमा केल्या जाणार होत्या. परंतु पाटील यांच्या निवृत्तीनंतर या पदाचा कार्यभार सोपविण्यात आलेले म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांना याबाबतची कुणकुण ३० जूनच्या सायंकाळीच लागली आणि त्यांनी तात्काळ आपल्या विश्वासातील अधिकाऱ्यांना झोपु प्राधिकरणात पाठविल्यामुळे हा डाव यशस्वी होऊ शकला नाही असे समजते.
9.
प्रभारी अधिकारी सहसा तात्काळ सूत्रे हाती घेत नाही. परंतु पाटील यांच्या गतिमानतेमुळे अवाक् झालेले म्हैसकर साडेनऊ वाजता झोपु कार्यालयात पोहोचले तेव्हाही त्यांना तब्बल २००हून अधिक फाइली आढळल्या असे बोलले जाते. यापकी काही फाइलींवर स्वाक्षऱ्या झालेल्या नव्हत्या असे कळले.
म्हैसकर यांनी कार्यालयात उपलब्ध असलेल्या २०० फाइलींसह स्कॅिनगसाठी गेलेल्या फाइलीही ताब्यात घेतल्या आहेत. विश्वास पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी थत्ते यांच्याकडेही म्हैसकर यांनी शनिवारी चौकशी करून गेल्या आठवडय़ाभरात निर्णय घेतलेल्या सर्व फाइली मागविल्या आहेत असे कळले.
अतिरिक्त कार्यभार स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याकडून पहिल्यांदाच अशी तपासणी करण्याचा प्रकार घडला आहे. चटई क्षेत्रफळाच्या विक्रीस अनुमती देण्याच्या काही फाइलींवर स्वाक्षऱ्या झालेल्या नव्हत्या. या फाइलींवर मागील तारखेच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा डाव होता, असेही या निमित्ताने उघड झाले आहे.
म्हैसकर यांनी तात्काळ सूत्रे स्वीकारल्याने या बाबी उघड झाल्या.
‘मंजुरी दर’ चौरसफुटाला १२५ रुपये
झोपु प्राधिकरण आणि म्हाडा हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचे लपून राहिलेले नाही. फाइलीवर स्वाक्षरी करण्यासाठीचा झोपु प्राधिकरणात चटईक्षेत्रफळाचा ‘दर’ सध्या प्रति चौरसफूट १२५ रुपये इतका आहे. कुठलाही मुख्य कार्यकारी अधिकारी औपचारिकरीत्या ते मान्य करीत नाही, परंतु हा दर दिल्यानंतरच फाइलीवर सही होते, हे विकासकांनाही ठाऊक आहे. प्राधिकरणात उपअभियंता, सहायक अभियंता, उपमुख्य अभियंता, मुख्य अभियंता ते विशेष कार्य अधिकारी, मुख्य अधिकारी या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळा ‘दर’ असतो.
बायको भागीदार
असे समजते की श्री विश्वास पाटील यांची बायको ही शाह जैन कन्स्ट्रक्षन वा रॉकलाईन कन्स्ट्रक्षन या दोन कंपन्यात भागीदार असल्याने या दोन कंपन्यांवर साहेबांची खूप मेहेरनजर आहे.
विश्वास पाटील
यांचे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी डजनभर फ्लॅट आहेत - त्यांचीही चौकशी केली पाहिजे की
त्यांच्या कडे एवढी संपत्ती आली कुठून ?
तरी माझी आपणास विनंती आहे की आपण माझी ही ई-मेल म्हणजे लेखी तक्रार समजून विश्वास पाटील यांनी नोकरी च्या अंतिम 5 दिवसात सह्या केलेल्या 450 फाइल ची कसून चौकशी करावी व कायद्याच्या प्रक्रीयेनुसार कारवाई करून श्री विश्वास पाटील व त्यांनी गैर मार्गाने फायदा करून दिलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करावा.
अलर्ट सिटिज़न्स फोरम ऑफ इंडिया साठी,
दयानंद नेने
अध्यक्ष (8879528575)
CC: The Hon. Chief Minister, Govt. of
Maharashtra
CC: The
Hon. Minister of State for Home, Govt. of Maharashtra.
- For information and request to pass
necessary orders to conduct a detailed inquiry in the matter.
Dayanand
Nene
Comments
Post a Comment