विश्वासराव तहात जिंकले युद्धात हरले।

विश्वासराव तहात जिंकले युद्धात हरले।



पानिपतकार विश्वास पाटील यांनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर गैरविश्वासू व्यवहार केल्याचा संशय विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी करून चौकशी करण्याची मागणी करून विश्वास पाटील यांना अडचणीत आणलं आहॆ.
अनेक कादंबऱ्या त्याही गाजलेल्या आणि गाजवलेल्या त्यांच्या नावावर असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात ऐकायला मिळत असते.मध्यंतरी त्यांच्याच एका नातेवाईकांने बहुतेक त्यांच्या भावाने विश्वास पाटील यांच्या लेखन कौशल्यावर टीका केली होती.त्यांची कथा यांनी चोरली अन त्यात फेरफार करून यांनी कादंबरी लिहिली असा आरोप लेला होता.काय काय करणार एक माणूस प्रशासन सांभाळणार की कादंबऱ्या लिहिणार.साहित्य वर्तुळातील टीकाकाराना त्यातली सत्यता माहीत असावी. पण विश्वास पाटील हे हाडाचे लेखक आहेत ते अधिकारी म्हणून सपशेल फेल गेले असे वाटते. कारण अधिकारी केलेल्या भ्रष्टाचाराचे पानिपत होऊ देत नाहीत.पुरावे कुठेच शिल्लक राहत नाहीत.त्यांना लेखक असल्यामुळे  जाता जाता झोपडपट्टी पुनर्वसन देऊन भावनात्मक काम करण्याची संधी सरकारने दिली होती मात्र त्यांनी आर्थिक भरभराट करून घेण्यावर भर दिला आणि झोडपट्टीवर मोठे झालेल्या बिल्डर लॉबीशी समझोता केला.
इतक्या भावनिक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकाला आर्थिकतेपुढे हात टेकावे लागले.मूळात बिल्डर लॉबीच्या विळख्यात मुंबई सापडलिय.फटाफट श्रीमंत व्हायचं असेल तर दोन वर्षे झोपडी पुनर्वसन करा आणि बिल्डर लॉबीला हाताशी धरून स्वतःचे आर्थिक पुनर्वसन करून घ्या असेच ते क्षेत्रं आहे.
मुंडेंनी आज पर्यंत तिथे काम केलेल्या सगळ्यांची चौकशी लावली पाहिजे.किती झोपडपट्याचे पानिपत झाले आणि बिल्डरच्या घशात किती जमिनी गेल्या याचा मागच्या 25 वर्षाचा इतिहासाचे उत्खनन केले पाहिजे.अनेक नेते कार्यकर्ते अधिकारी पदाधिकारी त्या झोपडपट्टीवर मोठे झाले पाहायला मिळतील.
पानिपतकार विश्वास पाटील निवृत्तीच्या उंबरठ्यावर तहात जिंकले आणी युद्धात हरले असे म्हणावे लागेल.लेखनात ते जिंकले असले तरी अधिकारी म्हणून ते सपशेल फेल ठरले असेच यावरून दिसते..

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034