झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण चे माजी अध्यक्ष श्री विश्वास पाटील यांचे विरुद्ध आमची तक्रार

ALERT CITIZENS FORUM OF INDIA
A7/303,  Saket CHSL, Saket Marg, Thane (W) 400601 # 8879528575



७ जुलाई २०१७

प्रति,

अतिरिक्त पोलिस आयुक्त,
भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो,
(Anti Corruption Bureau),
वरळी, मुंबई ४०००३०

महोदय,

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण चे माजी अध्यक्ष श्री विश्वास पाटील यांनी आपल्या नोकरीच्या शेवटच्या एका आठवड्यात केलेल्या भ्रष्टाचार आणि संशयास्पद गैरव्यवहार  यांची आपल्या कार्यालयात सर्वप्रथम तक्रार अॅलर्ट सिटीझन्स फोरम तर्फे आम्ही केली होती .
नंतर इतर मिडियावाल्यांनी तो विषय लावून धरला. 
आता मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विश्वास पाटील यांच्या विवादास्पद निर्णयांना  स्थगिती आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. 

तरी यासंबंधात आमची आपणास खालील प्रमाणे विनंती आहे:

1) श्री विश्वास पाटील आणि त्यांच्या दलाल चार्टर्ड अकाऊंटंटचे मोबाईल फोनचे गेल्या महिनाभरातील रेकाॅर्ड तपासल्यास अनेक रहस्यांचा उलगडा होईल. 

2) विश्वास पाटील यांच्या कार्यालयातील येणा-या व्यक्तींच्या नोंदींचे रजिस्टर व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले तर संशयास्पद गैरव्यवहारांतील व्यक्तींचे धागेदोरे मिळतील. 

3) विश्वास पाटील यांच्या केवळ शेवटच्या एका आठवड्यातील नव्हे तर पदभार स्वीकारला तेव्हापासून निवृत्ती  पर्यंत सर्व निर्णयांना स्थगिती आणि चौकशी आवश्यक आहे. 

4) विश्वास पाटील यांनी नियम आणि कायदे पायदळी तुडवित तात्पुरते "लेटर ऑफ इंटेंट" (LOI) देऊन "मलई" खाल्ली त्याची चौकशी व्हायला हवी. 

5) विश्वास पाटील यांची बायको चंद्रसेना पाटील या मे. शाह अँड जैन कन्स्ट्रक्शन आणि मे. Rockline Properties  या कंपन्यात भागीदार असून यातील त्यांच्या गुंतवणुकीची चौकशी करायला पाहिजे. 

6) सौ.चंद्रसेना विश्वास पाटील या मे. जुहू बीच कार्पोरेशन या कंपनीत डायरेक्टर असून याच कंपनी मार्फत जुहू मध्ये पटेल वाडी येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे. 

7) विश्वास पाटील हे मुंबई उपनगर जिल्हाअधिकारी असताना त्यांनी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्याशी संबंधित कंपन्यांना गैरमार्गाने भूखंड दिले त्यांची चौकशी होण्याची गरज आहे. 

8) विश्वास पाटील आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांच्या बेहिशेबी आणि बेनामी मालमत्तेची एसीबी कडून चौकशी करण्यात यावी.

9) महाराष्ट्र विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात विश्वास पाटील यांच्या घोटाळ्यांवर आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडावी अशी  मी अनेक आमदार मित्रांना विनंती केली आहे. 

10) विश्वास पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आणि कंपन्यांच्या माध्यमातून केलेल्या  " Money Laundering"ची तुलना भुजबळ यांच्या "स्कॅम"शी करावी लागेल. 

तरी आमच्या वरील सूचनांची योग्य दखल घेऊन आपण कारवाई कराल या विश्वासासह,

आपला सहकार्येच्छू,

अॅलर्ट सिटीझन्स फोरम आँफ इंडिया साठी,

दयानंद नेने
अध्यक्ष

CC : श्री पराग अळवणी, आमदार
- कृपया वरील विषयात विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावा ही विनंती.
दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained