त्यांच्या हातून सत्ता गेली...

त्यांच्या हातून सत्ता गेली...
जातीची ढाल करून उभारलेल्या आंदोलनातुन मुख्यमंत्र्यांचा बळी घेण्याचा डाव सपशेल फसला...
लाख युक्त्या केल्या तरी फडणवीस काही केल्या मुख्यमंत्री पदावरून हटत नाही. हेलिकॉप्टरला एवढा अपघात होऊनही मरत नाही...
पारदर्शक कारभारामुळे मित्रपक्षाला मलाई खायला मिळत नाही...
काही मित्रपक्षातील लोकांना माझ्या कनिष्ठ सहकार्याला मंत्रीपद मिळालं पण मला नाही, हा पोटशूळ सलतो आहे...
काही अपक्ष आमदारांनी तर मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची सुपारीच घेतलेली आहे...
लोकांमधील आपली विश्वासार्हता संपली आहे, त्यामुळे आपल्याला कुणी भीक घालत नाही, संघर्ष यात्रेचाही फज्जा उडाला...
म्हणूनच आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्याचे नाव घेऊन नवे चेहरे पुढे करून शेतकर्याला सॉफ्ट टार्गेट करून स्वतःचे डाव साधले जात आहेत...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पडद्याआडून सर्वाधिक प्रमाणात हालचाली करत आहे. कारण सत्तेशिवाय या पक्षाचं अस्तित्व शून्य आहे...
आजवर कुठच्या सरकारने ५०५०/- या भावाने इतकी प्रचंड तूर खरेदी केलेली आहे, जरा आपल्या काळातील कामगिरी सुद्धा तपासून बघा...
अरे, मंत्रालयाला घेराव करा,
सभागृहात सरकारला जाब विचारा,
मुख्यमंत्री, कृषिमंत्री व सहकारमंत्र्यांशी चर्चा करा,
आझाद मैदान किंवा जंतरमंतरवर तीव्र आंदोलन करा, सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाग पाडा...
पण शेतकऱ्यांची माथी भडकावून, त्यांना संपावर पाठवून त्यांच्या पोटावर लाथ का घालता?
संपावर जाणाऱ्या शेतकऱ्याचं दूध, फळं व भाजीपाला तुम्ही विकत घेणार आहेत का...?
मग निदान सिंचनाचा, लवासाचा पैसा शेतकऱ्यांसाठी बाहेर काढून त्यांना सढळ हाताने मदत तरी करा...
पडद्याआडून तुमची काय नाटकं चाललीत हे काय जनतेला कळत नाही, असं तुम्हाला वाटतं का...?

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034