शेतकरी संप

शेतकरी संप
राज्यात विरोधी पक्षाने शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यात संघर्ष यात्रा काढली. ही संघर्ष यात्रा सहल होती, गेट टुगेदर होते. या बद्दल विविध तर्क काढता येवू शकतात.संघर्ष यात्रेला अपेक्षीत यश मिळाले नाही.
आज सत्तेपासून दूर असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीसारखे राजकीय पक्ष याआधी सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करायचे ही वस्तुस्थिती संपामध्ये सामील झालेल्या सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे कारण आजपासून सुरु झालेल्या या शेतकरी संपाच्या निमित्ताने राज्यात नवे राजकारण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जे मराठा मोर्चाच्या मालिकेने साध्य झाले नाही, जे 'संघर्ष यात्रे' च्या माध्यमातून जमले नाही, ते राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न शेतकरी संपाच्या निमित्ताने होऊ शकतात. यासाठी राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी सजग राहिले पाहिजे.

Comments