गेली ६० वर्ष काँग्रेस ची सत्ता होती तेव्हा शेतकरी कर्जबाजारी नव्हता का...?

ऐन पेरणीच्या वेळेला शेतकर्यांना संपासाठी प्रवृत्त करणारे नेते नंतर त्यांचे नुकसान भरुन देणार आहेत का.. समाजामध्ये ठिणगी टाकुन मजा बघणारे बहुतेक नेते त्या त्या क्षेत्रातील "शिक्षणमहर्षी" आहेत.. त्यांनी केलिये का फी माफी शेतकर्यांच्या मुलांना? अहो इतके वर्ष कृषिमंत्री कोण होते जाणता राजा मिरवणारेच ना... गेली ६० वर्ष काँग्रेस ची सत्ता होती तेव्हा शेतकरी कर्जबाजारी नव्हता का...? शेतकरी आत्महत्या करत नव्हते का...? मग गेली अनेक वर्ष जे झोपी गेलेली लोक अचानक जागे झाले कसे..?

यासाठी मी माझ्या शेतकरी बांधवाला जबाबदार नाही धरणार....पण मला शेतकरी जणांना इतकच सांगायच आहे आज जे जे लोक संप करायला प्रवृत्त करत आहेत किंवा पाठिंबा देत आहेत ते सत्तेत असताना कधी तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का..?
आपल्या देशात शेती आणि शेतकरी हा इमोशनल विषय आहे आणि त्याला हाताशी धरून जर कोणी राजकारण करत असेल तर हे लोकांनी वेळेच जाणून घेतलेल बर....
कारण गेली ६० वर्ष सत्ता ज्या पक्षाची होती तेव्हा पण शेतकरी कर्जबाजारी होताच, आत्महत्या करत होताच...मग सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ३ वर्षात शेतकरी संपावर जातो कसा...?
यात शेतकरया चा दोष नाही पण त्याचा वापर करणारे जे आहेत त्यांना वेळीच शेतकरी आणि सामान्य जनतेने जाणून घेतलेल बर...
आज काँग्रेस-राष्ट्रवादी चे बडे नेते संपाला पाठिंबा देतात किंवा योग्य ठरवतात मग हे दळभदरी इतकी वर्ष सत्ता असताना झोपले होते का..? शेतकरी वर्गाची सर्वात जास्त वाट यांच्या सत्ताकाळातच लागली ना..?
आज शिवसेना नावाचा एक पक्ष शेतकरी संपाला पाठिंबा देतोय.. हा पक्ष म्हणजे एक हसू झालय. अहो शेतकरी संपाला पाठिंबा दयायचा आहे तर पहिले सत्तेतुन बाहेर तर पडा आणि मग करा जे करायच आहे ते..? कशाला लोकांना आणि गरीब शेतकरी जनतेला मुर्ख बनवता...
शेतकरी बांधवानो अशा प्रकारचा संप हा तुमच्या समस्यांवर उपाय ठरू शकतो का..? याचा विचार नक्की करा...
आणि जे करायच आहे ते तुम्ही शेतकरी संघटित होऊन करा, तुमच्या विचारांनी करा...
काही संघटना आणि राजकारणी तुमचा गैरवापर ना करो इतकच.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained