Posts

देवेंद्र फडणवीस यांची कसोटी

Image
देवाभाऊची कसोटी  महाराष्ट्रातील जनतेने देवाभाऊच्या पदरी इतके भरभरून दिले आहे, की आता त्यांना आमदार सांभाळण्याची कसरत करावी लागणार नाही. त्यांना स्थैर्य दिले आहे. महायुतीतील तीन पक्षापैकी एका पक्षाने जरी नंतरच्या काळात वेगळी भूमिका घेतली, तरी सरकारला धोका होणार नाही. पाच वर्षे पूर्ण करणारा, तीनदा मुख्यमंत्री होणारा, मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पुन्हा मुख्यमंत्री होणारा असे अनेक विक्रम देवाभाऊंच्या नावे नोंदले गेले आहेत. प्रशासनावर कमालीची पकड, खडा न खडा माहिती, अधिकाऱ्यांशी चांगले संबंध, माहितीचे विपुल स्त्रोत, दूरदृष्टी, देशाचा आणि जगाचा अभ्यास, महाराष्ट्राला काय हवे, काय नको याची चांगलीच जाण असे पैलू देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. त्यांच्या हाती सरकारची सूत्रे आल्यानंतर त्यांच्या कामकाजाबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. अंगावर भ्रष्टाचाराचा शिंतोडाही उडून न दिलेल्या देवाभाऊच्या मागच्या सरकारमध्ये त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे हात बरबटले असल्याचे आरोप झाले. काहींची प्रकरणे उच्च न्यायालयात गेली. अहमदाबादची वॉशिंग पावडर असल्याने अनेकांचे ‘दाग’ स्वच्छ झाले. या प...

वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे!

Image
 वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे!

Fastag charges

Image
 #FASTag  फास्टटॅग मध्ये बॅलन्स आहे पण फास्टटॅग स्कॅन होत नसेल तर ही चुकी टोल यंत्रणा, टोल प्लाझा, टोल कंत्राटदार, टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारची आहे. त्यापरिस्थितीत ते वाहन Exempted गृहीत धरून टोल (युझर फी) न घेता सोडले पाहिजे असा केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयाचे ०७ मे २०१८ चे नोटिफिकेशन आहे. हा नियम आहे.

ओपनहायमरचा डंका....

Image
 *ओपनहायमरचा डंका....* *बहुचर्चित सिनेमा ओपनहायमर आज उद्या जागतिक स्तरावर प्रदर्शित होत आहे. भव्य चित्रपटांच्या दिग्दर्शनात अग्रेसर असणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून संपूर्ण जगभर या चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोचली आहे. जगातील अनेक शहरात या चित्रपटाचे अनेक दिवसाचे बुकिंग अगोदरच फुल्ल झालेले आहे. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तर त्याचे तिकीट दर २५०० रुपयांवर पोचले आहेत. या चित्रपटाचा कथानायक ओपनहायमर हा त्याने उद्धृत केलेल्या भगवद गीतेतील वचनांमुळे भारतीयांना अधिकच परिचित झाला. द्वितीय महायुद्ध साधारण सात वर्षे चालले. त्यादरम्यान घडलेले शास्त्रीय संशोधन, राजकीय आणि लष्करी घडामोडी, अणुबॉम्बचा शोध आणि अखेरीस त्याच्याच वापराने झालेली दुसऱ्या महायुद्धाची सांगता यामध्ये ओपनहायमरचे नेमके काय स्थान होते याची पार्श्वभूमी समजून घेतल्या खेरीज या चित्रपटाचा आनंद घेता येणार नाही. अन्यथा या चित्रपटाचे स्थान अन्य रंजक चित्रपटांपैकी एक एव्हढेच राहिल. या लेखाचा प्रपंच एव्हढ्यासाठीच आहे. हा लेख म्हणजे ओपनहायमर चित्रपटाची कथा नव्हे, फार तर एक करटन रेझर एव्हढेच म्हणता येई...

अजित पवारांचे बंड - काहीं चर्चेत न आलेले मुद्दे

Image
 अजित पवारांचे बंड चर्चेत न आलेले मुद्दे १. बंडखोरांची संख्या किती? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके किती आमदार अजित पवार यांच्यासह भाजपासोबत गेले, याचा नेमका आकडा दिवसभरातील बातम्यांच्या कोलाहलातून स्पष्ट झाला नाही. ही संख्या ४० च्या घरात असावी, असा होरा काही माध्यमांनी नेहमीच्या निनावी विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने केला. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये या प्रश्नाला निश्चित असे संख्यात्मक उत्तर देण्याचे टाळले. स्वत: अजित पवार यांनीही याविषयी कोणताही दावा केला नाही. या बंडखोर आमदारांची नेमकी संख्या गुलदस्त्यात ठेवण्यात या सर्व नेत्यांचा तात्कालिक स्वार्थ असू शकतो. परंतु त्या पलिकडे जाऊन या बंडखोर आमदारांच्या संख्येविषयी अघिकृत मार्गाने माहिती घेऊन ती जनतेसमोर मांडण्याचे काम कोणत्याही माध्यमाने केले नाही. नेतेमंडळी पत्रकार परिषदांमध्ये काय सांगतात एवढ्यावरच विसंबून न राहता ही माहिती मिळविणे त्यांना शक्य होते. ते कसे ते पाहू: एखाद्याचा मंत्रिमंडळात समावेश करणे किंवा एखाद्यास वगळणे हा राज्यघटनेनुसार सर्वस्वीपणे मुख्यमंत्र्यांचा स्...

शिंदे फडणवीस सरकार चे पहिले वर्ष

Image
 शिंदे फडणवीस सरकार चे पहिले वर्ष  आज 'आपल्या' सरकारची वर्षपूर्ती होत आहे. आपल्या सरकारने या 52 आठवड्यात केलेल्या व मला आवडलेल्या 52 कामांविषयी थोडी माहिती देत आहे.. 1.) फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्म मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 20000 गावांमध्ये 6 लाख स्ट्रक्चर तयार करून गावे जल स्वयंपूर्ण केल्यावर, यंदा जलयुक्त शिवार 2.0 योजना सुरू करण्यात आली आहे. 2.) नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान योजनेच्या ₹6000 सोबत आता आपले सरकार अजून ₹6000 जमा करणार. 3.) राज्यातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी देवेन्द्र फडणवीस सरकारने सन 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेअंतर्गत दिली होती, ज्यात शेतकऱ्यांची 34022 कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन 89 लाख शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. मागील 3 वर्षांत ज्या पात्र शेतकऱ्यांना मविआ सरकारच्या काळात लाभ मिळाला नाही, त्यांना लाभ मिळवून देण्याचे आश्वासन आता देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 4.) देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या टर्म मध्ये मागेल त्याला शेततळे (दीड लाख शेतकऱ्यांना शेततळे दिली होती) दिल्यानंतर, ...

ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास : अमंग द मॉस्क्स

Image
 *ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास : अमंग द मॉस्क्स* सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया अशी सर्वत्र घोडदौड करत असलेल्या इस्लामचा गेल्या सुमारे १०० वर्षांतला प्रामुख्याने इंग्लंडमधला प्रवास आणि प्रभाव याचं वर्णन एड हुसेन या लेखकाच्या Among the Mosques: A Journey Across Muslim Britain या पुस्तकात वाचायला मिळतं. जन्माने ब्रिटिश मुस्लिम असलेल्या लेखकाचे आईवडील हे बांग्लादेशी मुस्लिम आहेत. १९६१ मध्ये त्याचे आईवडील ब्रिटनमध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. एड हुसेनचं हे इस्लामविषयक तिसरं पुस्तक असून The Islamist आणि The House of Islam या दोन पुस्तकांत त्याची पूर्वाश्रमीची जडणघडण, इस्लामकडे आकर्षित होणं, इस्लामचा अभ्यास याबद्दल तपशीलवार माहिती आहे. कालांतराने त्यातला फोलपणा कळून आल्यानंतर इस्लामचा ब्रिटनमधला प्रवास जाणून घेण्याच्या दृष्टीने केलेला प्रवास सद्य पुस्तकात पाहावयास मिळतो. या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखकाने युकेमधील महत्वाच्या मुस्लिमबहुल शहरांमधून प्रवास केला, तेथील सामान्य नागरिक, प्रमु...