दोन भाऊ एकत्र आणि आता महाराष्ट्रात भयंकर राजकीय उलथापालथ होणार... हे पेड मराठी मिडीयाचे दावे ऑलमोस्ट फोल ठरलेले आहेत. एकत्र येऊन काम करण्यापेक्षा ते दोघंजण एकमेकांना टाळतांनाच दिसत आहेत :
यामुळे महायुतीविरोधक बावचळलेले असावेत, आणि मिडीया सुद्धा. माझा एक तथाकथीत निष्पक्ष (म्हणजे लेफ्ट विंग च्या दिशेनेच जाणारा) मित्र आहे तो काल म्हणाला
" हे कट कारस्थान देवेंद्र फडणवीसांचंच आहे, उद्धव ठाकरेंना पुरतं संपवायचा हा मास्टर प्लॅन आहे "
मला हसायला आलं... म्हटलं राजकीय भुकंपांचं श्रेय बारामतीकडून आता नागपूरला कसं शिफ्ट झालं ?? तुम्हा सगळ्यांनाच आठवत असेल एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रात बैल गाभण अशी बातमी आली तरी श्रेय साहेबांचंच असायचं, त्यांच्या धोरणांचं असायचं.... आणि आता ? सबकुछ अकेला देवेंद्र ???
उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली यात काहीच आश्चर्य नव्हतं. शिवसेनेतला एक विशिष्ठ कंपू इतर कुणालाही आपल्या बरोबरीत येऊ देत नव्हता हे गेल्या ५० वर्षात आम्हीही पाहीलंच आहे. बाळासाहेब ठाकरेंचं प्रभावी नेतृत्व होतं तो पर्यंत हे ठीक चाललं. त्यालाही कारण बाळासाहेबांचं परफेक्ट टेकींग आणि सामान्य शिवसैनिक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांच्यशी भावनेनं जोडलं गेलेलं असणं हे कारणीभूत होतं. उद्धव ठाकरे सर्वेसर्वा झाल्यावर शिवसेनेचा कारभार कॉरपोरेट कंपनीसारखा सुरु झाला. सब कुछ प्रधान कार्यालय हा प्रकार कुठेतरी शिवसेना पोखरत गेला आणि ग्राउंड लेव्हल ला, शिवसैनिकांशी कनेक्टेड एकनाथ शिंदेंनी मग शिवसेनेवर घातक प्रहार करुन आम्ही काय आहोत हे दाखवून दिलं.
राज ठाकरेंनी वेगळीच चुल मांडल्यामूळे त्यांना मी यात सहभागी करुन घेत नाहीय़े.
शिवसेनेप्रमाणेच अभंग वाटणारा एक प्रभावी पक्ष म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस. शरद पवार म्हणजे बाळासाहेबांप्रमाणेच सर्वेसर्वा. जिथे शरद पवार आपल्या कन्येचंही ऎकत नाहीत ( जे सुप्रिया सुळेंनी स्वत: फुशारकी मारत कबूल केलेय ) तिथे बाकीच्यांची काय कथा ? या डावलल्यामूळेच अजित पवार त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडत बाहेर पडले.
आता मुळ मुद्दा .... जर हे तिनही प्रकार देवेंद्र फडणवीसांनी करुन आणले असतील तर ते पवार साहेबांपेक्षा अनेक पट वरचढ ठरतात की नाही ? ज्या पक्षांची फडणवीसांनी शकलं केली आणि मी पुन्हा येईन हे ताकदीनं सिद्ध केलं ते पाहता फडणवीसांनी, त्यांच्यावर, त्यांच्या पत्नीवर, मुलीवर या मंडळींनी जी अश्लाघ्य भाषेत निर्भत्सना केली त्याचा खणखणीत बदला घेऊन मी सडकछाप भाषणं देणारा नसून करेक्ट कार्यक्रम करणाराच आहे हे सिद्ध केलं.
प्राऊड ऑफ यु देवेंद्रजी..... फक्त महावितरण याकडे वेळात वेळ काढून लक्ष द्या. आजही प्रगत महाराष्ट्रात काही भागात रोज ८-१० वेळा लाईट जात असतात. ये अच्छी बात नही है....
Comments
Post a Comment