*भोंगे बंद - ध्वनि प्रदूषणाविरुद्ध निर्णायक पाऊल – देवेंद्र फडणवीस यांची एक दुर्लक्षित राहिलेली कामगिरी*
*भोंगे बंद - ध्वनि प्रदूषणाविरुद्ध निर्णायक पाऊल – देवेंद्र फडणवीस यांची एक दुर्लक्षित राहिलेली कामगिरी*
• मुंबईसारख्या महानगरात वेगवेगळ्या धर्मीयांची श्रद्धास्थळं, विविध प्रथा आणि सामाजिक घडामोडी एकाच वेळी चालू असतात.
• अनेक वर्षांपासून सकाळपासून रात्रीपर्यंत लाऊड स्पीकर्सवरून आझान, प्रार्थना, प्रवचने, भोंगे ऐकू येणं हे मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला होता.
• परंतु, गेल्या काही आठवड्यांपासून एक लक्षणीय बदल जाणवतो — अनेक मशिदींमधून, दर्ग्यांमधून (आणि इतरही ठिकाणांहून) येणारा लाऊडस्पीकरचा आवाज अचानकच बंद झाला आहे.
• हे केवळ एखाद्या भागापुरते मर्यादित नाही. वृत्तपत्रांमधूनही स्पष्ट झालं आहे की संपूर्ण मुंबईमध्ये, सर्व धर्मीयांच्या स्थळांवरील लाऊडस्पीकर्स पोलीस प्रशासनाने बंद केले आहेत — आणि हे कोणताही सामाजिक तणाव न होता, अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धपणे झाले आहे.
• मुंबई पोलिसांनी हेही सांगितले आहे की, हे लाऊडस्पीकर पुन्हा सुरू होणार नाहीत याची खबरदारीही पुढे घेतली जाईल.
• ध्वनिप्रदूषण थांबवणे, हे आरोग्याच्या दृष्टीने आणि शहरी जीवनशैलीच्या दृष्टीने फारच महत्त्वाचं आहे. आता प्रश्न असा आहे की, हे पाऊल नेमकं कोणी उचललं?
• कोणी म्हणेल की राज ठाकरे यांच्या भाषणामुळे ही हालचाल झाली, पण त्यांनी स्वतः काही लाऊडस्पीकर बंद केलेले नाहीत. ना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने, ना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने, ना एकनाथ शिंदे यांच्या सरकारने थेट ही कृती केली.
• खरं पाहिलं, तर मुंबईतल्या हजारो लाऊडस्पीकर्स बंद होण्यामागे निर्णायक पाऊल उचलले ते राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहखाते सांभाळणारे *देवेंद्र फडणवीस* यांनी.
• मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की, फडणवीसांनी ही ठोस कृती करूनही ना कुणी त्यांचे कौतुक करतं, ना त्यांना श्रेय देतं. उलट, त्यांच्या कार्यात जात आडवी येते — हीच आपली सामाजिक विसंगती.
• राजकारणात जेव्हा कोणतीही हालचाल सामाजिक तणाव न घालता, नियोजनपूर्वक आणि कायद्यानुसार केली जाते आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला मिळतो, तेव्हा त्याचे स्वागत होणे आवश्यक आहे.
• हे लक्षात घ्यायला हवे की, ध्वनिप्रदूषण थांबवणे हे केवळ धर्मनिरपेक्षतेचे नव्हे तर नागरी आरोग्य व पर्यावरणाचेही मोठे कार्य आहे. आणि ते कोणीही केले असते, तरी त्याचे कौतुक झाले असते.
• पण फडणवीस हे 'त्या' विशिष्ट जातीतले असल्यामुळे अनेकांना त्यांच्या नावाचे समर्थन करता येत नाही — हे खरे सामाजिक विडंबन आहे.
तरीही कोणतीही अपेक्षा न ठेवता, महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी आणि सामान्य माणसाचे जीवन सुखकर होण्यासाठी कार्यरत राहणारा हा मुख्यमंत्री आपल्या कामात सातत्याने गुंतलेला आहे — हे निश्चितच उल्लेखनीय आहे.
देवेंद्र फडणवीस - तुस्सी ग्रेट हो ✔️
- दयानंद नेने
18/7/25
Comments
Post a Comment