ठाकरे स्मारक समितीवर नियंत्रण कोणाचे ?* ...

 *ठाकरे स्मारक समितीवर नियंत्रण कोणाचे ?*


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे यथोचित स्मारक मुंबईत बनावे म्हणून सप्टेंबर 2016 साली फडणवीस यांनी सरकारी अध्यादेश काढून एक शासकीय विश्वस्त संस्था गठीत केली व मुंबईचे महापौर निवास या संस्थेला मोफत सोपवले.

 या समितीचे  सदस्य उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वास्तुरचनाकार प्रभू, पूनम महाजन, देसाई , तसेच पदसिध्द सभासद म्हणून राज्याचे मुख्य  सचिव व इतर 3 वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. दोन सभासद असे असतील ज्यांची मुदत 5 वर्षे असेल. याचा अर्थ ठाकरे पिता पुत्र या संस्थेचे आजीवन सदस्य असतील. 

  महापौर निवास मुंबईतील सर्वात मोक्याच्या ठिकाणी आहे व या बंगल्याचा आकार बघता त्याचा बाजार भाव काही हजार कोटी असेल. सरकारने हे मोफत दिल्यावर त्या समितीवर ठाकरे परिवार आजीवन सभासद कसा राहू शकतो ? 

मोक्याची मालमत्ता मागील दाराने परिवाराला आंदण द्यायचे कारण काय ? 

या समितीवर सभासद म्हणून पदसिद्ध मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री का ठेवला गेला नाही ? 

एरवी हा वादाचा विषय झाला नसता पण काल उद्धव ठाकरे यांनी केलेली वक्तव्ये बघून ते स्मारकाचे सर्वेसर्वा आहेत याच तोऱ्यात वावरत आहेत असे दिसते. 

उद्घाटनाला कोणाला बोलवायचे हे ते एकटे ठरवणार आहेत का ?

 बाकी सभासद फक्त रबर स्टॅम्प म्हणून घेतले आहेत का ? 


बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा उद्धव ठाकरे यांना पेलला नाही. जनतेने विधानसभेत मतदान करताना हिंदूद्रोही आणि मुंबईद्रोही ठाकरे परिवाराला, आरे जंगलात पाठवून दिले आहे.  बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पूर्णपणे राज्य सरकारच्या पैशाने बनत आहे व राज्याची जनता त्याची अप्रत्यक्ष विश्वस्त आहे. राज्याचा विद्यमान मुख्यमंत्री असेल तोच या संस्थेचा अध्यक्ष हवा. सरकारने त्वरित नवा अध्यादेश काढून, ठाकरे परिवाराची समिती सदस्य म्हणून हकालपट्टी करावी. त्या आधी, खाजगी विश्वस्त संस्था स्थापन करून त्या जमिनीचे बाजार भावाने ठाकरे परिवार पैसे भरणार असेल तर योग्य मुदत देवून त्यांना तशी मुभा द्यायला हरकत नाही. 


मुंबई मेट्रो दहा हजार कोटींच्या खड्ड्यात घालणाऱ्या ठाकरे परिवाराला महापौर निवास, स्मारकाच्या नावाखाली आंदण द्यायची काहीही गरज नाही. फडणवीस साहेब, तुमची मैत्री तुम्ही व्यक्तिगत पातळीवर खुशाल निभावा, त्यासाठी जनतेचा पैसा अजिबात उधळू नका. 


#CMOMaharashtra 

#DevendraFadnavis

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034