देवेंद्र जी आता तरी मोदी जींची मूळ स्वप्न साकार करा

 *देवेंद्र जी आता तरी मोदी जींची मूळ स्वप्न साकार करा*



• 2014 मध्ये देशभरात काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यांच्या बुजबुजलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने नरेंद्र मोदी यांच्या हाती देश सोपवला.


• "ना खाऊगा ना खाने दूंगा" अशी शपथ मोदींनी त्यावेळी घेतली होती 


• महाराष्ट्रात सुद्धा त्यावर्षी जनतेने भाजपाला भरभरून यश दिले. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सोबत घेत पाच वर्षे उत्तम रित्या सरकार चालवले.


• 2014-19 केंद्रात आणि महाराष्ट्रात कोठेही सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. केंद्रात तर मोदींना आता अकरा वर्ष झाली पण त्यांच्या सरकारच्या एकाही मंत्र्याने भ्रष्टाचार केल्याची एकही घटना समोर आलेली नाही. आणि त्याची पोच पावती म्हणून लोकांनी मोदींना सलग तीन वेळा निवडून दिले आहे.


• महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मात्र भ्रष्टाचार केला नाही पण एक एक करून भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेतले आहे. राज्यात सर्वत्र पक्ष वाढवायचा असेल तर असे करावे लागते आणि एवढे आरोप पुरावे होऊनसुद्धा जनता अशा नेत्यांना वारंवार निवडून देते तर आम्ही काय करायचे असे वक्तव्य करून फडणवीस यांनी अनेकदा आपली राजकीय अपरिहार्यता जाहीर केली आहे.


• फडणवीस साहेब, नवं वर्षात आपल्याला एक हात जोडून विनंती आहे की "ना खाऊगा ना खाने दूंगा " हा मूळ मोदी मंत्र तुम्ही आता तरी महाराष्ट्रात लागू करा.


• मंत्र्यांपासून नाही तर किमान मंत्रालयातील सचिवांपासून तरी सुरुवात करा.


• मध्यंतरी महाराष्ट्रात ले एक नामांकित सचिव आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण केंद्रीय नेत्यांना द्यायला गेले असताचा किस्सा कानावर आला होता. त्यांच्या ऐशोआराम पद्धतीच्या जीवन शैलीबद्दल, वारंवार होणाऱ्या परदेश वाऱ्याबद्दल आणि मुलीच्या लग्नावर आणि रिसेपशन्स वर केलेल्या वारेमाप खर्चाबद्दल त्यांची कान उघडणी करण्यात आल्याचे ऐकले होते.

ही नक्कीच स्तुत्य गोष्ट आहे.


• तेव्हा फडणवीस साहेब आपल्याला विनंती : यापुढे ज्या ज्या शासकीय प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारताबाहेर जायचे असेल किंवा त्यातल्या कित्येकांना कुटुंब सदस्यांच्या नावाने व्यवसाय करायचा असेल,  गुंतवणूक करायची असेल अशा प्रत्येकाने शासनाच्या विना परवानगी असे काहीही करायचे नाही नसते हा जो शासकीय कायदा आहे त्याचे तंतोतंत पालन सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी करावे - अजिबात उल्लंघन करता कामा नये आणि त्यावर फडणवीस तुम्ही नजर ठेवावी. 


• गेल्या दहा वर्षात ज्यांनी परदेश प्रवास व्यवसाय व गुंतवणूक केली आहे त्यांनी त्याची तपशीलवार माहिती व पुरावे शासनाकडे सादर करण्याचे आदेश जर फडणवीसांनी काढले किंवा काढावेत तर मला वाटते राज्यातले कितीतरी सरकारी अधिकारी कर्मचारी एकतर तुरुंगात जातील किंवा थेट घरी बसतील...


• फडणवीस असे करण्याची हिम्मत दाखवून महाराष्ट्रातली भ्रष्टाचारा ची कीड काढण्याचे पाऊल उचलतील की पुन्हा शेपूट घालून "राजकीय अपरिहार्यतेचा " राग आलापतील हे येणारा काल दाखवेल.


दयानंद नेने

Comments