संजय राऊत, वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांचेवर ED चा आवळला जाणारा फास - साध्या सोप्या भाषेत संपूर्ण परदाफाश
संजय राऊत, वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांचेवर ED चा आवळला जाणारा फास - साध्या सोप्या भाषेत संपूर्ण परदाफाश
इडी मागे लागण्यामागे किती मराठी माणसांची हाय आहे याची संपूर्ण कहाणी...
ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फ्लॅट आणि जमीन जप्त केली आहे. एजन्सीने 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांचा अलिबागची जमीन आणि दादर आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी मात्र ईडीची ही कारवाई मध्यमवर्गीय मराठी माणसावर हल्ला असल्याचे सांगत अशा पावलांना घाबरणार नसल्याचे सांगितले. संजय राऊत असे ही बोंबलत आहेत की त्यांचा सगळा व्यवहार 2009 साल चा आहे आणि ED सूड बुद्धीने त्यांना त्रास देत आहे.
काय आहे नेमके हे पत्रा चाळ प्रकरण? त्याचा संजय राऊत शी काय संबंध? जाणून घेऊया :
*पत्राचाळ सुरवातीला ठक्कर नावाच्या विकासकाने 2008 साली विकसित करण्यासाठी घेतली.*
त्यात म्हाडा, ठक्कर आणि सोसायटी मध्ये ट्राय करार झाला.
पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ची ( ठक्कर ची कंपनी )रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता.
*२०१० मध्ये यात अचानकपणे HDIL या कंपनी ची एन्ट्री झाली.*
HDIL (राकेश वाधवान )ची एन्ट्री झाली आणि ठक्कर गायब झाला.
*म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रिसर्वे करून, HDIL वाल्यानी १० एकर जागा कल्पतरूला विकली.*
आणि
म्हाडा वाल्यांनी सोसायटीची जागा ५४ एकर दाखवली.
गुन्हा काय होता
पत्रा चाळ परिसराचे मूळ क्षेत्रफळ (१,९३,५९९ चौरस मीटर) विकास करारनाम्यात १,६५,८०५ चौरस मीटर म्हणजे २७,७९४ चौरस मीटर कमी दाखविण्यात आले. म्हाडाच्या वाटय़ाला येणाऱ्या ५० टक्के म्हणजे १३,८९७ चौरस मीटर (तीन एकर) जागेचा विकासकाला फायदा करून दिला.
*कल्पतरुने परस्पर काम चालू करून घेतलं, पण सोसायटीच्या लोकांना इकडे बेघर करण्यात आलं...*
*करार ठक्कर सोबत असल्याने आणि तो गायब झाल्याने सोसायटी वाल्यांची पुरती कोंडी झाली .*
काही सोसायटी वाले घर सोडायला तयार नव्हते तेंव्हा ती *घरं खाली करण्यासाठी प्रवीण राऊत ची एन्ट्री झाली.*
*त्यासाठी प्रवीण राऊत याला HDIL चा डायरेक्टर बनवलं गेलं.*
परस्पर जमीन विकेलेली कल्पतरुचा तिथे टॉवर तयार झाला,
पण शिल्लक असलेल्या 54 एकर जागेवर एक वीट देखील रचली गेली नाही.
सर्व मराठी कुटुंब बेघर झाले.
*2018 ला देवेंद्र फडणवीस एका गणेश मंडळाला भेट देण्यासाठी त्या सोसायटीच्या बाजूला आले होते त्याठिकाणी सर्व सोसायटीवाले त्यांना भेटले,*
आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्या पत्राचाळ सोसायटीची चौकशी लावली. *त्यात आठवडाभरात 4 म्हाडाचे अधिकारी सस्पेंड झाले.*
• पत्रा चाळ परिसराचे मूळ क्षेत्रफळ (१,९३,५९९ चौरस मीटर) विकास करारनाम्यात १,६५,८०५ चौरस मीटर म्हणजे २७,७९४ चौरस मीटर कमी दाखविण्यात आले. म्हाडाच्या वाटय़ाला येणाऱ्या ५० टक्के म्हणजे १३,८९७ चौरस मीटर (तीन एकर) जागेचा विकासकाला फायदा करून दिल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता एस. डी. महाजन निलंबित झाले.
• देवेंद्र फडणवीस यांनी कल्पतरूला ओसी न देण्याचे आदेश दिले, जोपर्यंत रहिवाश्यांना त्यांचे घर बांधून मिळत नाहीत *तोपर्यंत ओसी न देण्याचे आदेश काढले.*
*त्यांच्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू केली.*
त्यासाठी भारतीय आर्थिक इंटिलेजन्स ब्युरो ची मदत घेतली गेली.
ठक्कर, वाधवान आणि प्रवीण राऊत हे अडकले.
EOW - इकॉनॉमिक ऑफेन्स विंग टीम ने प्रवीण राऊत ला उचलले. प्रवीण राऊतच्या चौकशीत संजय राऊत च्या पत्नीचे नाव आलं.
संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यावर वळण्यात आले होते ५५ लाख:
या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून १०० कोटी वळवण्यात आले. त्यानंतर प्रवीण यांनी ही रक्कम जवळच्या व्यक्तींच्या नावे फिरवली. यामध्ये कंपन्या, नातेवाईकांचा समावेश होता. २०१० मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील ५५ लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केलाय.
चौकशी सुरु झाल्यावर परत पाठवले हे पैसे…( एकप्रकारे गुन्ह्याची कबुली )
ईडीने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्या खात्यावर पुन्हा ५५ लाख वळवले. याच कालावधीमध्ये इतरही व्यवहार झाल्याचं ईडीने म्हटलंय.
अलिबागमध्ये आठ प्लॉट ज्यांच्या खदेरीत रोख व्यवहारही झाले :
अलिबागमधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील आठ प्लॉट हे वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावाने घेण्यात आलेले. स्वप्ना या संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत.
सुजित पाटकर यांच्यावर पुणे येथे जम्बो कोविड सेंटर घोटाळ्या संबंधी गुन्हा दाखल आहे आणि त्यात ही संजय राऊत यांचे नावं आहे.
अलिबाग व्यवहारामध्ये नोंदणीच्या रक्कमेसोबतच थेट रोख व्यवहारही झालेत. ही सर्व संपत्ती ईडीने अटॅच केली आहे.
*आणि आता संजय राऊत बोंबलत फिरत आहेत की एका बाईवर आरोप करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे.*
राऊत तुम्ही पत्राचाळीतील किती मराठी माणसांना बेघर केलं आहे ते विसरलात का? त्या सगळ्यांची हाय तुम्हाला लागली आहे.
@दयानंद नेने
(With media inputs )
Comments
Post a Comment