मी बाबासाहेब पुरंदरे यांना कधीही भेटलो नाही - जेम्स लेन

 मी बाबासाहेब पुरंदरे यांना कधीही भेटलो नाही - जेम्स लेन 

James Laine Controversial Book :  राज्यात सध्या चर्चेत असलेल्या जेम्स लेन प्रकरणात आता मोठा खुलासा झालाय. हा खुलासा दुसरं तिसरं कुणी नाही तर स्वतः जेम्स लेन यांनी केलाय . इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांना ई मेलवरून दिलेल्या मुलाखतीत जेम्स लेनने बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह  कोणीही त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी माहिती दिली नाही असं म्हटलंय. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंसोबत आपण कधीही चर्चा केली नसल्याचं जेम्स लेनने या मुलाखतीत म्हटलंय. 


2003 साली प्रकाशित झालेल्या शिवाजी, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या आपल्या पुस्तकाबद्दल जेम्स लेन यांनी मोठा खुलासा केलाय. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी ई मेल मार्फत अमेरिकेत असलेल्या लेनशी संपर्क साधून त्यांचं या वादग्रस्त प्रकरणाबाबतच म्हणणं जाणून घेतलय .


प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली ?

हा प्रश्नच मुळात चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आलाय .  बाबासाहेब पुरंदरेच नव्हे तर हे पुस्तक लिहिण्यासाठी मला कोणीही माहिती पुरवलेली नाही.  माझं पुस्तक हे या विषया बाबतच्या कथा आणि त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या विचारसरणीबद्दल आहे. उदाहरणार्थ - काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध रामदास स्वामींशी जोडतात तर काहीजण शिवाजी महाराजांचा संबंध संत तुकारामांशी जोडतात. या दोघांपैकी कोण बरोबर आणि कोण चूक हे मी या पुस्तकात सांगितलेले नाही, तर दोन्ही बाजूचे लोक अशी मतं का मांडतात याबद्दल या पुस्तकात मी लिहलंय.


प्रश्न - तुम्ही या पुस्तकात दिलेल्या माहितीचे स्त्रोत काय आहेत ?

उत्तर - जो कोणी माझे पुस्तक बारकाईने वाचेल त्याच्या लक्षात येईल की मी या पुस्तकात इतिहास सांगण्याचा दावा केलेला नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय असं ज्यांना वाटतं त्यांचा गैरसमज झालाय. कारण मी इतिहास सांगण्याचा कुठंही दावा केलेला नाही तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या इतिहासाबद्दल ज्या कथा आणि आणि प्रावाद अस्तित्वात आहेत त्याबाद्दल या पुस्तकात मी लिहलंय.


प्रश्न - तुम्ही बाबाहेब पुरंदरेंसोबत कधी या विषयावर चर्चा केली होती का? आणि केली असेल तर त्यांचं या विषयावर काय मत होतं.

उत्तर - मी बाबासाहेब पुरंदरेंसोबत कधीही चर्चा केलेली नाही .


प्रश्न - जेव्हा तुम्हाला या पुस्तकातील मजकुराबाबत माफी मागावी लागली आणि तो मजकूर मागे घ्यावा लागला तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना होता.

उत्तर - मी या पुस्तकातील मजकुराचे लेखन करताना पुरेसा सावध नव्हतो आणि त्यामुळे इतरांना त्रास सहन करावा लागला याचं मला दुःख आहे .


सौजन्य : किरण तारे, इंडिया टुडे

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034