*चित्रपटगृहात खुशाल घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ*
*चित्रपटगृहात खुशाल घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ*
चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणे कायद्याने गैर आहे, असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ग्राहकाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजे, असे सांगत देशपांडे म्हणाले की, आता ग्राहकांनी भांडकुदळ होण्याची गरज आहे. सिनेमागृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्याबाबत बंदी नाहीच. चित्रपटगृहातील द्वारपालाने मागणी केल्यास त्यांना बाटलीतील पाणी किंवा घरून नेलेल्या अन्नपदार्थांबाबत खात्री करून दिल्यास कोणतीही अडचण नाही, तरीही अडवणूक केल्यास ग्राहकांनी नियम विचारला पाहिजे. यासंदर्भात ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी; तसेच ग्राहकांची फसवणूक होत असल्यास, अतिरिक्त शुल्क, खराब दर्जाचा माल किंवा योग्य सेवा मिळत असल्यास त्याबद्दल तक्रार करून संबंधितांवर योग्य कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणेला माहिती द्यावी, असेही देशपांडे यांनी सांगितले.
चित्रपटगृहात फलक लावणार
चित्रपटगृहात प्रेक्षकांनी स्वतः जवळच्या पाण्याच्या बाटल्या, घरगुती खाद्यपदार्थ नेण्यास प्रतिबंध करता येणार नाही. यासंदर्भातील सूचनाफलक येत्या १५ दिवसांत प्रत्येक चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले.
ग्राहक संरक्षण विभाग Food Civil Supplies and Consumer 02402334310 (औरंगाबाद)
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय दूरध्वनी क्र. २२०२५३०० २२०२४६८८ २२०२७०७५ २२०२५२७७ मुंबई
Comments
Post a Comment