आपल्या देशातील सर्वात जातीयवादी नेता म्हणजे जाणता साहेब होय...

आपल्या देशातील सर्वात जातीयवादी नेता म्हणजे जाणता साहेब होय...
बाबासाहेब पुरंदरे यांनी सारे आयुष्य शिवरायांच्या अभ्यासासाठी वाहून घेतले . बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास फक्त महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात नेला . मात्र फक्त बाबासाहेब ब्राह्मण असल्याने जाणता साहेबांनी त्यांना महाराष्ट्र भूषण देण्यास विरोध केला. श्री जितेंद्र आव्हाड यांनी तर अतिशय हीन भाषेत बाबासाहेबांचा अपमान केला.
संभाजी भिडे गुरुजी यांच्या रक्तात, श्वासात फक्त शिवराय आहेत. देशात शिवाजी संभाजी रक्तगटाचे तरुण तयार करण्यासाठी गुरुजी अहोरात्र झटतात. शिव प्रतिष्ठाण ने शिवरांयांचे ३२ माण सिंहासन पुन्हा प्रस्थापित करण्याचा संकल्प सोडलेला आहे. गुरुजी गेले कित्येक दशके पायात चप्पल घालत नाहित, का तर ह्या शिवरायांच्या पुण्यभूमीला चपल्लीचा स्पर्श नको.
गुरुजी म्हणजे आजच्या काळातले संत तुकाराम, संत रामदास. पण अशा गुरुजींचा विरोध जाणते साहेबांनी स्वतः आणि स्वतःच्या पिलावळांमार्फत वारंवार करत असतात कारण ते ब्राह्मण आहेत.
राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचे आंदोलन केले असताना " तुमच्या जातीच्या लोकांचे कारखाने चालू आहेत" असे जाणते साहेबांनी स्वतः म्हटले होते.
राम गणेश गडकरी ( नावातच राम आहे, राम क्षत्रिय होता ब्राह्मण नाही ) यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानावर 'राजसंन्यास' हे नाटक लिहिले होते. मात्र त्याच गडकरींचा पुतळा थर्ड क्लास ब्रिगेडींनी फोडला. त्या ब्रिगेड चे कोकाटे, प्रवीण गायकवाड हे जाणते साहेबासोबत एकाच व्यासपीठावर नेहमीच दिसतात.
२०१४ निवडणुकीला 'चड्डी वाल्यांच्या ताब्यात देश देणार का' म्हणून जाणते साहेब यांनी संघाच्या नावाखाली ब्राह्मणांना टार्गेट केले (अर्थात ह्याचा कोणताही परिणाम नाही झाला. भाजप चे २८२ तर NCP फक्त २ खासदार निवडून आले )
भाजप ने कोल्हापूर च्या संभाजी महाराजांना खासदारकी दिली. शिवरायांचे वंशज खासदार झाली हि तर चांगली गोष्ट आहे. पण जातीयवादी जाणते साहेब म्हणाले ,' आधी भोसले हे पेशवे निवडायचे आता पेशवे हे भोसले निवडतायत' म्हणजे कसा ब्राह्मण समाज मराठ्यांच्या पेक्षा मोठा होतोय.
एक शिवभक्त म्हणून शिव कार्य केलेल्या बाबासाहेब पुरंदरे, भिडे गुरुजी सारख्या लोकांचा अपमान सहन करणे शक्यच नाही. शिवरायांनी आपल्या देश/ धर्मासाठी केलेल्या कार्यासाठी ते वंदनीय आहेतच.
तसेच आणि तसेच बाजीराव हि पूजनीय आहेत, मल्हारराव, शिव काशीद किंवा बहिर्जी नाईक हे सर्वजण तेवढेच वंदनीय आहेत. त्यांची जात कोणती हा विषयच येत नाही. सर्व स्वराज्याचे शिपाई आहेत..
असे म्हणतात कि दुष्ट राजाचे साम्राज्य संपू लागले कि तो अजूनच दुष्ट बनू लागतो. तसेच जाणता साहेबाला ठाऊक आहे कि जनता आता आपल्याला पुन्हा सत्ता देणार नाही.
त्यामुळेच जाणते साहेब दिवसेंदिवस अजूनच जातीयवादी होत चाललेत...

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034