नेहरूंचा १९६१चा अमेरिका दौरा, केनेडींच्यालेखी नेहरू संपल्याचा उल्लेख

नेहरूंचा १९६१चा अमेरिका दौरा, केनेडींच्यालेखी नेहरू संपल्याचा उल्लेख आणि आपल्याकडील विश्वंभर चौधरी-राज कुलकर्णी ही झंपूंची जोडगोळी
.
विश्वंभर चौधरींचा नेहमीचा दळभद्रीपणा ओंकार दाभाडकर यांनी छान चव्हाट्यावर आणला. मागे नेहरूंना विमानतळावर भेटायला स्वत: अध्यक्ष केनेडी गेले आणि आता मोदी तिकडे गेल्यानंतर मात्र कोणा सटरफटर अधिकार्‍यांना त्यांच्या स्वागतासाठी पाठवल्याचे फोटो काँग्रेसवाल्यांनी फडकावले. म्हणजे थोडक्यात मोदींना ट्रम्पनी कसे कचर्‍यात काढले हे दाखवण्याचा काँग्रेसींचा खटाटोप. आता याच दौर्‍यात नेहरूंनी स्वत:ची कशी शोभा करून घेतली होती हे पहायचे.

अशा पोस्ट म्हणजे राज कुलकर्णींसारख्या भंपक काँग्रेसींना मेजवानीच. एरवी नेहरूंच्याबाबतीत कोणी असे फोटोफडकावले की थेट तत्वज्ञानावर घसरणारे कुलकर्णी असे खोडसाळ फोटो फडकावल्याबद्दल चौधरींना ऐकवण्याची शक्यता नसतेच, उलट ते स्वत:च या मुर्खांच्या बगिच्यात बागडू लागतात.
तर ज्या अमेरिकाभेटीमध्ये नेहरूंना भेटायला केनेडी स्वत: विमानतळावर गेल्याचे फडकावले जात आहे, त्याच भेटीत केनेडींशी प्रत्यक्ष चर्चेत नेहरूंनी स्वत:ची काय शोभा करून घेतली होती, हे दाखवणार्‍या डेनिस कुक्स यांच्या 'India and The United States: Estranged Democracies 1941 - 1991' या पुस्तकातील काही उतारे खाली देत आहे. हे उतारे खाली कमेंटमध्ये दिले आहेत.
नेहरूंशी होणार्‍या चर्चेत काहीतरी हाताशी लागेल अशी अपेक्षा असताना हातात केवळ धुकेच आले, म्हणजे काहीच निष्पन्न झाले नाही अशा अर्थाचे त्यावेळचे केनेडींचे शब्द आहेत. या भेटीत केनेडींनी नेहरूंकडून व्हिएतनाम प्रश्नावर त्यांचे मत मागितले, तरी यांच्या तोंडून कसा शब्द फुटला नाही, काश्मिर प्रश्नावरही हे कसे गुळमुळीत बोलले, स्वत: बी. के. नेहरूंनी या भेटीनंतर केनेडींनी नेहरूंना मोडीत काढल्याचे ठरवले या सर्वांचा उल्लेख आहे. स्वत: केनेडींनी एखाद्या पाहुण्याचा सर्वात वाईट दौरा असल्याचे म्हटल्याचाही यात उल्लेख आहे.
आता असे कसे झालेच नाही हे दाखवण्यात राज कुलकर्णीसारख्या भंपक नेहरूवियननी आपली विद्वत्ता खर्च करावी.
१९५८पासूनच्या काळात आपल्या बुडाला पंतप्रधानपदाची खुर्ची आमरण चिकटलेली अाहे अशा समजुतीत असलेले भारताच्या पंतप्रधानपदी नेहरू नावाचे एक बुजगावणे बसलेले होते आणि आपल्याशिवाय या देशाला काही पर्यायच नाही या भ्रमात राहून या देशाचे अपरिमित नुकसान केले हे या देशातले विदारक वास्तव होते. स्वातंत्र्यांनंतर काश्मीर प्रश्नात देशाचे केलेले नुकसान तर वेगळेच.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained