BJP आणि कॉंग्रेस - फरक नक्की वाचा...

BJP आणि कॉंग्रेस -  फरक नक्की वाचा...



*हल्ली काही जण, "काँग्रेसने गेल्या पासष्ठ वर्षाच्या सत्ताकाळात काय काय केलं हा हिशोब देतायत...!!*


*ह्या समस्त ''दाणापाणी बंद'' झालेल्या काँग्रेसच्या काॅपी-पेस्टवाल्यांना एकच प्रश्न आहे ...!!*


*भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या इतर देशांशी तुलना करून बघितलीत का हो कधी ..??* 


*अर्थात त्याचा फाॅरवर्डेड मेसेज कुणालाही आला नसेल म्हणून सांगतो ..!!*


*भारत स्वतंत्र झाला, त्याच सुमारास/त्या आधी दोन वर्ष चीन, जपान आणि जर्मनी ह्यांनी शुन्यातून पुन्हा उभं राहायला सुरवात केली होती ..*

*सिंगापूर तर आपल्याबरोबरच स्वतंत्र झाला ..!!*


*आज ह्या चार देशांची स्थिती आणि भारताची स्थिती ह्यात जमीन -अस्मानाचा फरक आहे, हे तरी मान्य कराल की नाही ...??*


*मग मला सांगा, इतक्या वर्षात आधी नेहेरू, मग इंदीराबाई, मग राजीव, पुढे नरसिंहराव नी आता शेवटी चे मनमोहनसिंग इतक्या सगळ्या 'महान' नेत्यांमधल्या एकालाही कां वाटलं नसेल की प्रत्येक घरात वीज पोहोचवावी ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल देशाची आरोग्यव्यवस्था सुधारावी ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल घराघरात गॅस यावा ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल दुष्काळ निवारणासाठी नदीजोड करावी ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल, देशात घराघरात किमान एक शौचालय असावं ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल देशातल्या प्रत्येक माणसाकडे बँक अकाउंट असावं ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल, देशातला प्रत्येक गोष्टीत चाललेला भ्रष्टाचार समुळ उखडण्यासाठी काही योजना राबवावी ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल, प्रत्येक गरीब, सर्वसामान्य माणसालाही विम्याचं संरक्षण मिळावं ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल, की जास्तीतजास्त लोकांना, स्वयं-रोजगारासाठी स्वस्तात कर्ज उपलब्ध करून द्यावं ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल की देशात अधिकाधिक परकीय गुंतवणूक येण्यासाठी, 'मेक ईन ईंडीया' सारखं अभियान राबवावं ..??*


*एकालाही का वाटलं नसेल, की देशात समान नागरी कायदा यावा ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल, की सरकारी सोयीसुविधा थेट लाभार्थ्याच्याच हाती पडतील अशी व्यवस्था आणावी ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल, की सैन्यदलाच्या शस्त्रास्त्रांच्या बाबतीत, आपला देश स्वयंपूर्ण व्हावा ..??*


*एकालाही कां वाटलं नसेल, की टेक्नाॅलाॅजीच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा ..??*


**ह्या प्रश्नांची उत्तर आहेत का कुणाकडे ..??*


*काँग्रेसनी जे केलं ते तुम्ही सांगितलंत .. तेही सोयीस्कररीत्या ..!! पण, जे जे करावयाची गरज होती, आणि जे सत्तर वर्षात, एक हाती सत्ता असूनही जमलं नाही त्याचं काय ..??*


*मला सांगा, कां आपल्या मेळघाटातल्या आणि त्यासारख्या दुर्गम भागात राहणा-या आदीवासी भावंडांची मुलं, सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही कुपोषणानं मरत होती ..?*


*कां आपले गरीब बांधव सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही, साध्या रेशनला मुकत होते ..??*


*कां देशभरातील हजारो गावं, सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही, दरवर्षी पाण्यासाठी टॅंकर वर अवलंबून होती ..?*


*का आमच्या आयाबहीणींना, सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही, रोज शौचाला जाण्यासाठी, अंधाराची वाट बघायला लागत होती ..?* 


*कां आमचे ग्रामीण बंधू, सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही, साध्या वीजेला मुकले होते ..??*


*कां सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही, आमच्या-आमच्यातच, जात, धर्म, पंथ ह्यात विभागणी होऊ देत मतांचं राजकारण केलं ..??*


*ह्याची उत्तरं देता येतील तर बघा जरा ..!!!!!*


*बाकी एक मात्र लक्षात ठेवा .. पासष्ठ वर्ष सत्ता राबवताना जर काँग्रेस नी वरील मुद्द्यांची व्यवस्थित हाताळणी केली असती तर, मोदी साहेबांना उभं राहायची वेळच आली नसती ..!!*


*ह्या देशात, काँग्रेसनी सगळ्यात जास्त काही केलं असेल तर भ्रष्टाचार ..!!*


*गरीबाच्या तोंडचा घास पळवून, स्वतःचे आणि आपल्या पित्त्यांचे खिसे भरणा-या, ह्या पांढ-या कपड्यातल्या चोरांची, तुम्ही डोळ्यावर झापडं ओढून, कितीही भलामण केलीत तरी, सर्वसामान्य माणूस आता जागा होऊन नीट विचार करू लागलेला आहे ..!!*


*त्यामुळे काँग्रेसनं काय केलं ह्यापेक्षा, काँग्रेसचं काय चुकलं, ह्याचा विचार केलात, नी त्याप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न केलात तरच, काहीतरी होऊ शकेल ..!!*


*अन्यथा कठीण आहे ..!!*

*काँग्रेसचं ..!!*


*देशातील 60 नद्या जोडून, संपूर्ण देशातील करोडो शेतकऱ्यांचं आयुष्य बदलू शकणारा, तरीही 15 वर्षे रखडलेला "नदी जोड प्रकल्प", मोदी सरकारने तब्बल 5.5 लाख कोटी खर्च करायची तयारी करून मार्गी लावलाय ..!!*


*धबधब्याच्या पाण्यासारखा पैसा विकास कामावर खर्च करणाऱ्या मोदी सरकारने, आतापर्यंत 30 लाख कोटी तर निव्वळ विकास कामांवर खर्च करायचा निर्धार करून "सबका साथ सबका विकास" हे आपलं स्वप्नं पूरं करण्याचा जणू विडाच उचललाय, आणि आम्ही रडतोय- आज भाजीच महाग झालीय उद्या पेट्रोल महाग होणार ..*


*रेल्वेसाठी पावणे दहा लाख कोटी, रस्ते, महामार्ग, बंदरे यासाठी 12 लाख कोटी, बुलेट ट्रेनसाठी 1.10 लाख कोटी आणि नदी जोडणी प्रकल्पासाठी 5.50 लाख कोटी, ही सगळी आकडेवारी, छाती दडपून टाकणारी आहे। गेल्या 30 वर्षात, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना कुठल्या सरकारने विकासावर इतका प्रचंड खर्च करताना मी पाहिलं नाही।*


*वाहतूक आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरीच हा महाकाय प्रकल्प राबवणार आहेत। क्षणाची तरी उसंत मिळत असेल का या लोकांना हा मला प्रश्न पडतो।*


*87 बिलियन डॉलर म्हणजे 5.5 लाख कोटींचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प, देशातील 60 नद्यांना जोडल्यामुळे, जिथे खूप पाऊस पडतो किंवा जिथे दुष्काळ थैमान घालतो अशा राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे ..* 


*कालवे, तलाव बांधून अतिरिक्त पाण्याचा संचय केला जाईल .. त्यामुळे सुरुवातीला महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या बीजेपी शासित शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल .. तब्बल 87 मिलियन हेक्टर जागा सिंचनाखाली येईल, आणि 34 गिगा वॉट इतकी हायड्रो-इलेक्ट्रिसिटी निर्मिती होईल ..* 

*संपूर्ण देशभर 14,900 कि.मी. लांबीच्या कालव्यांचे नेटवर्क उभे राहील, ज्यामुळे करोडो शेतकऱ्यांना, डोक्याला हात लावून, आभाळाकडे नजर लावून बसावं लागणार नाही .. लाखो हेक्टर कोरडी जमीन ओलिताखाली आल्यावर शेतकऱ्यांना नक्कीच सुगीचे दिवस येतील, यात शंकाच नाही ..*


*दुष्काळ आणि पूर परिस्थितीवर रामबाण ठरणारा हा उपाय, 15 वर्षापूर्वीच राबवला गेला असता तर आज शेतकऱ्यांवर कर्ज माफी मागायची वेळच आली नसती .. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रांशी मीटिंग करून, हा प्रकल्प युद्ध पातळीवर पुढे नेण्याच्या सूचना दिल्या आहेत .. पहिला टप्पा कर्णावती-बेतवा, दमणगंगा- पिंजळ, पार तापी- नर्मदा नदी जोडणीपासून सुरू होईल .. त्यावर 50 हजार कोटी खर्च होतील .. "राज्यात पाणी महागले " उद्योगांसाठी 50% तर शेती आणि पिण्यासाठी 17% दरवाढ" अशा नकारात्मक हेडलाईन देणारी वृत्तपत्रे, अशा लाखो कोटींच्या योजना लोकांना का सांगत नाहीत ?*


*संदर्भ - इकॉनॉमिक टाईम्स*


*निदान हे सामान्य जनते पर्यंत पोहोचवा ..*

🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034