*लॉकडाउन ५.० तसंच अनलॉक १.०*:
*लॉकडाउन ५.० तसंच अनलॉक १.०*:
*कंटेंटमेंट झोन वगळता रेड, ऑरेंज, आणि ग्रीन झोन मध्ये टप्प्या टप्प्याने निर्बंध शिथील करत गाडी पुर्वपदावर आणायच्या प्रक्रीयेला सुरुवात झाली असंच या निर्णयातून दिसतंय.*
*सुमारे ६६ दिवस कुलुपबंदीनंतर भारतासारख्या देशाची अर्थव्यवस्था हळू हळू सामान्य करण्याचा हा निर्णय अनिवार्य तर वाटतोच पण व्यक्तीगत रित्या मला तेवढाच धोकेदायकही वाटतो.. कारण एकच बेफिकीर जनता. ६६ दिवसातही सहज म्हणून गावात भटकणारे लोक सगळ्यांनीच पाहीलेत. सोशल डिस्टन्सींग साठी आखलेल्या चौकोनांची टींगल उडवणारे मी अनेकदा पाहीलेत. अशा चौकोनात उभं राहील्यावर मीच येडा ठरत होतो.*
*"सरका हो पुढे... काही होत नाहीये "*
*" एक काम करा तुम्ही खुषाल रांगेच्या शेवटीच उभे रहा* *आम्हाला जाउ द्या पुढे... आम्ही भीक घालत नाही कोरोना ला. "*
*" काही काही लोकांची कौतुकंच जास्त"*
*असले टोमणे ऎकून राग न येता मला या क्युटीया लोकांची कीव येते. कोरोना होणं हे झाल्यावरच त्याची भयानकता समजते आणि इतर वेळी कोरोनाग्रस्त कुठल्या नरकात पडलेले असतात हे क्युटीयांना माहीतच नसतं.*
*अनलॉक १.० ची सुरुवात म्हणजे कोरोना गेला, आता बिनधास्तपणे पहील्यासारखं अनिर्बंध हुंदडता येणार असं समजणार्यांना ते विषाची परिक्षा घेताहेत, सरकार ने हळू हळू नागरीकांना स्वत:ची सुरक्षीतता बाळगायची जबाबदारी दिली आहे हे लक्षात घेणं या ठीकाणी अत्यावश्यक आहे.*
*सॅनीटायझेशन,*
*हात धुणे,*
*रोजच्या रोज त्या दिवशीच्या वापरातले कपडे साबणाने स्वच्छ धुणे.*
*बाईक च्या मुठी, कारच्या दरवाज्यांचे ओपनिंग लिव्हर्स, डिक्की आणि*
*बॉनेट उघडायच्या जागा प्रत्येक युज आधी निर्जंतुक करणं*
*चपला, बुट प्रत्येक वेळी सॅनिटाईज करणं.*
*योग्य प्रकारे आपली प्रतिकारशक्ती वाढवणं*
*लोकांमध्ये मिसळतांना सोशल डिस्टन्सींग पाळणं*
*अत्यावश्यक नसेल तर पब्लीक ट्रान्सपोर्ट ने प्रवास, प्रामुख्याने लांबचे प्रवास करुच नका..*
*हे सगळं पाळायची घाउक जबाबदारी अनलॉक फेज मध्ये नागरीकांवर टाकली जातेय असा अर्थ घ्यायचा आहे. कोरोना योद्धे प्रचंड थकले आहेत हे कृपया लक्षात घ्यावं... " मग ? पोलीस कशाला आहेत ? त्यांनी पकडावं नियम मोडणार्यांना " असं म्हणणं आता आडाणचोट श्रेणीत जाईल. सगळ्या जबाबदार्या सरकार वर टाकणं मुळीच योग्य नाही. आपल्या जीवाची काळजी आपणच घेणं हेच सुज्ञ नागरीकाचं लक्षण आहे.*
*काळजी घ्या, कोरोनाला कमी समजू नका, स्वयंशीस्त पाळा आणि कोरोनायुद्धात आता प्रत्यक्ष सामील व्हा. आजवर घरी बसून रेसेपीज करुन झाल्या असतील, सिनेमे पाहून झाले असतील, वेब सिरिज बघून मनोरंजन करुन घेतलं असेल, पत्ते खेळला असाल, गाण्यांच्या भेंड्या खेळला असाल हे सगळं अगदी गरम / कोमट पाणी पीत केलं असेल पण ...... आता बाहेर पड्णार आहात तेव्हा उच्च काळजी / स्वयंशीस्त प्रत्येकाने पाळली तर आणि तरच धडधाकट रहाल नाहीतर फुकटात हिट विकेट द्याल हे नक्की.*
*महत्वाचं : पोस्ट तुमच्या आमच्या गरजेची आहे, राजकीय नव्हे. तेव्हा नुसतीच पॉलीटीकल दंगल इथे अपेक्षीत नाही. सरकार कुणाचंही असो जीव आपला स्वत:चा आहे याची जाणीव ठेवूनच व्यक्त व्हावं ही विनंती.*
Comments
Post a Comment