World Environment Day
आज ५ जून २०१६!
जागतिक पर्यावरण दिन!
जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण विश्वाने पर्यावरण वाचविण्याबाबत पुढाकार घेणे हा मुख्य उद्देश आजचा या जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागे आहे! कारण बदलत्या काळात पर्यावरणात वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड वायू,पर्यावरण रक्षक ओझोनच्या थराला पडत चाललेली जीवघेणी छिद्रे, रोजची वृक्षतोड वा जंगल सपाटीकरण, पृथ्वीच्या पोटातील संपूष्टात येत असलेली भूजल पातळी आणि या सर्वांमूळे वाढलेले वैश्विक तापमान या बाबी सध्या सर्व जगापुढे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती उभी करत आहेत! पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीला मरणाच्या दाराकडे ढकलत नेतोय!
या मागील कारणांचा शोध घेतला असला, या सर्व पर्यावरण असमतोलाला सर्वस्वी आपण म्हणजे मानवच जबाबदार आहे! सध्याच्या आधुनिकीकरणाने मानवाचे राहणीमान उंचावले आहे! मानवी वसतिसाठी जंगलेही तोडली जात आहेत! कारखानदारी व त्यासोबतच पर्यावरणाला हानीकारक ठरणा-या वस्तुंचा वापर (जसे क्लोरो-फ्लोरो-कार्बन अर्थात CFC वायू) वाढला आहे!
मूळातच झाडांची कमी होत असलेली संख्या, वाढते वायूप्रदुषण आणि पर्यावरणाचे व पर्यायाने जीवसृष्टीचे रक्षण करणा-या ओझोन थराला पडलेल्या छिद्रामूळे ग्लोबल वार्मिंग वाढते आहे. ओझोन थरामूळे गाळले अथवा शोषले जाणारे अल्ट्राव्हॉयोलेट किरण, या ओझोन थराला पडलेल्या छिद्राने सरळ जीवसृष्टीवर येवून धडकत आहेत! घनकच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुराड्यांतून तसेच वाहनांमधून होणा-या वायू उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे, जंगलांचे तसेच सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच जंगलातील व सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी ही हा आजचा दिवस महत्वाचा ठरतो!
या सृष्टीवर सर्वथैव मानवच एक मुख्य कर्ताधर्ता असल्याने हे ओझोन थराचे छिद्र, झाडे लावून व जगवून भरण्याची जबाबदारी फक्त मानवाची आहे!
ज्या भूमातेने आपल्याला जन्म दिला, जिच्या उदरातच आपली माती होणार आहे, त्या धरतीमातेची काळजी घेणे या बाबतच्या जनजागृतीसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे! ही धरती माता आपल्याला सदैव देत असते, आपण धरतीला काहीच देत नाही उलट जर धरती माता आपल्याला काही देत असेल तर आपण मूळासकट हिसकवायला बघतो!
---------------------------------------
नैसर्गिक साधन संपत्ती, मग ती संपत्ती पाणी, खनिज द्रव्ये वा कोणत्याही स्वरुपात असो; आपण धरतीच्या शरीराला खोलवर जखमा करीत ह्या नैसर्गिक साधन धरतीच्या पोटातून काढून घेतो! या नैसर्गिक साधन संपत्तीच्या रुपातील धरतीचे जणू काळीजच आपण काढून घेतो; पण धरतीला काय परत देतो? काहीच नाही!
आपल्या या स्वार्थामूळे धरती आज मलूल झालीय, निस्तेज झालीय, आजारी पडलीय! तिचा हा आजार कोण बरा करणार? तिला पुन्हा नवी उमेद कोण देणार?
उत्तर सोपे आहे, आपणच देणार! पण कधी देणार? प्रत्येकाला वाटते की पर्यावरणवादी मित्र आहेत ना धरतीची काळजी घ्यायला? मग आपले काय काम?
पाऊस पडावा म्हणून महादेवाला प्रत्येकाने एक तांब्याभर दुध भोलेनाथाच्या पिंडीवर वाहायचे हा संदर्भ असलेल्या गोष्टीचा आपण बोध कधी घेणार?
पदरी बारा अपत्ये असलेल्या मातेचा अंत करुण का असतो? आपलेपणा संपल्यानेच!
म्हणूनच आजचा दिवस केवळ नावाला साजरा करण्यापेक्षा, पृथ्वीबाबतचा आपलेपणा जागृत करु या!
जगातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याचे केवळ एकच झाड लावून ते जगविले तरीसुद्धा वाढत्या कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजन वायूचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल!
या आजारी धरती मातेच्या अपेक्षाही जास्त नाहीत! फक्त प्रत्येकाने जीवनात एकतरी झाड लावून त्याचे संगोपन व रक्षण करावे!
या अशा प्रत्येकाने लावलेल्या हिरव्या झाडांचा जेव्हा हिरवा हिरवा शालू आपण या पृथ्वी मातेला पांघरणार, तेव्हाच आपली आजारी पडलेली धरती माता या आजारपणातून खडखडीत बरी होईल; आणि....
पुन्हा आपल्या लेकरांच्या सेवेला...
आपली हिरवीगार धरती माता...
नव्या दमाने हजर राहील!
हे सर्व व्हावे असे वाटत असेल तर झाडे लावून जगविणे, धरणे बांधून भूजल पातळी वाढविणे तसेच वायू प्रदुषण, हवा प्रदुषण, मृदा प्रदुषण, जल प्रदुषण व ध्वनी प्रदुषण ही सर्व प्रदुषणे कमी करीत नियंत्रणात आणणे व पर्यावरण समतोल पुन्हा प्रस्थापित करणे हे पर्यावरण व त्यायोगे सृष्टी वाचविण्याचे मुख्य तंत्र आहे!
पर्यावरण हे "पर्याय नसलेले पृथ्वीचे आवरण" आहे! पृथ्वीचे असे महत्वाचे आवरण वाचविणेबाबत चारोळी सादर करुन, आम्ही आपला निरोप घेतो!
झाडे लावून ते जगवू, टाळू सृष्टीचे मरण,
पाणी जमिनीत जिरवू, बांधूनिया धरण;
ओझोनचा थर वाचवू, वाचवू पर्यावरण,
पर्यावरण हेच, पर्याय नसलेले आवरण!
चला तर मग,..
आज किमान एक तरी झाड लावू या!
या लावलेल्या झाडासोबत आपला एक सेल्फी काढून आपल्या घरात लावू या!
हा घरात लावलेला सेल्फी आपल्याला रोजच आपण लावलेल्या झाडाची काळजी घेण्याबाबत आठवण करुन देईल!
मग...?
लावाल ना आज एकतरी झाड?
कराल ना त्याचे संगोपन....?

Comments
Post a Comment