दुसऱ्या वादळापूवीची शांतता!!!
दुसऱ्या वादळापूवीची शांतता!!!
सध्या सर्व भाजपा विरोधक खडसे गेल्याने खुष आहेत पण सेनावाले फटाके फोडत आहेत. डावखरे जिंकले तर काही फटाके शिल्लक राहु द्या. व पुढिल अधिवेशनापासुन राणेना ही तोंड द्यायचे आहे. तेंव्हा विधीमंडळात मुख्यमंत्रीच असणार आहेत. हे सेनेने विसरु नये.
ही कुठली मैत्री मित्राच्या घरात आग लागली तर हे बाहेर फटाके वाजवणार. मग शत्रु कोणाला म्हणायचे. मग काय उपाशी राहिलेल्यांचे पोट भरायला सरकार मध्ये सामिल झाले का? व भाजपने जर मुंबई महानगर पालिकेत हिसका दाखवला तर पोट भरायचे ही वांदे होतिल.
राजकीय स्वार्थ साधा पण फटाके कसले वाजवता. जे कॉंग्रेस राष्ट्रवादीनेही केले नाही. व सेनेनी काय वाघ मारला खडसे प्रकरणात, प्रिती मेनन व अंजली दमानियानी हे सुरु केले. वाघ त्यांनी मारला जो जिवंत असताना रोज तुमची पळता भुई थोडी करत होता. तुम्ही तर वाघ मेल्याची खात्री झाल्यावर अंगावर पाय ठेऊन फोटो काढायला गेलात.
मुंबई महानगरपालिकेतील लफडी काही दिवसात बाहेर येतील तेंव्हा हेच खडसे कुठे कुठे फटाके लावतील ते पहात राहा. येवढे दिवस मंत्रीमंडळाच्या जबाबदारीत अडकले होते.आता मोकळे झाले आहेत. भाजपा काही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. काही दिवसात परत येतिल कारण सकृत दर्शनी फक्त जमिनीची केस त्रास देईल पण जास्तित जास्त जमिन MIDCला सोडावी लागेल ती ही भरपाई देऊन. पण गुन्हा नाही होत ते अडकत नाहीत त्यात क्लिन चिट घेऊन येतिल तेंव्हा राणे परवडले पण खडसे नकोत म्हणायची पाऴी येईल.
किमान फटाके तरी वाजवायला नको होते या उडालेल्या फटाक्यांचा आवाज नंतर फक्त सेनेलाच ऐकु येईल हि व्यवस्था नक्की होणार कारण मोदी शत्रुला नंतर पण गद्दार मित्राला आधी संपवतात हा त्यांचा ट्रँक रेकॉर्ड. व सेना विरोधकांची जागा घेत आहे हे पाहिल्यावर विरोधक ही गप्प बसणार नाहीत आक्रमण चारी बाजुने. होईल. पण हे फटाके नंतर वाजणार यात शंका नाही.
Comments
Post a Comment