BJP - Sena dog fight

देशात व राज्यातील सत्तेत एकमेकांचे सहकारी असलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील कुरबुरी अद्यापही संपलेल्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या तरी मुद्यावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.


(भाजपाचं सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य - संजय राऊत)

केंद्रात निजामाच्या बापाचं राज्य अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केलेली टीका भाजपाला रुचली नाही. त्यावर ' इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण स्वत: औरंगजेबासारखे वागत आहोत का याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे ' असा प्रतिटोला भाजपाने शिवसेनेला हाणला. मात्र या मुद्यावरून सुरू झालेले युद्ध अजूनही संपलेले नसून आता भाजपाने पुन्हा 'पोस्टर'च्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना बेडकाची उपमाही देण्यात आली आहे.


' देश "पिताश्रीं"च्या पुण्याईवर आणि "मातोश्री"च्या आशीर्वादाने नाही चालत… त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटांचा "सामना" करावा लागतो…' असा आशय लिहीलेलं एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झालं असून त्याखाली ‘i support NaMo!’ असेही लिहीण्यात आले आहे. तर दुस-या एका पोस्टरमध्ये 'पावसाळा आला की असे बेडूक डराव डराव करणारच....' असे लिहीण्यात आले असून त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बेडकाची उपमा दिली आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सेना-भाजपामधील वाद वाढताना दिसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034