My life mantra...
*साधं सोप्पं जगावं |*
दिलखुलास हसावं
*न लाजता रडावं |*
राग आला तर चिडावं
*पण झालं-गेलं वेळीच सोडावं |*
आपल्या माणसांवर हक्कानी रुसावं
*रूसलेल्यांना लाडानी पुसावं (विचारावं) |*
वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं
*मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं |*
चमचमीत झणझणीत बाहेर दाबून चापावं
*पण घरच्या वरण-भातानेच मात्र पोट भरावं |*
नालायकांना पुरून उरावं
*मदतगारांना आयुष्यभर स्मरावं |*
खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं
*स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं*
सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र
त्या *परमेश्वराच ऋणी* जरूर राहावं
🌺🌻🌷🙏🌷🌻🌺
Comments
Post a Comment