बाळासाहेबांचा सैनिक

*बाळासाहेबांचा सैनिक*



तत्कालीन राष्ट्रवादी ने आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याच धाडस दाखवल होतं.

शरद पवारांनी बाळासाहेबांची छाती मोजण्याची भाषा केली..
त्यावेळी दादा कोंडकेनी 
शरद पवारांचा त्याच भाषेत समाचार  घेतला होता You Tube वर उपलब्ध आहे - पाहू शकता..

छगन भुजबळांच्या सेना प्रवेशाची चर्चा चालू होती त्यावेळी   आदरणीय बाळासाहेबांच्या अटकेच्या फाईल वर सही केललं दुःख आणि राग कसा विसरणार अशी चर्चा शिवसैनिकात चालू होती..

मध्यंतरी उद्धव ठाकरे ही म्हणले होते बाळासाहेबांना अटक केल्याचे खरच दुःख वाटत असेल तर अजित पवारांनी माफी मागावी..
आज वर अजित पवारांनी माफी मागितलेली नाही..

शरद पवार हे ती चूक करणार्‍यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही,' असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. 

1999 साली संख्याबळ कमी पडल तरी सुद्धा राष्ट्रवादी सोबत सेना कधीच जाणार नाही असं ठाम पणे सांगत सत्तेला लाथ मारणारे बाळासाहेब होते...

हे सगळं तुम्ही विसरला असाल पण आम्ही नाहीं…..

आमचे नेते प्रमोद महाजन नेहमी सांगायचे की भाजपा कार्यकर्ता हाच खरा बाळासाहेबांचा सैनिक आहे कारण मनात आणि रक्तात 'कमळ' असताना तो केवळ बाळासाहेबांकडे बघून धनुष्यबाणा वर शिक्का मारतो.

मी अनेक वेळा जाहीर रित्या बोललोय
नसेन मी शिवसेनेचा,
नाही मी शिवसेनाचा
पण अखंड सैनिक राहीन बाळासाहेबांचा..
कारण हिंदूंची अस्मिता टिकवणाऱ्या आदरणीय बाळासाहेबांबद्दल तेवढा आदर आहे होता, आहे अन राहील…

मात्र सगळ्या तत्वांना मूठ माती देऊन हा सगळा इतिहास  विसरणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा बद्दल किंचित सुद्धा आदर उरलेला नाही..

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034