अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अडीच पट जास्त लोकांना आम्ही मोफत धान्य दिलं : पंतप्रधान मोदी



अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अडीच पट जास्त लोकांना आम्ही मोफत धान्य दिलं : पंतप्रधान मोदी

कोरोनासोबत लढताना भारतात सरकारने 80 कोटी पेक्षा जास्त लोकांना 3 महिन्यांचे रेशन पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत दिले.

अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अडीच पटीने जास्त लोकसंख्येला आणि ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा 12 पटीने जास्त लोकांना आमच्या सरकारने मोफत अन्नधान्य दिलं आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. 

नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली, तसेच अनेक मोठ्या घोषणाही केल्या.

लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारची देशातील प्रत्येक घरात चूल पेटली पाहिजे ही सर्वात पहिली प्राथमिकता होती. एकाही नागरिकाने भुकेल्या पोटी झोपी नये यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली.

देश असो किंवा व्यक्ती वेळेवर आणि संवेदनशीलतेने निर्णय घेतल्यावर कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती वाढते. लॉकडाऊन होताच सरकार प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना घेऊन आलं. या योजनेअंतर्गत गरिबांसाठी 1.75 लाख कोटींचं पॅकेज दिलं गेलं. गेल्या तीन महिन्यांत 20 कोटी कुटुंबांच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

यासोबतच गावांमध्ये श्रमिकांना रोजगार देण्यासाठी प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेचं अभियान वेगाने सुरु आहे. या अभियानासाठी सरकार 50 हजार कोटी रुपयांचा खर्च करत आहे”, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

जेव्हापासून देशात अनलॉक 1 सुरु झालं आहे, तेव्हापासून व्यक्तीगत आणि सामाजिक व्यव्हारात निष्काळजीपणा वाढत चालला आहे. सुरुवातीला आपण मास्क वापरणं, सोशल डिस्टिन्सिंग ठेवण्यात आणि हात धुण्याबाबत खूप सतर्क होतो. मात्र, आज जेव्हा आपल्याला जास्त सतर्कताची गरज असताना निष्काळजीपणा वाढणं चिंताजनक आहे”, अशी खंतही मोदींनी व्यक्त केली.

सरपंच असो की देशाचा पंतप्रधान नियमापेक्षा मोठा नाही असे ते म्हणाले.

एका देशाच्या पंतप्रधानांना 13 हजार रुपयांचा दंड लागला कारण ते सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता गेले होते. भारतातही स्थानिक प्रशासनाला अशाचप्रकारे काम करावं लागेल. हे 130 कोटी देशवासियांच्या संरक्षणाचं एक अभियान आहे. भारतात गावाचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान असो सर्वांना नियम सारखे आहेत. कुणीही नियमांपेक्षा मोठा नाही”, असंही पंतप्रधान म्हणाले.

80 कोटी नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य – पंतप्रधान 

पावसाळ्यात कृषी क्षेत्रात जास्त काम होतं. अन्य दुसऱ्या क्षेत्रांमध्ये थोडी सुस्थी असते. जुलैपासून हळूहळू सण, उत्सव सुरु होतात. सण, उत्सांमध्ये खर्चही होता. या गोष्टींचा विचार करुन प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा ( PM Garib Kalyan Ann Yojana) विस्तार आता दिवाळी आणि छठ पूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यांच्या शेवटपर्यंत केला जाईल. पुढच्या पाच महिन्यातही 80 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना प्रत्येक महिन्यात 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मोफत दिलं जाईल. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला 1 किलो डाळ दिली जाईल.

Comments