*महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता आणि मीडिया च्या बोगस बातम्या*

*महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता आणि मीडिया च्या बोगस बातम्या*
शांतीन घ्या.. JUST CHILL...
*महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.. ठीक आहे ना*...
एवढा गोंधळ घालण्याची काय गरज आहे? कोण दोषी? कोणामुळे लागली? हे फालतू चे पोस्टमार्टेम चालू आहे..
कस काँग्रेसच चुकलं, कशी पवार साहेबांनी फजिती केली, कसा सेनेचा गेम झाला आणि कशी भाजप जिंकली..
अरे, भाजप जिंकायला काय त्यांचं सरकार आलं आहे का? की त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे?
लोकांनी बहुमत देऊन, सर्वात मोठा पक्ष ठरवून केवळ सेनेला दिलेला शब्द न पाळण्यामुळे (असं सेना म्हणते) राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटलं आहे आणि याचा कसला आनंद??
भाजपने काँग्रेस सारख मोठं मन दाखवायला पाहिजे होत. कर्नाटकात जस लहान पक्ष असूनही काँग्रेसने JDS चा मुख्यमंत्री केला आणि राज्याला सरकार दिल तर भाजपही महाराष्ट्रात करू शकली असती.. पण हम नाही तो कोई नही, कुछ भी नाही हा अहंभाव नडला महाराष्ट्राला..
*आणि मीडिया पण, त्या TRP साठी किती घाई करायची*..?
कालचा तर सगळा गोंधळ मीडियामुळे झाला.. सगळं त्यांनीच ठरवलं आणि आपण खर मानलं.. बर खर मानून गप्प बसू ते आपण कसले!! लगेच लागलो कामाला.. हा दोषी, त्याच काही खर नाही, तो काही सुधारत नाही..
बाबा, आधी आपण सुधारा.. कौवा कान ले गया, म्हंटल्यावर कौव्याच्या मागे पळण्यापेक्षा आधी कान जागेवर आहे की नाही तपासून तर घ्या..
1) आदित्य ठाकरे राजभवनकडे सत्ता स्थापनेचा दावा करायला रवाना.. कोण म्हणाल?? मीडिया म्हणाली..
आदित्य म्हणाले का, की मी दावा करायला चाललो आहे.. *ते तर वेळ मागायला गेले होते*. राज्यपालांनी बोलावल्यावर जाणं क्रमपात्र होत. त्यांना ही जाताना माहीत आहे ना की आपल्याकडे समर्थन पत्र नाहीत ते..
2) सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना फोन करून आम्ही पाठींबा देत आहोत असं सांगितलं.. कोण म्हणाल? मीडिया म्हणाली..
सोनिया गांधी किंवा काँग्रेसच्या कोणी सांगितलं का की असा फोन केला आहे म्हणून. किंवा आम्ही पाठिंबा देत आहोत म्हणून.. तरी काँग्रेस दोषी.. तुमच्या इच्छा किंवा गप्पा या पक्षाचं धोरण असू शकत नाहीत ना..
3) राष्ट्रवादीने राज्यपालांना समर्थन पत्र फॅक्स केलं.. कोण म्हणाल?? मीडिया म्हणाली.
राष्ट्रवादी पक्षाने कधी अधिकृत सांगितलं आहे का, की आम्ही अस पत्र फॅक्स केलं आहे किंवा आम्ही सेनेला पाठिंबा देत आहोत म्हणून.. तरी राष्ट्रवादीने सेनेचा गेम केला.. अरे काय चाललंय?? तुमच्या मनाच्या गप्पा हे सत्य कस असू शकत??
सेनेला त्यांचा मुख्यमंत्री करण्याची इच्छा आहे, आघाडीला ही त्यांना पाठिंबा देण्याची इच्छा आहे.. पण या फक्त इच्छाच आहेत.. अजून अशी पाठिंब्याची अधिकृत घोषणा ना राष्ट्रवादीने केली आहे ना काँग्रेसने.. ते सकारात्मक आहेत आणि त्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.. 3 वेगवेगळ्या पक्षांचे सरकार बनताना अधिकृत पाठिंबा देण्याआधी कित्येक गोष्टींचा जबाबदारीने विचार करावा लागतो. हा काय पोरखेळ आहे का??
सेना काल पर्यंत NDA मध्येच होती.. ती NDA मध्येच असताना जर आघाडीने त्यांना पाठिंबा दिला असता तर हीच मीडिया आणि मीडिया म्हणते म्हणून आपण ओरडलो असतो, हसलो ही असतो आघाडीवर.. त्यांनी कालच राजीनामा दिला आहे, ते कालच NDA मधून बाहेर पडले आहेत. आणि लगेच सरकार स्थापनेबद्दल आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या हे काल आपण पाहिले.
पण राज्यपाल महोदयांनी दिलेला वेळ एवढा कमी होता की त्यात हे सगळं संपवण शक्य नव्हतं. संजय राऊत राज्यपालांनी वेळ कमी दिला आहे असं परवा दिवशी म्हणाले ही होते कारण त्यांना ही कुठे तरी कल्पना होती की या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. म्हणून शिवसेना वेळ वाढवून मागायलाच गेली होती..
पण मीडियाने त्याचा हौवा केला आणि आपणही त्यात वहात गेलो.. कावळ्याच्या मागे धावत सुटलो, कान तर जागेवरच होता.. खूपच कच्च्या कानाचे आहोत आपण आणि आपण राजकारण्यांनाच नावे ठेवतो की ते कच्च्या कानाचे आहेत म्हणून....
राष्ट्रपती राजवटच तर लागली आहे.. महाराष्ट्रात हुकूमशाही आलेली नाही.. थोडं दमान घ्या.. Chill करा.. उलट राष्ट्रपती राजवट लागू करून माननीय राज्यपालांनी राज्याला एक स्थिरता तर दिली आहे..
सरकार नाही तर किमान राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून प्रशासन तरी चालू राहील..
तुमच्या चर्चा, ठरवाठरवी होऊ द्या.. ठरलं की या माझ्याकडे, सरकार स्थापन होईल..
राज्यात सरकार यावं याची काळजी तुम्हा आम्हाला आणि मीडियाला जेवढी आहे ना, त्यापेक्षा जास्त राजकीय पक्षांना आहे.. त्यांचं सगळंच पणाला लागलं आहे.. आपला फक्त मोबाईल डाटा आणि तोंडाची वाफ पणाला लागली आहे.. त्यामुळे शांत रहा.. लांबी सांस लो और आराम से छोडो.. कधी तरी रामदेव बाबाच ऐकत जा..
महाराष्ट्रात सरकार येणार आणि ते 5 वर्ष चालणार.. निवांत रहा.. आणि निवांत रहाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे TV पहा, पण News Channel पाहू नका.. त्यांना काहीही माहित नाही.. उगाच तुमच्या दिमाग का दही बनवतात ते.. जेवढं News Channel पासून लांब रहाल, सुखी रहाल.. जे व्हायचं ते होणारच आहे, ते तुम्हाला कळणारच आहे.. उगाच बेजार होऊ नका.. त्या पेक्षा बायका मुलांना घेऊन बाहेर जा.. त्यांना वेळ द्या.. पहा किती छान वाटते..

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034