आधार कार्ड शी जोडणी

आधार कार्ड शी जोडणी

*पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी रेशन कार्ड,एलपीजी गँस,मनरेगा व इतर सर्व सरकारी लाभार्थ्यांना आधारशी जोडल्यामुळे आतापर्यंत सरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्या दलालांच्या बुडाला आता जबरदस्त आग लागली आहे.ही कारवाई करून मोदींनी आता पर्यंत दरवर्षी दलालांच्या घशात जाणारे सुमारे 59 साठ हजार करोड रूपये वाचवले असून यापुढेही दरवर्षी इतकेच पैसे वाचवले जातील.या कारवाईमुळे चिढलेले दलाल  व त्यांचे चमचे मोदींना 'फेकू' म्हणतात कारण मोदींनी त्यांना अलगदपणे या धंद्यातून काढून बाहेर फेकून दिले आहे.
याचीच पुढची पायरी म्हणून आता शालेय विद्यार्थांना आधारशी जोडण्याचे काम चालू असून उत्तराखंड राज्यात ही कारवाई करण्यापूर्वी उत्तराखंड मदरसा बोर्डकडे अडीच लाखापेक्षा अधिक विध्यार्थ्यांची नोंद होती पण आधारशी जोडल्यानंतर आता फक्त 26 हजार विध्यार्थीच शिल्लक राहिलेत.याचाच अर्थ आतापर्यंत सव्वा दोन लाख विध्यार्थ्यांचे अनुदान कोणाच्या तरी खिशात जात होते पण यापुढे ते बंद होणार.शिक्षण हा राज्याच्या अखत्यारीतला विषय असून जेंव्हा सर्व राज्य सरकारं ही कारवाई करतील तेंव्हा शिक्षण क्षेत्रातील अजून बरेच दलाल बाहेर फेकले जातील मग 'फेकू,फेकू' म्हणून आपल्याच अंगावरचे कपडे फाडून घेणार्यांची संख्या अजूनही वाढेल.
महाराष्ट्रात शेतकर्यांना जी कर्जमाफी देण्यात येणार आहे त्यातील सुरूवातील पात्र शेतकर्यांची जी सूची सरकारकडे आली होती त्यात 89 लाख शेतकरी होते पण या शेतकर्यांकडून आधार जोडून आँनलाईन अर्ज मागवण्यात आलेत त्याला पुन्हा पुन्हा मुदतवाढ देऊनसुद्धा त्यातून 58 लाखच अर्ज आलेत.यावरून समजते की 31 लाख कर्जदार हे बोगस आहेत किंवा या शेतकर्यांच्या नावाने भलत्याच लोकांनी कर्ज उचलले आहेत.
ही घपलेबाजी लपवण्यासाठीच शिवसेनेसकट सर्व विरोधी पक्ष कुठलाही फाँर्म भरून न घेता सरसकट कर्जमाफी कर्ज माफीसाठी का आग्रही होते हे समजले ना?
या 31 लाख बोगसगिरीच्या पैशात सर्वांचीच दलाली होती पण सरकारने आता त्यालाच बूच लावले आहे.म्हणून 1 आँक्टोबरपासून पात्र शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यात सुरूवात होतील तेंव्हा 'फेकू फेकू' म्हणून किंचाळणार्यांच्या संख्येत अजून वाढ होईल व जनतेच्या हेही लक्षात येईल की जर कोणी फेकू फेकू म्हणून ओरडायला लागला की लोकं समजतील की हाही बुडाला आग लागलेला दलालच आहे*

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained