BJP ने Congress कडून सत्ता कशी टिकवायची ते शिकायला पाहिजे...
BJP ने Congress कडून सत्ता कशी टिकवायची ते शिकायला पाहिजे...
BJP ची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी लोकांना त्यांच्या लायकी पेक्षा जास्त स्वप्न दाखवली. काळा पैसा परत आणायचा त्यांनी नक्कीच चांगला प्रयत्न केला, आणि त्यापेक्षाही काळा पैसा पुन्हा generate होणार नाही यासाठीही खूप प्रयत्न केले. पण भरतातल्या चोरांनी बाहेर ठेवलेला पैसे किती आहे, हे त्यांनी जाहीर करायला नको होते.
दुसरे उदाहरण: स्वच्छ भारत अभियान. भारत स्वच्छ करणे, हे पंच वार्षिक योजनेचे काम नव्हे. तुम्ही भलेही सगळीकडे कचरा उचलायला माणसे नेमू शकता, सफाई कामगार वाढवू शकता, पण कचरा करणाऱ्यांचे काय? सरकार ची तयारी असली तरी लोकं अजून स्वच्छ भारतासाठी तयार नाहीयेत. लोकांना स्वच्छतेचे महत्व कळतंच नाही, येता जाता रस्त्यावर थुंकू नये, ST मधून खाल्लेल्या केळ्यांची सालं बाहेर टाकू नयेत...या सवयी चुकीच्या आहेत हे त्यांना समजलेले नाही. स्वच्छ भारत अभियान फेल झाले असे म्हणणारे नेहमी रस्त्यावरच्या कचऱ्याचे उदाहरण देतात, पण हा कचरा रोज जनताच तयार करते, हे विसरतात.
तिसरे उदाहरण: electric supply. गेली 3 वर्षे आमच्या ठाण्यात load shedding झालेले नाही, आणि 24 तास वीजेची आता सर्वांना सवय झाली.
पण कोळश्याचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे, आणि काही वीज निर्मिती केंद्रे maintenance मुळे बंद असल्यामुळे काही दिवस दीड तास load shedding होणार आहे. पण 24 तास वीजेचे स्वप्न अवघ्या 3 वर्षात पूर्ण झाल्यामुळे लोकांनी 24 वीज गृहीत धरली, आणि आता 3 दिवस 1.5 तास वीज नसल्यामुळे लोकं बोंबाबोंब करतायत.
पण कोळश्याचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे, आणि काही वीज निर्मिती केंद्रे maintenance मुळे बंद असल्यामुळे काही दिवस दीड तास load shedding होणार आहे. पण 24 तास वीजेचे स्वप्न अवघ्या 3 वर्षात पूर्ण झाल्यामुळे लोकांनी 24 वीज गृहीत धरली, आणि आता 3 दिवस 1.5 तास वीज नसल्यामुळे लोकं बोंबाबोंब करतायत.
आणि इथेच BJP ने काँग्रेस कडून शिकायला पाहिजे.
काँग्रेस ने काळा पैसा परत आणायचा विचारच केला नाही. स्वच्छ भारताचीही काही स्वप्नही दाखवली नाहीत. 'गरिबी हटाओ' वगैरे पोकळ विधानं केली, पण गरिबी हटवण्यासाठी आम्ही नक्की काय करणार ते कधीच सांगितले नाही. 24 तास वीजच काय, प्रत्येक गावात वीज न्यायचे आश्वासनही त्यांनी कधीच दिले नाही.
Demonetization आणि digital push चे धाडसी निर्णय, आणि त्याबरोबर येणारी risk त्यांनी कधीच उचलली नाही. They always played safe. इतकेच नव्हे, तर leftist मीडिया ला हाताशी धरून त्यांनी Anti Hindu propaganda चालू ठेवला, आणि Minorities ना कायमचे भारताच्या उरावर बसवून ठेवले-त्यांना reservation, झटपट promotion, आणि सर्व प्रकारच्या fees मध्ये सूट द्यायचे आमिष दाखवले, आणि कायमचे हतबल करून ठेवले. ह्याच हतबल लोकांचा वापर ते आता पिढ्यानपिढ्या करतील-दुसरे कुठलेही सरकार आले, की ते कसे anti दलित आणि anti minority आहे ते सर्व जगाला बोंबलून सांगतील.
शेतकऱ्यांना उठसूट कर्जमाफी करायची सवयही त्यांनीच लावली, जेणेकरून ते सतत हीच मागणी करत राहतील.
Nationalism, patriotism, homogeneity या गोष्टीच वाईट आहेत असा propaganda चालवून त्यांनी देशद्रोह्यांना उचलून धरले, आणि सावरकरांसारख्या देशभक्तांना 'mercy petition' सारख्या क्षुल्लक गोष्टीवरून बदनाम केले.
मुसलमानांचे मत मिळवण्यासाठी 'हा देश आधी मुसलमानांचा आहे, आणि मग हिंदूंचा' आणि 'राम खरंच होता का? रामायण खरंच घडले का? पुरावा काय?' असे प्रश्न विचारण्या इतपत त्यांची मजल गेली.
त्यांनी जे काही केले, ते सत्तेसाठी केले, देशासाठी नाही. आणि ही खेळी BJP ला अजून समजली नाही.
त्यांनी जे काही केले, ते सत्तेसाठी केले, देशासाठी नाही. आणि ही खेळी BJP ला अजून समजली नाही.
झटपट सुविधा/कर्जमाफी/पैसा/प्रोमोशन ची स्वप्न बघणाऱ्याना देशभक्ती ने जवळ करणे अशक्य आहे. देशभक्ती जाऊ द्या, त्यांच्या कडून 'भारत माता की जय' म्हणवून घेणेही अशक्य आहे.
आजच्या मतदाराला फसवणूक हवी आहे, सत्य नको.
Comments
Post a Comment