TMT in dire straits

 ALERT CITIZENS OF THANE CITY 
A7/303, Saket CHSL, Saket Marg, Thane (W) 400601 # 8879528575

जानेवारी १४, २०१३

मा. आयुक्त साहेब,
ठाणे महानगर पालिका,
ठाणे

महोदय,

ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस पुलावर ठाणे परिवहन सेवेची (टी.एम.टी.) बस बंद पडून निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि प्रवाशांना सहन करावा लागलेला मनस्ताप ही घटना ताजी असतानात शुक्रवारी गोखले रोडवर आणखी एक बस बंद पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवासी वर्ग हैराण झाला आहे.
ठाणे शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसला असून यात आता टीएमटीच्या बंद पडणाऱ्या बसेसची भर पडू लागली आहे. टीएमटीच्या ताफ्यातील सीएनजीच्या बसेस बंद पडताच लॉक होतात. क्रेन येईपर्यंत या बसेस जागेवरून हलविता येत नसल्याने या बसच्या पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे ठाणेकरही हैराण झाले आहेत. शुक्रवारी गोखले रोडवरील नवजीवन बँकेसमोर सायंकाळी ५ ते ५.३० दरम्यान टीएमटीची बस बंद पडली. काही वेळातच या बसच्या पाठीमागे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ऐन गर्दीच्या वेळेत ही बस बंद पडल्याने दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.  

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) सुमारे ५० ते ६० बसगाडय़ा दररोज किरकोळ कारणांमुळे बंद पडत असल्याची धक्कादायक माहिती परिवहनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या प्रकारामुळे टीएमटीच्या बसगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडत असल्याने त्याचा थेट फटका प्रवासी वर्गाला बसत आहे. त्यामुळे टीएमटीच्या सेवेविषयी प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त होते आहे. 
तसेच बंद पडणाऱ्या बसगाडय़ांमुळे टीएमटीचा दर्जाही दिवसेंदिवस ढासळू लागला असून प्रवासी वर्ग आता शेअर रिक्षा आणि शहरात सुरू असलेल्या खासगी बसेसकडे वळू लागल्याचे चित्र आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे तीनशेहून अधिक बसेस असून त्यातील बहुतांश बसेस नादुरुस्त असल्याने आगारात धूळ खात पडल्या आहेत. त्यामुळे सुमारे २०० ते २१० बसगाडय़ा दररोज आगाराबाहेर पडत असून शहरातील वागळे, कोपरी, घोडबंदर, नौपाडा, कळवा आणि मुंब्रा येथील वेगवेगळ्या मार्गावर या बसगाडय़ा धावतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बसगाडय़ांनाही ग्रहण लागले असून यातील सुमारे ५० ते ६० बसगाडय़ा दररोज बंद पडत आहेत. 
टायर पंक्चर होणे, गाडी गरम होऊन बंद पडणे, गिअर न पडणे, क्लचप्लेट खराब होणे, लायनर जाम होणे, लोड न घेणे, एअर पकडणे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या बसेस बंद पडत असल्याची माहिती परिवहन सेवेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दररोज बंद पडणाऱ्या ५० ते ६० बसगाडय़ांमध्ये सीएनजी बसचे प्रमाण सर्वाधिक असून या बसगाडय़ा बंद पडताच लॉक होतात, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या सीएनजी बसगाडय़ा आता टीएमटीसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहे. गुरुवारी रात्री ठाणे स्थानक परिसरातील जुन्या एसटी डेपोसमोरील सॅटीस पुलावर सीएनजी बसगाडी बंद पडून लॉक झाली. त्यामुळे या बसच्या पाठीमागे असलेल्या सर्व बसगाडय़ा अडकून पडल्या. परिणामी, स्थानकात पाऊण तास बस न आल्याने प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच या प्रकारामुळे प्रवासी वर्ग हैराण झाला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडल्याने प्रवाशांनी सॅटीस पुलावरील टीएमटी चौकीची तोडफोड केली होती. तसेच बंद पडणाऱ्या बसेसमुळे शहरातील वाहतूक कोंडीत आणखी भर पडत असल्याचे चित्र आहे.
तरी आपण ठाणे परिवहनच्या व्यवहाराची आपण सखोल चौकशी करावी, गलथान कारभारावर रोख लावावी, गरज पडल्यास एक professional administrator नेमावा पण ठाणेकरांना राहत द्यावी ही  विनंती.

आपला सहकार्च्छेुक,

दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034