Rationalize the pace of Industrialization - Save Earth from Global warming
मोठया धरणांमूळे पाणी मिळत नसून उलट पाणी चक्राला (water cycle) बाधा येऊन अंतिमतः पाण्याच्या दुष्काळाकडे त्या भूभागाची वाटचाल होते...वाहणे हा नदीचा हक्क आहे...ती तशी वाहती राहीली तरच पाणी मानवासकट इतर जीवसृष्टीला अविरतपणे मिळत राहू शकते...अन्यथा नाही...धरणे ही सिमेंट, स्टीलच्या उद्योगाना प्रचंड मागणी मिळावी म्हणून बांधली जातात...पण समाजाने त्याचे समर्थन करावे म्हणून मानवी कल्याणाचा भ्रम पुढे केला जातो....
पृथ्वीवरचे पाणी हे मानवासकट सर्व जीवमात्रांच्या फक्त पिण्यासाठीच आहे...."उद्योगां(industry)साठी" नाही हे जोपर्यंत तथाकथित आधुनिक माणसाना समजत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत जाणार आहे.....
झाडे लावणे स्तूत्यच, पण कितीही झाडे लावली तरी जोपर्यंत आपण Industrialisation आणि त्यासाठी आलेले शहरीकरण याचा त्याग करत नाही तोपर्यंत पाणी दुष्प्राप्यच होत जाणार कारण आजचा पाणी दुष्काळ हा केवळ जागतिक तापमानवाढीमूळे होत असून त्या तापमानवाढीचे कारण केवळ कार्बन उत्सर्जन हेच आहे जे उद्योग(industry), वीजवापर, मोटारगाडयानी होणारी वाहतूक, सिमेंट व स्टील वापरून केलेली मोठमोठाली बांधकामे, रासायनिक शेती आणि वरील सर्व गोष्टींसाठी होणारी जंगलतोड यामूळे होत आहे.
लोकांचे आकलन या सत्यापर्यंत पोहोचू नये म्हणून हीतसंबंधी तसेच अजाणपणे काही अज्ञानी लोक अधल्या मधल्या गोष्टी जसे झाडे लावणे इत्यादी जोरजोराने सांगत बसतात जेणेकरून मूळ कारणांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये....
SAY NO TO INDUSTRIALISATION...
SAY NO TO URBANISATION....
SAY YES TO NATURAL FARMING...
TO SAVE THE WORLD FROM GLOBAL WARMING....
हे सर्वाना लक्षात यावे म्हणून श्री गिरीष राऊतानी काही सुटसूटीत व नेमक्या घोषणा बनवल्या आहेत, ज्या गावोगावी भिंती, गडगे, रस्ते ईत्यादी जागी लिहून ठेवल्या तर माध्यमे जी गोष्ट लपवत आहेत ती जनतेच्या झटकन लक्षात येऊन जाईल व पाणी तसेच जीवन वाचवण्याची प्रक्रीया सुरू होऊन जाईल.
घोषणा:-
1) पाणी पिण्यासाठी नाही उद्योगांसाठी...
2) मान्सून हवा मोटार नको...
3) झाड तोडेल तो देशद्रोही...
4) झाड तोडणारा मानवद्रोही.
5) शेती जगवते उद्योग मारतो
6) उद्योग जगवतात हा भ्रम, कारण शहरे अन्नामूळे जगतात...पैशामूळे नाही.
7) औद्योगिकरण थांबवा-मानवजात वाचवा.
8) पाणी हवे...पैसा नको.
9) पृथ्वीभोवती सूर्य फिरतो ही अंधश्रध्दा घालवली...
आता औद्योगिकरणाला मानवी प्रगती मानणे ही त्यापेक्षा भयंकर अंधश्रध्दा...
10) अस्तित्व हवे अर्थव्यवस्था नको...
11) तापमानवाढीपासून वाचवा...ऊर्जाविरहीत जीवनपध्दती जगा.
12) डोळस औद्योगिकरण ही शुध्द थापेबाजी आहे...
13) दुष्काळापासून वाचवा औद्योगिकरण थांबवा.
Comments
Post a Comment