Who really wrote the Indian Constitution?
भारताचे संविधान कुणी लिहिले ???
या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्वमान्यच आहे ते म्हणजे... भारताचे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले.
परंतु सहज माझ्या मनात आले की फ़क्त "एका व्यक्तिसाठी" इतक मोठं तर्कसंगत, सुटसुटीत, कायदेशीर लिखाण करणं शक्य आहे का?... ते पण केवळ 3 वर्षाच्या कालावधीत ... म्हणजेच संविधानिक सभेच्या स्थापने पासून (9 डिसेम्बर 1946) ते संविधान अंगीकृत करेपर्यंत (26 नोहेम्बर 1949).
मला हे पूर्णपणे पटलं नाही की केवळ आंबेडकरांनी संविधान लिहिलं. त्यामुळे इतिहास शोधण्यास सुरुवात केली व खालील माहिती माझ्या हाती लागली ती तुमच्यासोबत share करतोय...
1947 ची फाळणी योग्य रितीने व अहिंसेने व्हावी यासाठी ब्रिटिशांनी 'द इंडिपेंडेंस एक्ट 1947' भारत व पाकिस्तानला दिला, ज्यानुसार दोन्ही देशांना आप-आपली संविधान बनवण्यासाठी स्वतंत्र संविधानिक सभा (constituent assembly) बनवण्याचे अधिकार दिले.
यानुसार भारताने आपली संविधानिक सभा 9 डिसेम्बर 1946 ला बनवून पहिली बैठक घेतली.
या संविधानिक सभेत असे ठरवण्यात आले की संविधान "लिहिण्याचे काम" एका व्यक्तीच्या आवाक्या बाहेरच आहे, त्यामुळे खालील प्रमाणे 5 वेग-वेगळ्या समित्या स्थापित केल्या...
1. संघ शक्ति समिति- चेअरमन- जवाहरलाल नेहरू... मेंबर संख्या-9
2. मूळ अधिकार व अल्पसंख्यक समिति- चेअरमन - वल्लभभाई पटेल... मेंबर संख्या-54
3. कार्य संचालन समिति- चेअरमन डॉ के. एम. मुंशी... मेंबर संख्या-3
4. प्रांतीय संविधान समिति- चेअरमन - वल्लभभाई पटेल ... मेंबर संख्या-25
5. संघ संविधान समिति- चेअरमन जवाहरलाल नेहरू... मेंबर संख्या-15
".... म्हणजे पाच समित्या मिळून 106 मेम्बर्सनि अथक मेहनत करुन आपल्या संविधानातील प्रत्त्येक कलम लिहिले."
पुन्हा माझ्या मनात प्रश्न, की फ़क्त आंबेडकरांनाच 'संविधानाचे शिल्पकार' का म्हणावे...??
पुढे अभ्यास केला तर कळालं की...
या पाच समित्यांनी संविधान लिहून पूर्ण केल्यावर 29 ऑगस्ट 1947 ला 7 सदस्सीय "ड्राफ्टिंग समिति" बनवली, या समितिचे कार्य होते... लिहिलेल्या संविधानाचे अभ्यास करणे व गरज असल्यास नवीन कलम 'सूचवणे'. व शेवटी ड्राफ्ट तयार करुन प्रस्तुत करणे.
या ड्राफ्टिंग समितीचे चेअरमन सर अल्लादि कृष्णास्वामी होते, ड्राफ्ट तयार केला होता तो सर बी. एन. राव यांनी.... आणि हा सम्पूर्ण तयार झालेला ड्राफ्ट सभेसमोर (अर्थात देशसमोर) "प्रस्तुत" करण्याच् काम डॉ आंबेडकरांना सोपवण्यात आले, कारण 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत ते कायदेमंत्री होते, व कुठलाही कायद्यासम्बन्धिचा ड्राफ्ट प्रस्तुत करण्याच् काम त्यांचेच होते.....
मी आंबेडकर विरोधी नाही, पण संविधानाच लिखाण कसे झाले व ते कुणी-कुणी केले याचा अभ्यास केल्यानंतर एक खंत मनात राहिली की...
113 विद्वान लोकांद्वारे (अर्थात् आंबेडकर धरून) लिखित संविधानाच श्रेय फ़क्त एकाच व्यक्तीला का दिल जातं ??
यात कुणाचा राजनैतिक फायदा तर नाही ना ??
की आपण इतक्या क्षीण बुद्धिचे आहोत की, आपल्याला या गोष्टिचा फरकच पडत नाही की संविधान कुणी लिहिलय ??
"माझ्या मते हे सर्व 113 विद्वान संविधानाचे शिल्पकार आहेत"
मत किंवा तथ्य मांडण्यात त्रुटी झाली असल्यास क्षमा असावी.
बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार का म्हणतात ?
ReplyDeleteसंविधान मसुदा समिती मधील सभासद कोण होते ते पहा ..
अध्यक्ष – डॉ आंबेडकर
सभासद –
अलादी कृष्णास्वामी
गोपालस्वामी अयंगार
के एम मुन्शी
सय्यद मोहम्मद सदुलाह
बी.एल. मित्तर
डी.पी. खैतान
संविधान सभेत कृष्णमचारी यांनी आपल्या भाषणात हे मान्य केले कि
जरी मसुदा समिती ७ सभासदांची बनवली गेली होती तरी काही दिवसांनी त्यातील एकाने राजीनामा दिला आणि त्याची जागा नवीन व्यक्तीला देण्यात आली. आणखी एक सभासद माननीय खेतान जी यांचा मृत्यू झाला त्यांची जागा पुन्हा भरली नाही ती रिक्तच राहिली. आणखी एक सभासद इतर राज्यकारभारात सक्रिय असल्याने वेळ देऊ शकले नाहीत. वरील सभासदांपैकी २ सभासद दिल्ली पासून लांब राहणारे होते आणि तब्येतीच्या कारणास्तव मसुदा निर्मितीच्या कामात वेळ देऊ शकले नाहीत. तेव्हा मसुदा समितीच्या संपूर्ण कामाची जबाबदारी एकट्या डॉ आंबेडकरांवर येउन पडली आणि त्यांची स्वतःची तब्येत खालावलेली असताना त्यांनी हि जबाबदारी पार पाडली आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. ”
मसुदा समिती २९ ऑगस्ट १९४७ रोजी तयार करण्यात आली आणि या समितीने संविधानाचा पहिला मसुदा ४ नोवेंबर १९४७ साली सदर केला, म्हणजे मसुदा हा फक्त २ महिने १५ दिवसात सादर केला गेला पण त्यावर प्रदीर्घ चर्चा, वेगवेगळे बदल, आक्षेप, सहमती या सर्वाला २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस लागले आणि २६ नोवेंबर १९४९ रोजी संपूर्ण संविधान सभेने ती स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी प्रत्यक्षात अमलात आणली.
सुप्रसिद्ध संविधान अभ्यासक आणि लेखक डॉ एम.व्ही. पायली यांचे काय मत आहे पहा
” संविधान सभेत झालेल्या चर्चेत डॉ आंबेडकरां इतका अभ्यासू, संयुक्तिक आणि मुद्देसूद, अत्यंत स्पष्ट आणि सफाईदार वक्तृत्व, भाषेवर प्रभुत्व आणि तितकेच संयमी व्यक्ती दुसरा कुणी नाही आणि आपल्या टीकाकारांना त्यांच्या योग्य मुद्द्यावर योग्य शब्दात सहमिती दर्शवण्याची तसेच त्यांना त्याचे श्रेय देण्याची उदारता देखील त्यांच्यात आहे.
संविधान निर्मितीत त्यांचे संपूर्ण योगदान नक्कीच अत्यंत उच्च पातळीचे आहे हे कुणीही नाकारू शकत नाही, आणि म्हणूनच हे खरय कि ते
“भारतीय संविधानाचे जनक किंवा शिल्पकार असे संबोधण्यास पात्र आहेत”
डॉ आंबेडकरांच्या विचारांना आता थेट विरोध करता येत नाहीये त्यामुळे लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या करत आहेत आणि हे आता नविन नाही,मिरवणूकीवर कुणी एखादा शेंडा बुडखा नसलेली वांझ पोस्ट करत आहे तर कुठे संविधान बाबासाहेबांनी लिहिले नाही किंवा कॉपी पेस्ट आहे अशा आशयाच्या खोटारड्या बाता पसरवल्या जात आहेत.
ReplyDeleteसांगताना सुद्धा अगदी सबगोलंकारी सांगतात,
“आमचा बाबासाहेबांच्या कार्याला विरोध नाही पण सर्व क्रेडीट त्यांनाच का द्यायचं? इतर लोकही होते संविधान तयार करताना” असं कुत्सित मांडून इप्सित साध्य करायचं हे ठरलेलं.
आम्हीही मानतो कि संविधान निर्मितीत बाबासाहेब एकटेच बसले नव्हते सर्व कलमं खरडत, अर्थात तेव्हा असलेले राजकीय, सामाजिक नेते एकत्र येउन संविधान निर्मितीचा विचार पुढे आला.
भारताचे संविधान हे काही जगातले एकमेव पहिले संविधान होते असं आणि बाबासाहेब संविधान एक्स्पर्ट होते असंही काही नाही.
एखादा नवीन विषय हाताळला जातो तेव्हा तो विषय आधी कुणी कसा मांडलाय याचा अभ्यास केला जातोच ना, अभ्यास करणे म्हणजे कॉपी होत नाही, समजा अमुक एका देशाने ” बंधुत्व” हा शब्द त्यांच्या संविधानात वापरला असेल आणि आपल्याला सुद्धा आपल्या देशात समाजात बंधुत्व असावे असं वाटत असेल तर काय करायचं ? तो शब्द आपण वापरला तर कॉपी ठरेल काय?
दुसरी महत्वाची बाब हि कि प्रत्येक देश भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत अत्यंत भिन्न असे आहेत, त्यांच्या समस्या, मानसिकता पूर्णपणे वेगळी असताना कुण्या दुसर्या देशाचे संविधान कॉपी करता येईल काय याचा विचार लोकांनी करायला हवा. बाबासाहेबांनी स्वतः हे मान्य केलंय कि संविधान निर्मितीत इतर लोकशाही मानणाऱ्या देशांच्या संविधानांचा अभ्यास केला गेला, संदर्भ घेतले गेले पण या सर्वांच्या कसोटीवर, चर्चेतून, अनुभवातून, अभ्यासातून, दूरदृष्टीतून भारताचे संविधान बांधले गेले कि भविष्यात हा देश कोणत्या त्वांवर कार्यरत कार्यरत राहील, देश चालवण्याकरिता कोणती दिशादर्शक चौकट बांधता येईल.
निरनिराळ्या नेत्यांच्या अध्यक्षतेखाली निरनिराळ्या समित्या बनवल्या असल्या तरी त्या सर्व विषयांची बांधणी एकाच संविधानात करावयाची असल्याने ड्राफटिंग ( कच्चा मसुदा ) कमिटीला महत्व आहे. बाबासाहेब स्वतः सुद्धा हे मान्य करीत नाहीत आणि कुठलाही महान नेता असं म्हणणार नाही कि हे सर्व मी केलं, कारण इतका मोठा प्रोजेक्ट करणे हे टीम वर्क असतं आणि त्या सर्वांचे योगदान बाबासाहेबांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात मान्य केले आहे.