What is the #JNU issue..?

काय आहे जे.एन.यू.प्रकरण

        जे.एन.यू.म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(दिल्ली )जे भारतातील नामांकित विद्यापीठ आहे. या विद्यापीठात 9 फेब्रुवारी 2016 रोजी संसद हल्ल्यातील मुख्य आरोपी    अफजल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ तेथील विद्यार्थ्यांनी तिथे कार्यक्रम आयोजीत केला होता.त्यात हे विद्यार्थी "पाकिस्तान जिंदाबाद" "कितने अफजल मारोगे....घरघरसे अफजल निकलेंगे.....," "अफजल गुरु की फासी....!नही सहेंगे...नही सहेंगे. ....!",    "यह लढाई जारी रहेगी कब तक?????भारत की बरबादी तक!!!"हम मांगे......काश्मीर की आझादी!!!" अशा प्रकारच्या देशद्रोही विषारी घोषणा दिल्या जात होत्या.ह्या प्रकरणावर सर्वप्रथम झी न्यूजने 11 फेब्रुवारीला प्रकाश टाकला तेव्हा 13 फेब्रुवारीला एका विद्यार्थी नेत्याला अटक झाली.या विरोधात संधीसाधू राजकीय नेत्यांनी ही अटक कशी अमानुषपणाची आहे.सरकार निरपराध विद्यार्थ्यांचा कसा अमानुष छळ करीत आहे. देशात आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशी सरकारविरोधी वातावरण निर्मिती केली.......विद्यार्थ्यांची बाजू घेण्यासाठी राहुल गांधी,अजय माकन, सिताराम येचुरी यांसारखे कांग्रेसगण विद्यापीठात जावून पोहचले तर अरविंद केजरीवाल यांसारख्या विद्वानांनी ट्विटरवर विद्यार्थ्यांची बाजू घेतली.
           मित्रांनो ह्या घटनेची प्रत्येक खर्या राष्ट्रप्रेमी भारतीयाला निश्चितच चिड येईल.....इकडे राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या जात होत्या तेव्हा आमचा जाबाज शुर योध्दा भारत मातेला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडत असतांना बर्फात गाडला गेल्यामुळे मृत्यूशी झूंज देत होता.......   जेव्हा इकडे देशाला बरबाद करण्याच्या,पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्या विद्यार्थ्यांची बाजू घेण्यासाठी राहुल गांधी विद्यापीठात येत होते त्याचवळेस जम्मूकाश्मीर मधील कुपवाडयात भारताची अखंडता कायम ठेवण्यासाठी भारत मातेचे संरक्षण करत असतांना भारतीय सैनिक प्राणपणाने पाकिस्तानी आतंकवाद्यांशी लढत होते....5 आतंकवाद्यांना ठार करुन आमचे 2 शूरविर शहीद झाले.....
            केवढा हा विरोधाभास.......एका बाजूला जेथे भारतातील स्थिर शासनाचा जगात दबदबा निर्माण होत असतांना भारतातील देशविघातक शक्ती,पक्ष लोकशाहीच्या नावाने स्थिर शासनाला खिळखिळे करण्यासाठी वाटेल त्या स्तरावर जात आहे. हैदराबादच्या विद्यार्थी आत्महत्या प्रकरण तापविण्यासाठी हेच  (केजरीवाल, राहूल गांधी )यांसारखे नतभ्रष्ट पुढारी तिथे गेले होते.ह्यांनीच भारतासारख्या भक्कम लोकशाही देशात काल्पनिक असहिष्णुतेची पुंगी वाजवून देशद्रोही सापांना नाचविले.........
               जेव्हा रामलिला मैदानावर भारत स्वाभिमान संघटना देशहिताचे प्रश्न घेऊन अहिंसक मार्गाने आंदोलन करीत होती तेव्हा मध्यरात्री अचानक गाढ झोपलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून भीषण लाठीचार करण्यात आला होता त्यात एक महिला साध्विचा प्राण गेला होता.तेव्हा कुठे गेले होते सहिष्णू नेते.कुठे गेले होते सहिष्णूतेच्या टिमक्या वाजवणारे लबाड, ढोंगी संधीसाधू लेखक, कलाकार. ......तेव्हा का नाही केल्या देश सोडण्याच्या गोष्टी .........
        मित्रांनो या सर्व गोष्टींवर विचार आणि चिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे नाहीतर फार उशीर झालेला असेल.....सहिष्णूतेच्या  नावावर कार्यक्षम शासनाची कार्यक्षमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला  जात आहे...रामराज्य येण्याच्या आधी रामाला वनवासात पाठविण्यासाठी कूटनिती आखली  जात आहे. .......
                 मित्रांनो, वरील पोस्ट कोणत्याही राजकीय दृष्टीने केलेली नाही.फक्त राष्टभक्तीच्या उच्च भावनेने सध्याच्या सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे....
 प्रत्येक भारतीयांनी या देशद्रोही राहुल गांधीचे व अरविंद केजरीवाल याचा निषेध करायलाच हवा

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034