Posts

Showing posts from 2024

देवेंद्र फडणवीस यांची कसोटी

Image
देवाभाऊची कसोटी  महाराष्ट्रातील जनतेने देवाभाऊच्या पदरी इतके भरभरून दिले आहे, की आता त्यांना आमदार सांभाळण्याची कसरत करावी लागणार नाही. त्यांना स्थैर्य दिले आहे. महायुतीतील तीन पक्षापैकी एका पक्षाने जरी नंतरच्या काळात वेगळी भूमिका घेतली, तरी सरकारला धोका होणार नाही. पाच वर्षे पूर्ण करणारा, तीनदा मुख्यमंत्री होणारा, मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पुन्हा मुख्यमंत्री होणारा असे अनेक विक्रम देवाभाऊंच्या नावे नोंदले गेले आहेत. प्रशासनावर कमालीची पकड, खडा न खडा माहिती, अधिकाऱ्यांशी चांगले संबंध, माहितीचे विपुल स्त्रोत, दूरदृष्टी, देशाचा आणि जगाचा अभ्यास, महाराष्ट्राला काय हवे, काय नको याची चांगलीच जाण असे पैलू देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. त्यांच्या हाती सरकारची सूत्रे आल्यानंतर त्यांच्या कामकाजाबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. अंगावर भ्रष्टाचाराचा शिंतोडाही उडून न दिलेल्या देवाभाऊच्या मागच्या सरकारमध्ये त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे हात बरबटले असल्याचे आरोप झाले. काहींची प्रकरणे उच्च न्यायालयात गेली. अहमदाबादची वॉशिंग पावडर असल्याने अनेकांचे ‘दाग’ स्वच्छ झाले. या प...