छत्रपतींचे शिवाजी महाराजांचे मनोगत
छत्रपतींचे मनोगत
नमस्कार...!!
मी महाराज शिवाजीराजे भोसले बोलतोय. सर्वात प्रथम खूप सारे धन्यवाद..!! Birthday wishes बद्दल.
हाहा !! अहो दचकू नका. मी सुद्धा आता modern झालोय. तुम्हीच सारखे म्हणता शिवाजी महाराज जन्माला यावे यावे....अहो कित्येक जन्म घेतले मी पण तुम्ही मला ओळखलेच नाही. दाभोळकरांच्या
रुपाने मीच जन्म घेतला होता. अंधश्रद्धा निर्मूलन करायला गेलो पण तुम्हीच मला मारून टाकले. आमटे कुटुंब हे माझेच अवतार.
दचकू नका, कारण शिवाजी महाराज म्हणजे केवळ युद्ध करणारा राजा नाही. प्रजेच्या कल्याणासाठी जो झगडतो तोच शिवाजी महाराज.
नीरजा भानोत च्या रुपाने जन्म घेऊन अनेक लोकांचे प्राण वाचविले. कर्तव्यदक्ष पोलीस आणि भारतीय सेना हे माझेच अवतार. तुम्ही मला किल्ल्यांवर शोधत बसलात म्हणून कदाचित मी तुम्हाला सापडलो नसेन. परवा सहज म्हणून किल्ल्यांवर फिरायला गेलो तर तिथे मला गौरवशाली इतिहासापेक्षा तिथल्या भिंतीवर, दगडांवर रमेश , प्रिया, रोहन, शीला, करण, पूजा वगैरे मंडळीच जास्त दिसली. गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे दगड खूप तक्रार करत होते तुमच्याबद्दल. वाईट वाटले फार.
राजा म्हणून जर मी तुमची सेवा करतोय तर प्रजा म्हणून तुमचे काही कर्तव्य आहे की नाही? नका माझ्या नावाचा जयजयकार करू, नका माझे पुतळे उभारू पण किमान माझा एक तरी गुण तरी अंगी बाळगा. आणि नसेल बाळगायचा तर please मला तुमचा राजा, तुमचा देव नका म्हणवून घेऊ.
तुमच्या Facebook आणि Whats App ने तर माझ्या नावाचा बाजार उठवलाय. मी आयुष्यात कधीच मुसलमानांशी नाही लढलो, कायम शत्रूशी लढलो मग त्याची जात, धर्म काही का असेना. इथे सरळ सरळ हिंदू -मुसलमान भेदभाव चालतो. मग ते मलाच शिव्या घालणे नाही का झाले कारण डॉ.अब्दुल कलाम हे देखील माझाच अवतार. माझ्या काळात स्त्रियांकडे कोणीच वाकड्या नजरेने पाहिले नाही असे नाही पण ज्यांनी पाहिले त्यांना आम्ही तोफेच्या तोंडी दिले होते. आज बलात्कार करून उजळ माथ्याने फिरणारे अनेक पाहिलेत. बघा तिकडे motorcycle rally चालली आहे जय भवानी, जय शिवाजी करत. दिखाऊ प्रेम आहे अहो हे. विचार करा जरा आणि कृती करा.
मला निघायला पाहिजे आता. जाता जाता अजून एक खंत व्यक्त करतो की मला तुम्ही देव मानता, पण मला अजून ओळखलेच नाहीत तुम्ही, माझ्या विचारांवर विचार करा, किल्ल्यांवर मला शोधू नका, मी आज अनेक रूपांनी वावरतोय,
माणसातला शिवाजी शोधून त्याची मदत करा किंवा स्वतः शिवाजी बनून लोकांची सेवा करा.
Comments
Post a Comment