कोविड च्या दुसऱ्या लाटेचा सतर्कतेने मुकाबला करा

 *ज्याप्रकारे कोविड महाराष्ट्रात वाढतोय, त्याची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा सर्व नागरिकांनी सतर्कतेने मुकाबला केला पाहिजे.

1) मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनेशन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रायव्हेट हाॅस्पिटलमधे ही सुविधा ऊपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 

2) जे पैसे भरून व्हॅक्सीन घेऊ शकतात, त्याना त्याप्रकारे घेण्याची सुविधा ऊपलब्ध करून दिली पाहिजे. 

3) शिकाऊ डाॅक्टर्स ,नर्सेसनाही ट्रेनिंग देऊन त्यांच्या द्वारे ही लसीकरण करण्याची सुरवात केली पाहीजे.

३ अ) उदा.ठाण्यासारख्या ठिकाणी 1000 जणं जर रोज 100 जणाना लस दिली तर एका दिवसात 1 लाख लोकांचे लसीकरण एका दिवसात होईल. 30 दिवसात संपूर्ण ठाणेकरांचे लसीकरण पूर्ण होईल. असे महाराष्ट्रातील मोठ्या शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणी 250 जण लसीकरण करणारे असतील तरी हे काम महिन्याभरात पूर्ण होईल. 

4) सर्व ऑफिसमध्ये,  दुकानात मार्केट, हाॅटेलमधे एकावेळी किती लोक असावित याची मर्यादा त्या अस्थापनेच्या आकारमानाप्रमाणे मर्यादा घातली पाहिजे.

5) त्यासाठी पोलिसांसोबत स्वेच्छेने काम करणार्या स्वयंसेवकांची ,त्याना आवाहन करून त्यांची  मदत घेतली पाहीजे.

6) सर्व शाळा/ काॅलेजेस मार्च अखेरपर्यंत बंद ठेवली पाहिजेत.

7) व्यक्तीगत आणि कूटूंबाची आरोग्य  सुरक्षेची काळजी नाक व तोंड झाकले जाईल असा मास्क लावणे ,सॅनिटायझरची वापर करणे , वाफ घेणे, गरम पाणी पिणे, वारंवार खासकरून काही खाण्या पिण्याच्या आधी हात साबणाने स्वच्छ  धूणे ईत्यादी गोष्टी द्वारे करणे आवश्यक आहे. 

 8) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवशक ते काढे ओषधे डाॅक्टरांच्या सल्ल्याने घेणे इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे. 

9) आपल्या घरी/ दारी असणारे येणारे जाणारे वाॅचमन, माळी, भाजीवाले, फळवाले, ईस्रीवाले, दुधवाले, पेपरवाले, घरकाम करणारे नोकर/चाकर याच्याकडूनही उपरोक्त गोष्टीची काळजी घ्यायला सांगणे. यासाठी आवशक ती मदत करणे हे आपण नक्कीच करायला पाहिजे.

10) पब्लिक ट्रान्स्पोर्टचा वापर करणार्यानी अतिशय कडक शिस्तीत,वरील ऊपाय योजनासह प्रवास करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

11) या सर्व काळज्या आपण 31 मार्च पर्यंत पाळल्या तर तोपर्यंत लसीकरण पूर्ण होईल आपण एप्रिल पासून आपले दैनंदिन जीवन व्यवस्थित सूरू करू शकू असे मला वाटते. 

12) एप्रिल मधे सर्व जणाना दूसरा डोस अगदी वरील प्रमाणे एका महिन्यात आपण पूर्ण करून घेऊ शकतो. 

13) हीच मेथडाॅलाॅजी आपण देशातही सर्व ठिकाणी वापरू शकतो. 

वरिल मत हे पूर्णपणे वैयक्तिक आहे. कुठल्याही प्रशासनाद्वारे प्रसारित केलेले नाही. पण महाराष्ट्र आणि देश चालविणार्या यंत्रणेपर्यत हे गेले, तर संपूर्ण देश या पॅनडॅमिक मधून पूर्ण पणे बाहेर पडू शकेल असे मला वाटते...म्हणून हा खटाटोप...

एक सतर्क नागरिक 

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034