*केबल किंवा डिश टीव्हीचे महिन्याचे पैसे कसे कमी करता येतील याची माहिती.*

*केबल किंवा डिश टीव्हीचे महिन्याचे पैसे कसे कमी करता येतील याची माहिती.*

आता मी पहिला उपाय सांगणार आहे तो तुमचा प्रतिमाहिना कमीतकमी ₹ 20+ GST अशी 23.6 ₹ एवढी रक्कम वाचविण्याचा.

तर आता ₹130+GST असे मिळून 154 रुपयात 100 फ्री चॅनेल मिळणार आहेत. लक्षात घ्या की 130 ₹ ही 100 फ्री चॅनेल्सची फी नसून 100 इतक्या नेटवर्क कॅपॅसिटीची फी आहे. एक SD चॅनेल घेतला की एक नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरला जातो. आणि एक HD चॅनेल घेतला की दोन नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरतात.

जर आपण 100 फ्री SD चॅनल घेतले तर आपले हे 100 स्लॉट भरतील. 100 नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरले की अजून चॅनेल पाहण्यासाठी पुन्हा 20 ₹ देऊन 25 स्लॉट विकत घ्यावे लागतील, तेही भरले की पुढच्या प्रत्येक 25 स्लॉट्ससाठी 20 ₹ द्यावे लागतील. हे अधिकचे 20 ₹ हे चॅनेल्सच्या वैयक्तिक किंवा पॅकच्या किंमतीच्या व्यतिरिक्त आहेत. 

म्हणजे समजा तुम्ही 100 फ्री SD चॅनेल घेतले, आणि प्रत्येकी 5 ₹ किंमतीचे 25 पेड SD चॅनेल घेतले आणि प्रत्येकी 10 ₹ चे 10 HD चॅनेल्स घेतले तर तुम्हाला एकूण स्लॉट्स लागतील फ्री चॅनेल्सचे 100 + SD पेड चॅनेल्सचे 25 + HD चे प्रत्येकी 2 म्हणजे 20, असे टोटल 145.
म्हणजे तुम्हाला एकूण नेटवर्क कॅपॅसिटी फी ही 145 चॅनेल्ससाठी भरावी लागेल, जी वर सांगितल्याप्रमाणे 130+20+20+GST
अशी एकूण 200 ₹ इतकी होईल. याउपर परत चॅनेल्सच्या किंमती म्हणजे 25 पेड SD चॅनेल्स साठी 25 x 5= 125, तर 10 पेड HD चॅनेल्ससाठी 10 x 10= 100 असे 125+100=225+GST म्हणजे 265₹ भरावे लागतील.
म्हणजे तुमचे एकूण बिल होईल, नेटवर्क कॅपॅसिटी फीचे 200 + पेड चॅनेल्सचे 265 = 465 ₹ इतके.

आपण स्वतः तर 20 पेक्षा अधिक चॅनेल्स बघत नाही. ते सर्व पेड चॅनेल आहेत, मग मी काय करावे?
तर 130 मध्ये जे 100 फ्री चॅनेल मिळतात ते सर्व घेण्याची सक्ती नाही. त्यातील दूरदर्शनचे 25 फ्री चॅनेल घेण्याची मात्र सक्ती आहे.
मग दूरदर्शनचे 25 चॅनेल गेले की आपल्याकडे उरतात 75 फ्री स्लॉट्स. यात आपण फ्री असलेल्या चॅनल्सपैकी आपण बघत असलेले फक्त 25 चॅनेल निवडायचे, कारण इतर बहुतांश चॅनेल्स हे वेगवेगळ्या भाषांचे असतात, ते चॅनेल आपण घ्यायची गरज नाही. असे केल्यावर आपले एकूण 50 स्लॉट खर्च होतात आणि 50 उरतात.
आपण जे 25 पेड SD चॅनेल घेणार आहोत ते आता आपण याच उरलेल्या 50 पैकी 25 स्लॉट्समध्ये भरू शकू. यामुळे आपल्याला 20₹ देऊन अधिकचे 25 स्लॉट घेण्याची गरज नाही. आता अजूनही आपल्याकडे 25 फ्री स्लॉट उपलब्ध असतील. त्यात आपण जे 10 HD चॅनेल घेणार आहोत त्याचे प्रत्येकी 2 म्हणजे 20 स्लॉट खर्च झाले तरी आपल्याकडे 100 पैकी 5 स्लॉट उरतीलच. आणि, अशाप्रकारे सगळे 100 फ्री चॅनेल्स न घेता, फक्त आपल्याला पाहिजेत तेवढेच घेऊन आपण पुढील नेटवर्क कॅपॅसिटीचे जवळजवळ 47₹ प्रति महीना वाचवू शकतो. म्हणून सर्व्हिस प्रोवायडर्स देत असलेले सगळे 100 फ्री चॅनेल घेऊ नका, मोजकेच घेऊन, आपले इतर नेटवर्क स्लॉट्स हे पेड चॅनेल्ससाठी वापरा आणि पैसे वाचवा.
या व्यतिरिक्तही सिंगल पेड चॅनेल्स किंवा चॅनेल पॅक्स नीट पाहून निवडले तर आताच्या स्थितीतही बिल खूप कमी होऊ शकते.  मी 20 फ्री, 10 पेड, 2 पेड पॅक्स मधले 15 आणि 5 HD असे 45 चॅनेल्स म्हणजे 50 स्लॉट्स अधिक दूरदर्शनचे 25 असे फक्त 75 स्लॉट्स खर्चून बिल GSTसहीत 240₹ इतकेच येईल अशी चॅनेल्सची निवड केली आहे.

यातही पुढे तीन महिन्यात सर्व ब्रॉडकास्टर्सला सब्स्क्रायबर्स कमी झाल्याने चॅनेल्सच्या किंमती कमी कराव्याच लागतील असा TRAI चा अंदाज आहे. असे झाले तर बिल 200च्या आसपास सुद्धा येऊ शकेल.

तुम्हीही असेच थोडे डोके लढवून आपले बिल कमी करा. उगीच कधी ढुंकूनही बघत नसलेले चॅनेल्स घेऊन ब्रॉडकास्टर आणि सर्व्हिस प्रोवायडर्सचे खिसे आपल्या मेहनतीच्या पैशांनी भरू नका.
दयानंद नेने 
ग्राहक संरक्षण सेवा समिती

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034