Open letter to #GirishKuber, Editor, #Loksatta

प्रती,
श्री गिरीश कुबेर साहेब,
माननीय संपादकदैनिक लोकसत्ता,मुंबई,
विषय :- लोकसत्ता या वर्तमानपत्रातील दिनांक २ डिसेम्बर २०१५, रोजी प्रसिद्ध झालेल्या “बिनडोकांची राष्ट्रभक्ती” या मथळ्याच्या अग्रलेखा संदर्भातील चुकीच्या नोंदी संदर्भात.
महोदय,
आपल्या लोकसत्ता या वर्तमानपत्रातील दिनांक २ डिसेम्बर २०१५, रोजीच्या “बिनडोकांची राष्ट्रभक्ती” या अग्रलेखामध्ये आपण चुकीचे संदर्भ दिले आहेत. राष्ट्रगीत चालू असताना उभे राहण्याचा कोणताही नियम नाही असे सांगताना आपण प्रिवेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट १९७१ चा दाखला दिला आहे. या दाखल्या संदर्भात आपण इतर बाबींचा उल्लेख केलेला नाही. शिवाय १९७१ नंतर याच संदर्भात झालेल्या अनेक दुरुस्त्यांचा / बदलांचाही संदर्भ आपण वाचकांपासून लपवून ठेवला आहे. तुमच्या लेखामुळे राष्ट्रगीताच्या वेळी जनतेने आणि विशेषतः समाजातील एका विशिष्ट समुदायाने उभे राहिले नाही तरी चालेल असे अप्रत्यक्षपणे सुचविले गेले आहे.
 मी आपणास हे निदर्शनास आणू इच्छितो की, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजेच गृह मंत्रालयाच्या संकेत स्थळावर http://www.mha.nic.in/national , ORDERS RELATING TO THE NATIONAL ANTHEM OF INDIA प्रसारित केल्या आहेत. या पत्रकामधील पान क्रमांक ५ माधील V मुद्द्यातील सर्वसाधारण नागरिकांसाठीच्या क्रमांक १ च्या सुचनेनुसार, राष्ट्रगीत सुरु असताना सावधान मध्ये उभे राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
तसेच जर सिनेमामध्ये (म्हणजे चालू सिनेमाचा भाग असल्यास), नाटकामध्ये, जाहिरातींमध्ये राष्ट्रगीताचे गायन होत असेल तर अशा प्रसंगी उभे राहण्याची गरज नाही असे नमूद केले आहे.
हा अध्याधेश दिनांक ५ जानेवारी २०१५ रोजी प्रसारित करण्यात आला असून तो http://www.ncert.nic.in/announcements/oth_announcements/pdf_files/NatinalAnthem.pdf या संकेत स्थळावर मिळेल. आपल्याला माहित असेल की मल्टीप्लेक्स, PVR तसेच जवळजवळ सर्व सिनेमागृहात सिनेमा “सुरु होण्याआधी” राष्ट्रगीत गाण्यात यावे अशी अधिसूचना याआधीच काढण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रसरकारच्या दिनांक ५ जानेवारी २०१५ रोजीच्या अध्यादेशातील सर्व नियमांचे काटेकोर पालन या सिनेमागृहांत होणे अत्यावश्यक आहे.
मी आपणाला खालील प्रश्न विचारू इच्छितो. या प्रश्नांची उत्तरे आपण लवकरात लवकर द्यावी ही विनंती, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येईल. .
            १.  आपण आपल्या लेखात १९७१ च्या अध्यादेशाचा उल्लेख केलात, परंतु आपण ५ जानेवारी २०१५ च्या अध्यादेशाचा उल्लेख करण्याचे हेतुपुरस्सर टाळले का?
     २. आपल्या लेखामुळे राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहिले नाही तरी चालते असा संदेश जातो आहे. यामुळे वाचकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आता या आपणास या अध्यादेशाची माहिती झाल्यानंतर आपण आपल्या वर्तमान पत्रातून जाहीर माफी मागणार की कसे?   
  ३. आपल्या लेखामुळे समाजातील विशिष्ट गटाला राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले आहे असे म्हणल्यास ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे आपल्या लेखामुळे समाजात तेढ निर्माण होणारे वातावरण तयार केले गेले असे वाटते.
 तर या बाबत आपण खुलासा करणार का?
महोदय,
 आपण संदर्भित परिपत्रके, अध्यादेश आणि इतर माहिती गोळाकरून यासंदर्भात आपले ज्ञान वाढवावे आणि हे पत्र दिनांक ८ डिसेम्बर २०१५ च्या आधी या संदर्भात खुलासा करून जाहीर माफी मागावी. कदाचित हे आपल्या नजरचुकीने , अथवा अज्ञानामुळे झाले असेल, तर तसेही कबूल करावे. आपण लवकरच या पत्राची दाखल घ्याल अशी आशा आहे.
 धन्यवाद,
आपला
एक माजी वाचक
सूचना :- आपण आपला अग्रलेख वर्तमानपात्राच छापला आहे, त्यामुळे मी ही माझे हे पत्र सोशल मीडियामध्ये पाठवत आहे, जेणेकरून आपल्या लेखामुळे वाचकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत होईल. आपल्या सोयीसाठी याची एक प्रत तसेच केंद्र्सरकारच्या सदर अध्यादेशाची प्रत कुरिअर द्वारा आपल्या कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवत आहे. 

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034