#राजदीप_सरदेसाई_अर्रे_किती_चाटणार?
-- #रोखठोक_दयानंद_नेने
*राजदीप सरदेसाई अर्रे किती किती चाटणार आहेस..?*
14 नोव्हेंबर रोजीचे राजदीप चे ट्विट पहा.
नेहरूंच्या तुरुंगवासाचे गुणगान करताना राजदीपचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय!
त्यांनी नुकतीच आठवण करून दिली की पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यलढ्यात एकूण नऊ वेळा तुरुंगात गेले आणि नऊ तुकड्यांमध्ये तब्बल 3,259 दिवस म्हणजे जवळपास नऊ वर्षे तुरुंगात होते.
तुरुंगात असतानाच त्यांनी The Discovery of India हा ग्रंथ लिहिला. निश्चितच, हा त्यांच्या साहित्यिक योगदानाचा महत्त्वाचा भाग आहे.
पण राजदीप, इतिहासाची दुसरी बाजू सांगण्याचीही हिंमत दाखवा ना!
नेहरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तुरुंगवासातील फरकही कधीतरी सांगा!
• एकीकडे नेहरूंचा राजशाही तुरुंगवास आणि दुसरीकडे सावरकरांचा काळ्या पाण्याचा नरक!
नेहरूंचा तुरुंगावास ही नजरकैद असायची.
राहायला गेस्ट हाऊस, वाचायला पुस्तकं, लेखनसाहित्य, वर्तमानपत्रे, व्यवस्थित जेवण आणि काही कौटुंबिक पत्रव्यवहाराची परवानगी . त्यांना लिहिण्यासाठी स्वतंत्र जागा होती. सहकैद्यांमध्ये मौलाना आझाद, सरदार पटेल यांच्यासारखे दिग्गज नेते होते. बौद्धिक चर्चा, वाचन आणि लेखन सुरू होते.
त्यांच्या तुरुंगवासाचा आदर आहे. पण तो आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमधील शिक्षा यांची तुलना होऊ शकत नाही.
🔹आता सावरकरांचा तुरुंगवास पाहा!
1911 ते 1921 या काळात अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना काय भोगावे लागले?
• सुरुवातीचे महिने एकांतवासात!
• बैलांप्रमाणे कोलूला जुंपून दररोज 30 पौंड तेल काढण्याचे काम!
• निर्धारित तेलाचे लक्ष्य पूर्ण न झाल्यास मारहाण आणि फटक्यांची शिक्षा!
• हातकड्या, बेड्या आणि क्रॉसबार फेटर्ससारख्या अमानुष शिक्षा!
• निकृष्ट अन्न, पाण्याची टंचाई आणि अत्यंत अपमानास्पद राहणीमान!
• इतर कैद्यांशी संपर्कावर निर्बंध. कुटुंबीयांशी संपर्क नाही.
👉 हा तुरुंगवास नव्हता, तर माणसाचे शरीर आणि मन दोन्ही मोडून काढण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न होता.
आणि या सगळ्यातूनही सावरकरांचे विचार, लेखन आणि स्वातंत्र्याची जिद्द संपली नाही!
🔹 राजदीप, एक साधा प्रश्न!
नेहरूंनी तुरुंगात Discovery of India लिहिले, त्याचा आम्हाला अभिमान असू द्या.
पण सावरकरांनी त्या काळ्या पाण्यात अमानुष यातना सहन करताना जे भोगले, त्याचा उल्लेख करताना तुमची लेखणी का आखडते?
नेहरूंचा गौरव करा, कोणी अडवले आहे?
पण त्यासाठी सावरकरांचे योगदान कमी करण्याची किंवा त्यांच्या यातनांकडे डोळेझाक करण्याची गरज काय?
स्वातंत्र्यलढा हा कोणाच्या एका घराण्याचा कॉपीराइट नव्हता!
देशासाठी तुरुंगवास भोगलेले नेहरूही इतिहासाचा भाग आहेत आणि काळ्या पाण्याच्या कोठडीत अमानुष यातना सोसलेले सावरकरही इतिहासाचा भाग आहेत.
इतिहास म्हणजे काँग्रेसचे कौतुक आणि सावरकरांबाबत मौन नव्हे!
राजदीप, पत्रकार आहात. इतिहासाचे वाचन करा. पण वाचताना चष्मा फक्त नेहरूंचाच लावू नका!
नाहीतर पत्रकारितेचा Nehruvian कोलू फिरवत राहाल आणि वाचकांना मात्र रोज तेच तेच तेल पाजत राहाल!
-- दयानंद नेने
#रोखठोक_दयानंद_नेने
#Pointblank_Dayanand_नेने
#RajdeepSardesai


Comments
Post a Comment