♦️*नॉर्वेच्या पत्रकाराला व्हिसा नाकारला आणि विरोधकांचा अपप्रचार!*
*मोदींना प्रश्न विचारला म्हणून व्हिसा नाकारला असा अपप्रचार. आधी सत्य समजून घ्या!*
-- #रोखठोक_दयानंद_नेने
नॉर्वेच्या पत्रकार हेले लिंग स्वेन्सन यांचा भारताचा व्हिसा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हैदराबाद येथे होणाऱ्या भारत शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी त्या भारतात येणार होत्या. मात्र, विमानतळाकडे रवाना होण्याच्या अवघ्या १० मिनिटे आधी भारतीय दूतावासाने त्यांना प्रवास न करण्यास सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वेन्सन यांना भारतात येण्यासाठी आवश्यक राजकीय मंजुरी आणि व्हिसा मिळाला होता. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयातील वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशानंतर व्हिसा रद्द करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
व्हिसा रद्द झाल्यानंतर हेले लिंग यांनी या निर्णयामागे राजकीय कारण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वेत विचारलेला प्रश्न, त्यानंतर सरकारच्या कारभारावर केलेली टीका आणि भारतातील काही प्रभावशाली उद्योगपतींबाबत व्यक्त केलेली मते यामुळे आपल्याला भारतात येण्यापासून रोखले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
🔹 सत्य काय आहे?
आंतरराष्ट्रीय राजनैतिक शिष्टाचार आणि पत्रकार परिषद यांतला फरक ज्यांना समजत नाही, त्यांनी लोकशाही आणि पत्रकारितेचे धडे देऊ नयेत!
नॉर्वे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांचा संयुक्त कार्यक्रम होता. तो Joint Press Statement होता, प्रश्नोत्तरांची पत्रकार परिषद नव्हती. दोन्ही देशांच्या माध्यमांना कार्यक्रमाचे स्वरूप आधीच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही एका नॉर्वेजियन पत्रकाराने नेते व्यासपीठावरून निघत असताना प्रश्न ओरडून विचारला. या काही सेकंदांच्या व्हिडिओला सोशल मीडियावर रंगवून मोदी पत्रकारांना घाबरतात, असा प्रचार सुरू झाला.
• या लिंक वर ती नॉर्वे ऑसलो मधील घटना पहा :
https://youtu.be/XcAc7HMJEiU
या व्हायरल व्हिडिओतून एक महत्त्वाची बाब गायब आहे!
दिलेल्या माहितीनुसार, त्याच पत्रकाराला त्याच संध्याकाळी भारतीय दूतावासाने स्वतंत्र पत्रकार वार्ताहर परिषदेसाठी आमंत्रित केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी तिच्या प्रश्नांना उत्तरे दिली. म्हणजे प्रश्न विचारण्यावर बंदी नव्हती; प्रश्न विचारण्यासाठी ठरवलेले व्यासपीठ आणि कार्यक्रमाचे स्वरूप वेगळे होते.
🔹 आता येऊया हैदराबादच्या भारत समिटमधील व्हिसा प्रकरणाकडे.
काँग्रेसच्या भारत समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या सुमारे १२० परदेशी प्रतिनिधींचे व्हिसा रखडले किंवा नाकारले गेल्याचे वृत्त आहे. त्यात नॉर्वेजियन पत्रकार हेल्ले लिंग स्वेन्सेन यांचाही समावेश होता. मात्र, या निर्णयामागचे अधिकृत कारण अद्याप सार्वजनिक झालेले नाही.
स्वेन्सेन यांनी स्वतःच आपला व्हिसा रद्द करण्याचा संबंध मोदींना ओस्लोमध्ये विचारलेल्या प्रश्नाशी असू शकतो, अशी शंका व्यक्त केली. पण शंका म्हणजे पुरावा नव्हे आणि योगायोग म्हणजे कारण नव्हे!
म्हणूनच दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत.
* ओस्लोमधील कार्यक्रम हा प्रश्नोत्तरांचा नव्हता, हे वस्तुस्थिती आहे.
* हैदराबादमधील व्हिसा रद्द करण्यामागचे कारण सरकारने स्पष्ट करणे आवश्यक आहे. केवळ ओस्लोमधील घटनेवरून त्याचा संबंध जोडणे हा राजकीय तर्क आहे, सिद्ध झालेला निष्कर्ष नाही.
राहुल गांधी आणि विरोधकांना मोदींवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण एका व्हायरल व्हिडिओला राजकीय हत्यार बनवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही.
मोदींना प्रश्न विचारला म्हणून पत्रकाराचा व्हिसा रद्द केला, असा आरोप करायचा असेल तर त्याचा पुरावा द्या. आणि सरकारनेही व्हिसा रद्द करण्यामागचे कारण पारदर्शकपणे जाहीर करावे.
लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजेत; पण विरोधकांनीही आरोप करताना तथ्यांचा आदर केला पाहिजे.
पत्रकारितेच्या नावाखाली सनसनाटीपणा आणि लोकशाहीच्या नावाखाली अपप्रचार, या दोन्ही गोष्टी देशहिताच्या नाहीत!
— दयानंद नेने
#रोखठोक_दयानंद_नेने
#NorwegianJournalist
#Visa #Cancellation #Modi #Oslo #PressStatement

%20(10).jpeg)
Comments
Post a Comment