राहुल गांधींचा आरोपांचा बाजार आणि मोदींचे दुर्लक्ष!*

 🌀 *राहुल गांधींचा आरोपांचा बाजार आणि मोदींचे दुर्लक्ष!*

*पुरावे शून्य, आरोप शेकडो आणि कांगावा मात्र हजारो पट!*

-- #रोखठोक_दयानंद_नेने 

मूर्खांच्या गावात शहाणे वेडे ठरतात. अज्ञानी किंवा मूर्ख लोकांच्या समूहात समजूतदार व्यक्तीचे विचार कोणालाच पटत नाहीत आणि तिथे शहाण्या माणसालाच वेडे ठरवले जाते. राहुल, सोनिया आणि प्रियांका वाड्रा यांच्या काँग्रेस चे सध्या असेच झाले आहे.



🔹 मूर्खांचा बाजार 


#राहुलबाबांची अलीकडची वक्तव्ये ऐकली की आता त्यांच्यावर राजकीय नैराश्याचा परिणाम झालाय की काय, अशी शंका यायला लागली आहे. रोज एक नवा आरोप, रोज एक नवा दावा आणि रोज एक नवी पत्रकार परिषद! मात्र या आरोपांच्या समर्थनार्थ ठोस पुरावा एकाचाही नाही. आरोपांचा गाजावाजा प्रचंड, पण पुराव्यांच्या नावाने बोंब!


• राहुल गांधींचा ताजा दावा तर भन्नाटच आहे. म्हणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आरोपांचे पुरावे त्यांच्या स्वतःच्या फोनमध्ये आहेत आणि मोदी सरकार त्यांचा फोन टॅप करीत आहे!


• राहुलजी, आधी एक सांगा, तुमचा फोन टॅप होत आहे हे तुम्हाला कसे कळले?


• दुसरे म्हणजे, मोदींविरोधातील इतके महत्त्वाचे पुरावे तुम्ही एकट्या फोनमध्येच का ठेवले आहेत? लॅपटॉपमध्ये साठवून ठेवायला काय हरकत आहे? त्याच्या अनेक प्रती काढून सुरक्षित ठिकाणी ठेवायला हव्यात. एखाद्या विश्वासू व्यक्तीकडेही त्याची प्रत द्यायला हवी.


• अगदी मान्य केले  की तुमच्याकडे खरोखरच मोदींविरोधातील सबळ पुरावे असतील, तर मग डिबेटची वाट कशाला पाहत आहात? थेट पत्रकार परिषद घ्या आणि सर्व पुरावे देशासमोर मांडा. आरोप सिद्ध करा. देशाला सत्य कळू द्या.


• समजा, तुमच्या फोनमधील पुरावे मोदींना समजले, तरी त्याने काय फरक पडणार आहे? पुरावे नष्ट होणार आहेत का? ते तर तुमच्याकडे सुरक्षित राहतीलच ना?


• की पुरावे असल्याचा दावा खोटा आहे, आणि ते प्रत्यक्ष दाखवणे कठीण आहे?

तुमचे त्या लांडगा आला रे आला असे ओरडणाऱ्या मुलासारखे होते आहे.


🔹 ट्रम्प यांच्या दबावाखाली मोदी? आधी वस्तुस्थिती तरी समजून घ्या!


राहुल गांधींचा दुसरा आरोप म्हणजे मोदींनी अमेरिकेच्या दबावाखाली भारत-अमेरिका व्यापार करार केला.


• अहो राहुलजी, आधी वस्तुस्थिती समजून घ्या. व्यापार करारावरील चर्चा सुरू असणे आणि करार प्रत्यक्ष अंतिम होऊन लागू होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चर्चा सुरू असतानाच दबावाखाली करार केल्याचा गजर कशासाठी?


• अदानी यांच्यासाठी मोदी ट्रम्प यांच्यापुढे झुकले, असाही आरोप तुम्ही करता. मात्र अमेरिकेतील अदानी प्रकरणाबाबतची कायदेशीर स्थिती आणि त्यातील घडामोडी यांचा संदर्भ न घेता राजकीय निष्कर्ष काढणे कितपत योग्य आहे?


• अदानी यांच्यावर आरोप झाले म्हणजे ते आपोआप सिद्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे अमेरिकेत त्यांच्याविरोधातील खटल्याच्या स्थितीबाबतही वस्तुस्थिती तपासूनच बोलले पाहिजे.


• दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्यासारख्या भारतीय उद्योगपतींच्या अमेरिकेतील गुंतवणुकीचे स्वागत केले जात आहे. मग अमेरिकेचा दबाव फक्त अदानींच्या बाबतीत किंवा मोदींच्या बाबतीतच कसा काय आठवतो?


*राजकारणासाठी प्रत्येक व्यावसायिक घडामोडीला मोदींच्या शरणागतीचा मुलामा देणे बंद करा!*


🔹 ऑपरेशन सिंदूर : काल अपयश, आज जिंकत आलेले युद्ध?


ट्रम्प यांच्या दबावामुळे मोदींनी जिंकत आलेले युद्ध थांबवले, हा राहुल गांधींचा आणखी एक आरोप होता.


पण राहुलजी, एक साधा प्रश्न आहे.


• तुम्ही आणि तुमचे सहकारी कालपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरल्याचा आरोप करीत होता. मग आज अचानक ते जिंकत आलेले युद्ध कसे झाले?


• काल ऑपरेशन सिंदूर अपयशी होते आणि आज ते जिंकत आलेले युद्ध आहे? सोयीप्रमाणे भूमिका बदलण्याची ही कसली राजकीय कसरत?


*वस्तुस्थिती अशी की ऑपरेशन सिंदूर ही पाकिस्तानमधील दहशतवादी तळांविरुद्ध करण्यात आलेली लक्ष्यित लष्करी कारवाई होती. ती अनिश्चित काळ चालणारे पारंपरिक युद्ध नव्हते. निर्धारित उद्दिष्टे पूर्ण झाल्यानंतर कारवाई थांबवणे हा लष्करी निर्णय असतो.*


त्याला थेट अमेरिकेच्या दबावाशी जोडण्यासाठी पुरावे लागतात. केवळ आरोप करून आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंतागुंतीचे निर्णय समजावून सांगता येत नाहीत.


आणि एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले असे तुम्हीच मानत असाल, तर मग त्याच्या यशाबद्दल देशाला संभ्रमात टाकण्याचे कारण काय?


🔹एपस्टीन फाईल : मोदींचे नाव घेण्याचा नवा बहाणा!


आता एपस्टीन फाईलचा मुद्दा.


राहुल गांधी वारंवार या फाईलचा संदर्भ देऊन मोदींवर संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यासाठी ठोस आधार काय आहे?


त्या फाईलमध्ये मोदींचा कोणता आक्षेपार्ह फोटो आहे? कोणता व्हिडिओ आहे? त्यांच्याविरोधात कोणता ठोस पुरावा आहे?


एखाद्या व्यक्तीचा जेफ्री एपस्टीनशी फोटो असणे म्हणजे त्या व्यक्तीचा त्याच्या गुन्ह्यांशी संबंध सिद्ध होतो का? मुळीच नाही!


हरदीपसिंग पुरी यांचा एपस्टीनसोबतचा फोटो सोशल मीडियावर फिरवला जातो. पण एखाद्या बैठकीत किंवा दिवाणखान्यात झालेल्या भेटीचा फोटो म्हणजे गुन्हेगारी संबंधांचा पुरावा नव्हे.


एपस्टीनशी संबंधित कोणत्याही व्यक्तीबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात, चौकशीची मागणी केली जाऊ शकते. पण त्यासाठी तथ्ये आणि पुरावे आवश्यक आहेत.


केवळ एखाद्याचे नाव किंवा फोटो दाखवून त्याला गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही.


राहुलजी, आरोप करण्यापूर्वी पुरावे दाखवा. अन्यथा ही केवळ चारित्र्यहननाची राजकीय मोहीम ठरते.


🔹मोदी कामात मग्न, राहुल गांधी आरोपांच्या नादात!


खरा प्रश्न असा आहे की राहुल गांधींच्या या रोजच्या आरोपांचा देशाच्या जनतेवर नेमका किती परिणाम होतो आहे?


गेल्या तीन-चार महिन्यांत आंदोलन, मोर्चे, पत्रकार परिषदा, विविध राजकीय कार्यक्रम आणि 'छात्रों की गुंज'सारख्या उपक्रमांमधून सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.


देशात प्रक्षोभ निर्माण होईल, जनतेचा सरकारवरील विश्वास उडेल आणि त्यातून सत्तांतराची परिस्थिती निर्माण होईल, अशी अपेक्षा असावी.


पण अपेक्षित राजकीय परिणाम दिसत नसल्यामुळे आता आरोपांची तीव्रता वाढवली जात आहे की काय, असे वाटू लागले आहे.


• राहुल गांधींना प्रत्येक मुद्द्यावर मोदींना आव्हान द्यायचे आहे. मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले की त्यांची अस्वस्थता आणखी वाढते.


• मोदी प्रत्येक आरोपाला उत्तर देत बसत नाहीत. ते आपल्या पद्धतीने सरकार चालवत आहेत. अर्थात, सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन झालेच पाहिजे असे नाही. विरोधकांनी प्रश्न विचारावेत, सरकारला धारेवर धरावे. पण त्यासाठी तथ्ये, अभ्यास आणि विश्वासार्ह पुरावे असणे आवश्यक आहे.


• लोकशाहीत विरोधी पक्षाचे काम सरकारला प्रश्न विचारणे आहे; रोज नवा आरोप करून स्वतःच्या आरोपांनाच बातमी बनवणे नव्हे!


🔹 2029 चे स्वप्न आणि राहुल गांधींची राजकीय कसोटी!


उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतरत्र असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांचे निकाल राहुल गांधींच्या राजकीय रणनीतीची कसोटी पाहतील. निवडणुकीतील यश केवळ पत्रकार परिषदांमधून किंवा सोशल मीडियावरील आरोपांच्या गदारोळातून मिळत नसते.


जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो. पर्यायी नेतृत्व द्यावे लागते. ठोस कार्यक्रम मांडावा लागतो. केवळ मोदीविरोध हा सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग होऊ शकत नाही.


आणि समजा 2029 मध्येही अपेक्षित यश मिळाले नाही, तर राहुल गांधी आणि त्यांच्या भोवतालच्या राजकीय वर्तुळाची अवस्था काय असेल?


• राजकारणात आरोप करून प्रसिद्धी मिळवता येते; पण विश्वासार्हता मिळवण्यासाठी पुरावे, अभ्यास आणि सातत्यपूर्ण काम करावे लागते.


राहुलजी, मोदींना हरवण्याची स्वप्ने जरूर पाहा. पण त्यासाठी आधी स्वतःची विश्वासार्हता वाढवा. कारण जनतेला  मोदींना केवळ प्रश्न विचारणारा नेता नको आहे; देशासाठी पर्यायी विचार आणि पर्यायी नेतृत्व देणारा नेता हवा आहे!


आणि हो, फोनमधील ते पुरावे असतील तर कधीतरी देशाला दाखवाच!


-- दयानंद नेने

#अशोक_वानखेडे 

#राहुलगांधी #बेछुट_आरोप 

#आटा_सरकलाय

Comments