💥 *म्हणून मी नेहमी अंधभक्तांना सांगतो की १०० फडणवीस जन्माला आले तरी एका शरद पवारची बराबरी नाही होऊ शकत.*
शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना सह्याद्री पर्वत रांगेत त्यांनी 3 जलविद्युत प्रकल्प उभारले,
कोयना टप्पा IV, घाटघर प्रकल्प आणि भिरा प्रकल्प.
यातील भिरा प्रकल्प हा सध्याच्या नविन प्रकल्पा पासून फक्त 50 किलोमीटर वर त्याच जिल्ह्यात आहे.
आणि 74 किलोमीटर वर घाटघर प्रकल्प आहे.
*पण या प्रकल्पांसाठी नेमकी किती झाडे तोडली गेली,किती जंगल साफ केलं याचा डाटा सरकारने कधी लोकांना सांगितलाच नाही.*
• शरद पवारांचा वरद हस्त असलेला लवासा प्रायवेट सिटी प्रकल्प हा देखील सह्याद्री पर्वत रांगेतच डोंगरे कापून झाला.
• सह्याद्री पर्वत रांगेतील 6,388 एक्कर सरकारी डोंगराळ वन जमिन ही प्रायवेट कंपनीला त्यावेळी दिली गेली होती.
• आता यावर नेमकं किती जंगल साफ केलं, किती डोंगरे नष्ट केली, तिथल्या स्थानिक पशुपक्षी व जलचरांवर याचा काय प्रभाव झाला, याचा डाटा तुम्ही गूगल आणि चॅटजीपीटी पिळून काढला तरी भेटायचा नाय.
कारण सरकारने कधी डाटाच पब्लीशच केला नाही.
👉 ऐवढं बेस्ट होतं शरद पवार साहेबांचं काम.
फडणवीस कायतरी येडा माणूस आहे, याने स्वत:हून डाटा प्रकाशित केला की सायडोंगरावर ऐवढी झाडे तूटणार आहेत आणि ती भरून काढाय वनविभागाला 250/300 एक्कर खाजगी जमिन कंपनीने दिली आहे.
• समोरून विभागाने माहिती दिली आणि विरोधकांनी दोन नावे या प्रकल्पाला चिकटवली ती म्हणजे अदानी आणि भिमाशंकर, ही दोन नावे आली म्हणजे आता लोकांना तुम्ही स्वत:वर चढण्यापासून नाही वाचवू शकत.
• प्रकल्प जरी अदानीचा नसला आणि भिमाशंकर मध्ये नाही तर त्यापासून लांब असलेल्या साय डोंगरात होत असला तरी आता भिमाशंकर संपवत असल्याचा कलंक हा नेहमी बोलून दाखवला जाईल.
• काँग्रेसच्या काळात ऐवढे जंगल साफ झालेत, डोंगरे संपली आहेत तरी त्यांच्यावर कधीही "झाडखाऊ" असल्याचा आरोप नाही लागला कारण त्यांनी आरोपांसाठी लोकांना कशाचीही माहिती मिळणार नाही याची काळजी घेतली.
• शरद पवार साहेबांना लोकांची बौद्धीक लायकी माहित होती.
जल विद्यूत प्रकल्पांसाठी डोंगराची जागा लागते ऐवढी माहिती लोकांना नसते, जिकडे पिण्याच्या पाण्याची तंगी चालू आहे अशा मोकळ्या जमिनीवर "जल विद्यूत" प्रकल्प का होत नाही अशी गचाळ मागणी लोकं करतील याचा पवार साहेबांना अंदाज होता म्हणून ते डाटाच सांगायचे नाहीत.
#विवेक_मोरे #फडणवीस #पवारसाहेब #वृक्षतोड

Comments
Post a Comment