मेलोनींचा बाणेदारपणा, भारताने काय शिकावे?

 💥*मेलोनींचा बाणेदारपणा, भारताने काय शिकावे?*


-- #रोखठोक_दयानंद_नेने 


राजकारणात कणा असावा लागतो; केवळ खुर्ची आणि सत्ता असून चालत नाही!


इटलीमध्ये एका पाकिस्तानी इमामाने तेथील मुसलमानांना काफिरांशी लढायचे आवाहन केले. पंतप्रधान मेलोनी ने त्याची देशातून हकालपट्टी केली. सदर इमाम इटलीमध्ये 30 वर्षे वास्तव्य करत होता तरीही.


तत्पूर्वी इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने एप्रिल २०२६ मध्ये पाकिस्तानी इमाम अली काशिफ यांची हकालपट्टी केली. लहान मुलींच्या विवाहाचे समर्थन करणाऱ्या त्याच्या वक्तव्यांनंतर ब्रेशियाच्या पोलिस प्रशासनाने ही कारवाई केली. 

यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये कट्टरतावादी आणि हमास समर्थक वक्तव्यांच्या आरोपांवरून पाकिस्तानी वंशाच्या इमाम झुल्फिकार खान यांचीही इटलीतून हकालपट्टी करण्यात आली होती. मुलांचे संरक्षण, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय सुरक्षितता याबाबत इटलीने कठोर भूमिका घेतली.


🔹या घटनांमधून भारताने काय शिकावे?


भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही देश आहे. येथे प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे; पण त्या स्वातंत्र्याच्या नावाखाली बालविवाह, हिंसेचे समर्थन, दहशतवादाचे उदात्तीकरण किंवा संविधानविरोधी कारवाया यांना संरक्षण मिळता कामा नये.


धर्म कोणताही असो, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. बहुसंख्याकांच्या भावना दुखावल्या गेल्या तर तत्पर कारवाई आणि अल्पसंख्याकांच्या नावाखाली चुकीच्या कृत्यांकडे दुर्लक्ष, असा दुहेरी न्याय लोकशाहीला घातक आहे.


• मेलोनी यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे केवळ कठोर भाषा नव्हे, तर निर्णयक्षमता आणि कायद्याची अंमलबजावणी. अर्थात, प्रत्येक कारवाई पुराव्यांवर, कायदेशीर प्रक्रियेवर आणि न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधिकारावर आधारित असली पाहिजे.


• भारताला कठोर नेत्यांपेक्षा कायद्यापुढे कुणालाही झुकते माप न देणारे ठाम नेतृत्व अधिक आवश्यक आहे.


प्रश्न एवढाच आहे—आपण मतपेढीचे राजकारण करणार की राष्ट्रहित, बालसुरक्षा आणि संविधानाच्या प्रतिष्ठेला सर्वोच्च स्थान देणार?


राजकारणात कणा असावा लागतो. मेलोनींच्या कृतीतून हा धडा भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाने घ्यायला हवा!


— दयानंद नेने

Comments