#रोखठोक_दयानंद_नेने
🛑 आम्ही मोदींच्या पाठीशी ठामपणे का उभे आहोतं ? आणि NEET आंदोलनाने मला नेमके काय शिकवले?
आजकाल एक फॅशन झाली आहे.
नरेंद्र मोदींना शिव्या द्या...
भाजपाला शिव्या द्या...
देशातील प्रत्येक समस्येचे खापर मोदींच्या डोक्यावर फोडा...
आणि स्वतःला "लोकशाहीचा खरा रक्षक" घोषित करा.
🔹 पण आमी त्या जमावाचा भाग नाही.
होय... आमी नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत .
आणि अभिमानाने आहोतं.
कारण आमच्या साठी हा प्रश्न व्यक्तीचा नाही; हा प्रश्न राष्ट्राच्या नेतृत्वाचा, स्थैर्याचा आणि भारताच्या भविष्याचा आहे.
ज्यांना आम्हाला मोदींचे "अंधभक्त" म्हणायचे आहे त्यांनी अवश्य म्हणावे.
आमच्यासाठी घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाची अंधभक्ती करण्यापेक्षा देशासाठी काम करणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवणे अधिक योग्य आहे.
🔹 धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा — पराभव की जबाबदारी?
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
काही जणांनी त्याचा उत्सव साजरा केला.
पण प्रश्न असा आहे...या राजीनाम्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणते नुकसान भरून निघाले?
- पेपरफुटी करणारे गुन्हेगार आधीच पकडले गेले.
- तपास सुरु झाला.
- पुन्हा फेर - परीक्षा घेण्यात आली.
- लाखो विद्यार्थ्यांचे वर्ष वाचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
- परीक्षेचा निकाल ही आला. काउनसेल्लिंग सुरु झाले.
- अशा परिस्थितीतही राजीनामा झाला, म्हणजे सरकारने राजकीय जबाबदारी स्वीकारली असेही म्हणता येईल.
परंतु दुसरीकडे एक धोकादायक संदेशही गेला—रस्त्यावरचा दबाव आणि सततचे आंदोलन सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडू शकते.
लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार आहे.
परंतु लोकशाही ही रस्त्यावरच्या घोषणांनी नव्हे, तर संविधान, न्यायव्यवस्था आणि संस्थांच्या चौकटीत चालते.
🔹 दोन भारत दिसले...
या संपूर्ण प्रकरणात मला दोन भारत दिसले.
• पहिला भारत...
तो अभ्यास करणारा.
रात्रभर जागून मेहनत करणारा.
पेपर रद्द झाला तरी पुन्हा उभा राहणारा.
पुन्हा परीक्षा देणारा.
देशभरातील जवळपास २० लाख विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा दिली.
कोणी टायर जाळले नाहीत.
कोणी पोलिसांवर दगडफेक केली नाही.
कोणी देशाला शिव्या दिल्या नाहीत.
त्यांनी फक्त अभ्यास केला.
यश मिळवले.
ही आहे खरी भारताची Gen Z.
• दुसरा भारत...
सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ पाहून धक्का बसला.
काही आंदोलनकर्ते पंतप्रधानांविषयी अत्यंत अश्लील, लैंगिक स्वरूपाची भाषा वापरत होते.
मतभेद असू शकतात.
कठोर टीकाही असू शकते.
पण अश्लीलता?
लैंगिक शिवीगाळ?
ही लोकशाहीची भाषा आहे का?
उद्या हीच भाषा तुमच्या वडिलांबद्दल वापरली तर चालेल का?
तुमच्या आईबद्दल?
तुमच्या शिक्षकांबद्दल?
मग देशाच्या पंतप्रधानांविषयी का?
पंतप्रधान मोदी असोत किंवा इतर कोणताही नेता असो—सार्वजनिक चर्चेची किमान पातळी राखलीच पाहिजे.
🔹 आंदोलन आणि अराजक यात फरक असतो
अण्णा हजारेंचे आंदोलन आणि आजची अनेक आंदोलने यात मूलभूत फरक आहे.
अण्णांनी विरोधकाचा द्वेष केला नाही.
त्यांनी अपमान केला नाही.
ते शिस्तीत लढले.
आज अनेक आंदोलने सोशल मीडिया रील्स, व्हायरल क्लिप्स आणि ट्रेंडिंग हॅशटॅगसाठी होत असल्याचे चित्र दिसते.
आवाज जितका गलिच्छ...
तितकी प्रसिद्धी जास्त...
हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
🔹 सरकारवर टीका करा... पण देश मोडू नका
मी स्वतः अनेकदा भाजपावर टीका केली आहे.
गरज पडली तेव्हा सरकारलाही प्रश्न विचारले आहेत.
कारण टीका ही लोकशाहीची ताकद आहे.
पण सरकारवर टीका करणे आणि देशातील प्रत्येक संस्थेवर अविश्वास निर्माण करणे यात फरक आहे.
जर प्रत्येक परीक्षा फसवी...
प्रत्येक न्यायालय पक्षपाती...
प्रत्येक तपास संस्था विकली गेलेली...
प्रत्येक निवडणूक बनावट...
असा प्रचार सतत केला गेला, तर लोकशाहीवरील विश्वास उरेल का?
🔹 मुलांना आपण काय शिकवत आहोत?
आज आपल्या मुलांना गुण मिळवायला शिकवले जाते.
पण अपयश स्वीकारायला शिकवले जाते का?
जीवनात परीक्षा पुन्हा देता येते.
नोकरी पुन्हा मिळू शकते.
व्यवसाय पुन्हा उभा करता येतो.
पण आयुष्य पुन्हा मिळत नाही.
म्हणून मानसिक ताकद, संयम आणि संघर्षाची तयारी ही शिक्षणाइतकीच महत्त्वाची आहे
🔹 बाळासाहेबांचे एक वाक्य...
मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडून ऐकलेले एक वाक्य आजही विसरलो नाही.
ते म्हणाले होते—
"या देशाला प्रगती करायची असेल तर शिस्त हवी. निर्णय घेणारे मजबूत नेतृत्व हवे, गरज असल्यास हुकूमशाह हवा."
त्या मताशी प्रत्येकजण सहमत असेलच असे नाही.
पण एक गोष्ट नाकारता येणार नाही.
अराजक, सततचा गोंधळ आणि रस्त्यावरचा दबाव यावर कोणताही देश महान होत नाही.
🔹 मोदी परिपूर्ण नाहीत...
नरेंद्र मोदी देव नाहीत.
त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात.
त्या झाल्या तर त्यांच्यावर टीका झालीच पाहिजे.
पण त्यांचे मूल्यमापन एका घटनेवर नव्हे, तर संपूर्ण कार्यकाळावर झाले पाहिजे.
जागतिक स्तरावर भारताची वाढलेली प्रतिष्ठा...
पायाभूत सुविधांमध्ये झालेली मोठी गुंतवणूक...
डिजिटल परिवर्तन...
कल्याणकारी योजनांचा विस्तार...
दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका...
या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त राजकीय द्वेषातून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही.
🔹 माझी भूमिका स्पष्ट आहे
मी सरकारचा गुलाम नाही.
मी कोणत्याही नेत्याचा भक्त नाही.
पण मी राष्ट्रहिताचा समर्थक आहे.
देशाच्या स्थैर्याचा समर्थक आहे.
लोकशाहीचा समर्थक आहे.
सभ्य राजकीय संवादाचा समर्थक आहे.
आणि म्हणूनच...
आजही मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
मतभेद असू द्या.
वादविवाद होऊ द्या.
निवडणुका लढू द्या.
पण भारताची लोकशाही, तिच्या संस्था आणि सार्वजनिक संस्कृती यांचे अवमूल्यन करून नाही.
कारण शेवटी कोण जिंकतो, कोण हरतो हे तात्पुरते असते.
पण भारत कायमचा आहे.
भारत प्रथम. बाकी सर्व नंतर.
-- दयानंद नेने
26 जुलै 2026
Comments
Post a Comment