दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरेंचे खरंच काही होणार का?*

 🛑 *दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरेंचे खरंच काही होणार का?*


#रोखठोक_दयानंद_नेने


दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि माध्यमांच्या केंद्रस्थानी आले आहे. २०२० पासून गाजत असलेल्या या प्रकरणाला आता नवा कायदेशीर वळण मिळाले आहे. 


Bombay High Court च्या आदेशानंतर CBI ने FIR दाखल केली असून त्यात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया, सूरज पांचोली यांच्यासह अनेकांची नावे तपासाच्या संदर्भात आली आहेत. मात्र नाव येणे म्हणजे आरोपी ठरणे नव्हे, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


*मग प्रश्न आहे—आदित्य ठाकरेंचे खरंच काही होणार का?*


सध्या या प्रश्नाचे उत्तर तपास पूर्ण होईपर्यंत देता येणार नाही.


• दिशा सालियन यांच्या वडिलांनी आपल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. आधीच्या तपासात मात्र तिच्या मृत्यूची नोंद आत्महत्या म्हणून करण्यात आली होती. नंतर महाराष्ट्र पोलिसांच्या SIT नेही foul play आढळला नसल्याचे न्यायालयात सांगितले होते.


• High Court ने मात्र आधीच्या तपासातील काही प्रश्न उपस्थित केले—घटनास्थळी पंचनामा उशिरा का झाला, मृत्यूपूर्वी पोलिसांची उपस्थिती CCTV मध्ये का दिसते, वैद्यकीय निष्कर्ष आणि घटनाक्रमात काही विसंगती आहेत का, अशा अनेक बाबींची पुन्हा तपासणी आवश्यक असल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत समोर आले. म्हणूनच CBI कडे नव्याने तपास सोपवण्यात आला.


*पण या सगळ्याचा थेट अर्थ आदित्य ठाकरे दोषी आहेत असा अजिबात होत नाही*.


• त्यांच्यावर राजकीय विरोधकांकडून गंभीर आरोप केले गेले आहेत. त्यांच्या वकिलांनी हे आरोप माध्यमांतील बातम्या आणि hearsay वर आधारित असून राजकीय हेतूने केले जात असल्याचे न्यायालयात मांडले. आदित्य ठाकरे यांनीही दिशा सालियन यांना आपण ओळखत नसल्याचे आणि आपल्यावरील आरोप evidence-free असल्याचे म्हटले आहे.


म्हणून आता खरी कसोटी राजकारणाची नाही, पुराव्यांची आहे.


- CBI कडे जर ठोस पुरावे आले—तर कायदा आपले काम करेल.


- पुरावे मिळाले नाहीत—तर FIR, आरोप आणि television debates यापलीकडे काहीही घडणार नाही.


- आणि इथेच या प्रकरणातील सर्वात मोठा धोका आहे.


- न्यायालयीन तपास आणि Media Trial यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.


• एकीकडे CBI पुरावे, forensic evidence, CCTV, call records, statements आणि घटनाक्रम तपासेल. दुसरीकडे television studios मध्ये "कोण दोषी?" यावर आधीच निकाल दिला जाईल.


👉 माझ्या मते, सध्याच्या टप्प्यावर हे प्रकरण आदित्य ठाकरेंच्या तातडीच्या अटकेपेक्षा राजकीय दबावाचे आणि माध्यमांच्या TRP चे मोठे साधन बनण्याची शक्यता अधिक दिसते.


- सरकारसाठी—ठाकरे पिता पुत्रावर सतत राजकीय दबाव ठेवण्याचे हे प्रकरण आहे.


- माध्यमांसाठी—सहा वर्षांपासून जिवंत असलेली sensational story आहे. TRP वाढवण्यासाठीचे वरदान आहे.


- विरोधकांसाठी—आदित्य ठाकरेंवर राजकीय नैतिक दबाव निर्माण करण्याची संधी आहे.


पण न्यायव्यवस्थेसाठी प्रश्न एकच आहे—


*दिशा सालियन यांच्या मृत्यूमागे नेमके काय घडले आणि त्याला जोडणारा ठोस पुरावा कुठे आहे?*


तो पुरावा मिळाला तर कोण कितीही मोठा असो, कायद्यापुढे उभा राहायलाच हवा.


तो मिळाला नाही तर केवळ FIR मध्ये नाव, राजकीय आरोप आणि रोजच्या TV debates यांच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येणार नाही.


आणि म्हणूनच आजचा खरा प्रश्न "आदित्य ठाकरेंचे काय होणार?" हा नसून—


"दिशा सालियन यांच्या मृत्यूचे सत्य अखेर पुराव्यांसह समोर येणार का?"


याचे उत्तर CBI च्या तपासातूनच मिळेल.


बाकी राजकारण सुरूच राहील.

आणि TRP देखील!


-- दयानंद नेने 

17 सप्टेंबर 2026

Comments