🛑 *आंदोलनात जाऊन मग आक्रोश कशासाठी?*
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे. पण आंदोलन म्हणजे कायद्यापेक्षा मोठे होण्याचा परवाना नाही.
उदाहरण म्हणजे झुराळांचे आंदोलन.
या आंदोलनात एक धोकादायक पद्धत दिसत आहे. आंदोलने आयोजित करणारे महिला आणि तरुणींना मुद्दाम आघाडीवर पुढे उभे करतात. पोलिसांनी पुरुष आंदोलकाला पकडताच मध्ये घुसायचे, धक्काबुक्की करायची, पोलिसांना गोंधळात टाकायचे आणि त्यानंतर काही सेकंदांची व्हिडिओ क्लिप व्हायरल करून "महिलांवर अत्याचार" अशी ओरड सुरू करायची. त्यानंतर लगेच राजकीय पुढऱ्यांनी पोलिसांविरुद्ध बोंब मारायची - हा ट्रेंड होऊ घातला आहे.
जर एखाद्या पोलिसाने जाणीवपूर्वक गैरवर्तन केले असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही.
पण एका अपूर्ण व्हिडिओच्या आधारे संपूर्ण पोलीस दलाला विकृत, महिला-विरोधी किंवा गुन्हेगार ठरवणे हा निव्वळ राजकीय स्वार्थ आहे.
आज सोशल मीडियावर अशा शेकडो व्हिडिओंचा अक्षरशः पूर आहे, ज्यात काही महिला व तरुणी पोलिसांना उद्देशून गलिच्छ शिवीगाळ करताना, लैंगिक स्वरूपाचे टोमणे मारताना, अश्लील भाषेत बोलताना, पंतप्रधानांविषयी आणि इतर व्यक्तींविषयी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरताना दिसतात. काही व्हिडिओंमध्ये पोलिसांसमोर उभे राहून मुद्दाम चिथावणीखोर वर्तन, अंगावर धावून जाणे, धक्काबुक्की करणे आणि पोलिसांना उचकावण्याचे प्रकारही दिसतात. अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले आहेत.
या आंदोलनात आपण हेही पाहिले आहे, जिथे काही आंदोलकांनी पोलिसांवर मिरची स्प्रे केला, अश्लील शिवीगाळ केली, पंतप्रधानांपासून पोलिसांपर्यंत सर्वांवर घाणेरडी भाषा वापरली. मात्र त्या क्लिप्स फारशा व्हायरल होत नाहीत. व्हायरल होतात त्या फक्त पोलिसांच्या प्रत्युत्तराच्या.
जमावाला विवेक नसतो. हजारो लोकांच्या गर्दीत, चिथावणीखोर घोषणांमध्ये, धक्काबुक्कीत आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या संघर्षात प्रत्येक क्षण तणावाचा असतो. अशा वेळी काही सेकंदांच्या व्हिडिओवरून न्यायालयासारखे निर्णय देणारे राजकीय नेते आणि सोशल मीडिया न्यायाधीश समाजाची दिशाभूल करत आहेत.
🔹 आंदोलनात जातात कशाला?
सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, सुशिक्षित विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सन्मानाने जगणाऱ्या महिलांनी अशा संघर्षमय आंदोलनस्थळी स्वतः जायचेच कशाला ?
जिथे धक्काबुक्की होणार हे आधीच माहीत आहे... जिथे अटक, लाठीचार्ज किंवा गोंधळाची शक्यता आहे... तिथे गेल्यावर अडचण निर्माण होण्याची शक्यता स्वाभाविकच असते.
स्वतःची सुरक्षिततेची गॅरेंटी ही कोणत्याही राजकीय आंदोलनात कोणालाच देता येत नाही - खास करून जेव्हा तेथे गुंड मवाली टपोरी लोकांना बोलावले जाते.
जंतर मंतर वर विद्यार्थ्यांपेक्षा तिप्पट चौपट संख्या ही समाज कंटकांची होती.
अशा ठिकाणी जाऊन रील्स बनवण्याचे थ्रील अनुभवणे म्हणजे आगीत हात घालण्यासारखे. हात जाळणारच.
खरे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि स्वाभिमानी महिलांनी अशा संघर्षमय, राजकीय हेतूने पेटविलेल्या आंदोलनांपासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे.
जिथे धक्काबुक्की, अटक, लाठीचार्ज किंवा गोंधळ होण्याची शक्यता आधीपासूनच माहीत आहे, तिथे स्वेच्छेने सहभागी झाल्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तरी गेलात आणि काही विपरीत घडले तर नंतर कांगावा करण्यात काही अर्थ नाही.
कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता तुमच्या सुरक्षिततेची हमी देणार नाही; अडचण आली तर परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील.
तेव्हा राजकारणासाठी स्वतःला प्यादे बनवू नका. तुमचा सन्मान, सुरक्षितता आणि भविष्य कोणत्याही आंदोलनापेक्षा अधिक मौल्यवान आहे.
-- दयानंद नेने
Comments
Post a Comment