#रोखठोक_दयानंद_नेने
🔵 *पुण्यात दगडूशेठ हलवाई समोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण - हीच खरी भारताची ताकद!*
गेल्या दोन महिन्यांत पुण्यात दोन मोठ्या कार्यक्रमांची चर्चा झाली. दोन्ही कार्यक्रमांत महिला केंद्रस्थानी होत्या. पण या दोन गर्दींच्या मागची प्रेरणा मात्र पूर्णपणे वेगळी होती.
एकीकडे राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम. दुसरीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोरचे ३५ हजारांहून अधिक महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण.
🔹 *राहुल गांधींचा कार्यक्रम*
पुण्यात राहुल गांधी आले. त्यांनी युवतींशी एका भव्य इव्हेंट मध्ये संवाद साधला. त्या इव्हेंट मध्ये पाश्चात्य संगीत होते, अत्याधुनिक रोषणायी, फटाक्यांची आतिषबाजी सर्व होतं.
काँग्रेसने राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जमलेल्या सुमारे आठ हजारांची तरुणाई, विशेषतः युवतींचा उत्स्फूर्त पाठिंबा असल्याचे राजकीय चित्र उभे केले.
या कार्यक्रमातील उपस्थिती कशी जमवली गेली, भारती विद्यापीठ आणि DY Patil Vidyapeeth मधील महाविद्यालयांतील विद्यार्थिनींचा सहभाग कशा पद्धतीने झाला, याबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे केवळ गर्दीचा आकडा म्हणजे तरुणाईचा स्वयंस्फूर्त कौल, असे सरसकट म्हणणे योग्य ठरणार नाही.
🔹 *दगडूशेठसमोरचे दृश्य वेगळे होते.*
या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई मंदिरासमोर पहाटेपासून हजारो महिला स्वतःहून दाखल झाल्या. यंदा ३५ हजारांहून अधिक महिलांनी अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले. हा उपक्रम आता चार दशकांची परंपरा बनला आहे; १९८५ मध्ये अवघ्या १५ महिलांपासून सुरू झालेली ही परंपरा आज एवढ्या विराट स्वरूपात पोहोचली आहे.
- ना कोणाचा राजकीय चेहरा पुढे होता, ना सत्तेचा नारा.
- होते ते फक्त गणपती बाप्पावरील श्रद्धेचे नाते.
• महिला आल्या. शिस्तीत बसल्या. एकाच स्वरात अथर्वशीर्ष म्हटले. आरती केली आणि शांतपणे परतल्या.
आणि इथेच या दोन कार्यक्रमांमधला मूलभूत फरक समजतो.
- राजकीय कार्यक्रमात गर्दी हा संदेश असतो.
श्रद्धेच्या कार्यक्रमात गर्दी स्वतःच संदेश बनते.
- भारताला समजून घ्यायचे असेल तर अशा दृश्यांकडे पाहावे लागेल.
• जात, पंथ, भाषा, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन एकाच भावनेने हजारो महिला एकत्र येतात—याला कुठल्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ची गरज नसते. त्यासाठी मोठमोठे दावे करण्याचीही गरज नसते.
👉 हीच भारताची सामाजिक शक्ती आहे.
• भारताला जातीच्या चौकटीत विभागून पाहणाऱ्यांनी हा भारत समजून घ्यावा.
धर्माला केवळ राजकीय समीकरण मानणाऱ्यांनी हा भारत समजून घ्यावा.
आणि निवडक गर्दीला ‘Gen-Z चा कौल’ म्हणून सादर करणाऱ्यांनीही हा भारत समजून घ्यावा.
• भारत केवळ निवडणुकीच्या मंचावर दिसत नाही.
तो मंदिराच्या पायऱ्यांवर, गणेशोत्सवाच्या मंडपात, सणांच्या उत्साहात आणि लाखो सामान्य नागरिकांच्या आस्थेतही दिसतो.
• राहुल गांधी असोत किंवा काँग्रेस—त्यांना राजकीय स्पर्धा करायची असेल तर जरूर करावी. सरकारवर टीका करायची असेल तर जरूर करावी. युवकांचे प्रश्न मांडायचे असतील तर नक्की मांडावेत.
• पण भारताच्या समाजमनाला जात-पातीच्या चौकटीत विभागण्याचा प्रयत्न केला, तर वास्तव त्यांच्यासमोर पुन्हा पुन्हा उभे राहील.
• कारण भारताची ओळख फोडण्यात नाही—जोडण्यात आहे.
• आणि पुण्यातील दगडूशेठसमोर ३५ हजार महिलांनी एकत्र उच्चारलेला गणेशमंत्र त्याचे एक जिवंत उदाहरण आहे.
🔹*हा खरा भारत आहे.*
इव्हेंटने तयार केलेला भारत नव्हे;
श्रद्धा, संस्कृती आणि परस्परांच्या सहअस्तित्वातून घडलेला भारत.
हा भारत कोणत्याही राजकीय ‘इव्हेंट मॅनेजर’च्या स्क्रिप्टवर चालत नाही.
आणि म्हणूनच त्याला जात-पंथाच्या चौकटीत कायमचे विभागणे कोणालाही शक्य होणार नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस ला तर नाहीच नाही.
-- दयानंद नेने
21 सप्टेंबर 2026


Comments
Post a Comment