धन्यवाद भारत सरकार*

 *धन्यवाद भारत सरकार*


*पहलगाम हत्याकांडा नंतर* जी घबराहाट निर्माण झाली त्यामुळे काश्मीर मधून सर्व पर्यटकांनी एकाच वेळी काश्मीर सोडायचे ठरवले. त्यामुळे व्यवस्थेवर प्रचंड ताण आला.


*बस व्यवस्था अपुरी पडत होती आणि विमान कंपन्यांनी भाव तिप्पट वाढवले होते.


*काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी काहीतरी केले पाहिजे - पण काय करता येईल याबाबत मी स्वतः आणि नवी मुंबई येथील भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते संतोष पाचलग विचार विनिमय करत होतो.


*मग आमचे ठरले - आम्ही दोघांनी नागरी उड्डाणं मंत्र्यांना पत्र, ई-मेल पाठवले आणि विनंती केली की सरकार ने पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी श्रीनगर हून विशेष विमानांची व्यवस्था करावी.


*माझी ज्योतीरादित्य सिंदिया यांच्याशी ओळख असल्यामुळे मी त्यांना ही विनंती केली. त्यानंतर मी आणि संतोष पाचलग यांनी भाजपा सरचिटणीस सौ. माधवी नाईक - ज्या नागरी उड्डाणं मंत्रालयात डायरेक्टर आहेत - त्यांच्याशी सुद्धा बोललो - विनंती केली.


*त्यानंतर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना मी या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली.


*मी राज ठाकरे यांचे सचिव हर्षल देशपांडे यांच्याशी बोलून मनसे तर्फे सुद्धा प्रयत्न करा असे सांगितले.


*सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. काल सायंकाळी केंद्रीय नागरी उड्डाणं राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन विशेष - चार्टर विमानांची व्यवस्था केल्याचे जाहीर केले.


*मी नेहमी म्हणतो की काम होण्याशी मतलब - सर्वाना धन्यवाद*


*दयानंद नेने*

Comments